Wednesday, March 25, 2009

ग्रैंड ओपनिंग

"दिसामाजी काही तरी लिहावे" असा विचार खरं तर अमेरिकेत आल्यापासून मनात घोळतो आहे. पण काही ना काही कारणाने दिस काय गेली पाच वर्षे झाली तरी काही नाही. मागे एकदा माझ्या भटकंतीचा ब्लॉग सुरु केला होता पण आधी लिहिलेले दोन लेख फ़क्त electronically compile केले आणि गाडी तिथेच थांबली. असो !!

आता पुन्हा पाडव्याच्या शुभमुहूर्तावर हा blog सुरु करायचं धैर्य करतेय. बरेच दिवस मनात घोळतंय पण नेमका विषय सुचत नाही. शेवटी लक्षात आलं की मुळात ब्लॉग सुरु करायचं सुचतंय कारण आजकाल मनमोकळ्या गप्पा मारता येत नाहीत. मग ठरलं तर जसं सुचेल, आठवेल तसं लिहायचं यात कदाचित कुणा त्रयस्थाला रस वाटणार नाही पण आपलं आपल्याला मोकळं वाटलं तरी खूप झालं.आठवणींची नोंद होईल ती वेगळी.

दुसरा प्रश्न नावाचा पण यासाठी मला जास्त विचार करावा लागला नाही. आशा भोसलेंची मी जबरदस्त फ़ॅन आणि विशेष करुन "माझिया मना जरा थांबना" हे गाणं जास्त जिव्हाळ्याचं. याची कडवी तर जास्त सुरेख आहेत. कितीतरी कठीण प्रसंगातून तरुन जायची ताकद यातल्या शब्दात आहे. त्यामुळे हेच नाव ठरलं.

हा पहिला लेख लिहायची एक गंमत आहे. इथे सध्या हिवाळा संपून वसंत यायची तयारी सुरू आहे म्हणजे आपला स्प्रिंग हो !! तर या विकेन्डला मस्त सुर्यप्रकाशामुळे जरा आल्हाददायक वाटत होतं. माझ्या समोरच्या घरातील शेजारणी बाहेर गप्पा मारत होत्या. त्यातली एक खुपदा समोरासमोर तरी भेटते पण दुसरीला भेटून वर्ष झालं असावं आणि ही बया एकटी राहते. पन्नाशीच्या आसपास असावी.. म्ह्टलं जरा हाय हॅलो तरी करुया. ती याआधी जेव्हा भेटली होती तेव्हा ती नोकरी गेल्याचं म्हणाली होती. त्यावेळी ती बाजुच्या गावात दुकान काढायचं म्हणत होती. यावेळी मी तिची खुशाली घेताना म्हणाली की मी माझ्या दुकानात सहा दिवस तिच्या शब्दात six days a week काम करते. मग मी सहजच दुकान कुठे आहे तेही विचारलं, त्य़ावेळी ती दुकानाची जागा बदलणार असल्याचं कळलं.

मी शेजारधर्म म्हणून शिवाय ह्या नवीन जागेच्या भागात माझं जाणं होतं म्हणून म्ह्टलं की मी मारीन एखादी चक्कर. यावर ती पटकन म्हणाली well the place is in mess now but the grand opening is in May....पाहिलं याला म्हणतात अमेरिकन ईंग्लिश. हा शब्द मी आतापर्यंत एखाद्या सुपरमार्केटचा एखादा भाग renovate झाल्यावर पुन्हा सुरू होताना, वापरताना खुपदा ऎकलाय. तेव्हाही तो oversize वाटे पण वाटलं कदाचीत सुपरमार्केट असल्यामुळे ठीक आहे पण बघा, छोट्या छोट्या gift itemsचं दुकान किती मोठं असेल? पण opening मात्र grand...

बस्स !!! मग आता सुज्ञास अधिक सांगणे न लगे. माझ्या blogची grand opening झाली आहे आणि ती पण वेळेवर!!! आता यातला grand अमेरीकन आहे की खरा ते हा ब्लाँग मला कसा पुढे नेता येतो त्यावरुन कळेलच पण सुरुवात तर झाली आहे.

काय मजा आहे पहा पुर्वी आपण पाडव्याला नवीन दुकान वगैरे सुरु करायचो आणि आता माझ्यासारखे लोक नवीन ब्लॉग पाडव्याच्या मुहुर्तावर सुरु करायला लागली आहेत. ईंटरनेटचा महिमा दुसरं काय??

माझ्या आजुबाजुला कायम ऊं ऊं करत नाचणारं माझं बाळ आता जरा शांत झोपलं आहे म्हणून सर्व गप्पा आत्तच नाही मारता यायच्या मला. त्याच्या उठल्यानंतरच्या खाउच्या तयारीला लागायला हवं. बघुया दिसामाजी नाही तरी मासी एक दोनदा तरी ईथे चक्कर मारीन म्हणते. बाकी मायबाप वाचकांचा लोभ वाढला तर माझाही ईथला राबता नक्की वाढवेन. तर आतापुरता रामराम.
पाडव्याच्या शुभेच्छा :)

12 comments:

 1. सुरुवात तर छान झाली. आता रेग्युलरली ब्लॉगिंग करायचा प्रयत्न करा.. पुढच्या पोस्ट ची आतुररेने वाट पहातोय.. नुतन वर्षाभिनंदन...

  ReplyDelete
 2. धन्यवाद!! आपल्या शब्दांनी हुरूप येतोय....

  ReplyDelete
 3. grand opening chi survat chaan jahli aahe...lekh hi sunder lihile aahe...tula ani ghari sarvanna padvyachya hardik shubhecha...

  ReplyDelete
 4. अपर्णा,

  अप्रतिम ब्लॉग बनवला आहेस.तु निसर्गावर अतिशय प्रेम करतेस हे ठाऊक आहे मला. आता येणाऱ्या लेखांची खुप उत्सुकता लागुन राहिली आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा. :-)

  दिपक
  पु.ल.प्रेम

  ReplyDelete
 5. Aparna

  Uttam Blog aahe. Phote he chan aahet. Keep it up

  D...

  ReplyDelete
 6. आज पहिल्यांदा तुमचा ब्लॉग वाचतोय ... उशीर झाला तसा म्हणायचा ... पण हरकत नाही. आता सर्व अधिपासून वाचून काढतो ... :D

  ReplyDelete
 7. स्वागत रोहन आणि कॉमेन्टस बद्द्ल आभार. मी लिहिते अधुन मधुन... आशा आहे आपल्याला आवडेल. मला असा एखादा विषय घेऊन कितपत लिहिणं होईल याबद्द्ल खात्री नव्हती त्यामुळे जसं सुचेल तसं लिहिते झालं.

  ReplyDelete
 8. अपर्णा, पाडव्याच्या मुहूर्तावर ब्लॉग सुरू केलास...
  २ वर्ष होतील परवा. अभिनंदन

  ReplyDelete
 9. सुहास अरे थांब नं दोन दिवस काय घाई आहे??? पण तरी धन्यवाद...हे हे...

  ReplyDelete
 10. ग्रँड ओपनिंग आहे म्हटल्यावर एकच प्रतिक्रिया येते माझ्या मनात....


  टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. :-)

  ReplyDelete
 11. ग्रँड ओपनिंग आहे म्हटल्यावर एकच प्रतिक्रिया येते माझ्या मनात....


  टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. टाळ्या.. :-)

  ReplyDelete
 12. संकेत, बऱ्याच दिवसांनी पहिल्या पोस्टवर प्रतिक्रिया पाहतेय...त्यामुळे
  धन्यवाद...धन्यवाद...धन्यवाद...धन्यवाद...धन्यवाद...धन्यवाद...धन्यवाद...धन्यवाद...धन्यवाद...धन्यवाद...धन्यवाद...धन्यवाद...धन्यवाद...धन्यवाद...धन्यवाद...धन्यवाद...

  ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.