ती तेरा वर्षांची असताना नाझी जर्मनीच्या तावडीतून सुटून मुक्त अमेरिकेत आलेलं हे कुटुंब. तिच्या बाबांनी इथेच पोर्टलँडमध्ये एक टोप्यांच्या व्यवसायात आपले पाय रोवले आणि यथावकाश एक छोटी कंपनी सुरु केली. त्यांच्या मृत्यूनंतर या मुलीच्या नवऱ्याने ही कंपनी पुढे सुरु ठेवली पण त्यानंतर सहाच वर्षात अचानक वयाच्या फक्त ४७व्या वर्षी हृदयविकाराने तोही गेला, तेव्हा ती आता चाळीशीत असणारी ती वर उल्लेखलेली मुलगी, जिने कधी कुठल्याही व्यवसाय क्षेत्रात आधी कधी पाऊल टाकले नव्हते आपल्या बाबांचा इतके वर्षांचा व्यवसाय हातात घेतला.
तिची मुलं तेव्हा अनुक्रमे २१, १९ आणि १२ वर्षांची होती म्हणजे लहानगी नसली तरी अजून शाळा कॉलेजमधली, पालकांवर अवलंबून होती. या मुलांची ही one tough Mother हा सगळा व्यवसाय हातात घेते तेव्हा आजूबाजूंच्या इतर भाकीतकर्त्यांनी आता ही कंपनी बुडणार म्हणून चारीठाव सांगून झालं होतं. हेच कशाला तिने व्यवहार हातात घेतल्यापासून वर्षभरात बँकेनेही फक्त चौदा हजार डॉलर इतक्या शुल्लक रकमेवर कंपनी बुडीतखात्यात घालण्याचा सल्ला दिला होता. अशा सगळ्या परिस्थितीला न जुमानता शिवाय पतीनिधनाचं ताजं दुःख बाजूला ठेवून आपलं लक्ष आपल्या मोठ्या मुलाला हाताशी धरून नवीन रिटेल प्रॉडक्ट्स वाढवून आणि जाहिरात इत्यादी माध्यमातून कंपनीला नुसतंच तारलं नाही तर तिचं नाव उत्तर अमेरिका आणि अन्य देशात नावारूपाला आणलं.
२००४ च्या सुमारास कंपनीची त्या वर्षीची वार्षिक विक्री १ बिलियन डॉलरपेक्षा जास्त होती. तिचं नाव निव्वळ व्यवसायामुळेच आहे असं नाहीये. तिने अनेक ठिकाणी मदतीसाठी संस्था सुरु केल्या आहेत आणि त्यातल्या स्त्रियांसाठी असलेल्या संस्थाही भरपूर आहे. आपल्या भारतातही तिची "हर प्रोजेक्ट(Her project)" म्हणून एक संस्था आहे. तिचा यु ट्यूब विडिओ खाली आहे.
तिच्या बाबांनी पोर्टलँडजवळच्या नदीचं नाव ठेवलेली ही कंपनी आहे "कोलंबिया स्पोर्ट्सवेअर" आणि ही टफ मदर आहे "गर्ट बॉयल". दोन दिवसापूर्वी ही आई नव्वद वर्षांची झाली. तिचा वाढदिवस महिला दिनाच्या आसपास असणं यापेक्षा सुखद योगायोग तो काय?
गर्टच्या खात्यावर असलेली ही यादी पहिली तर तिच्याबद्दलचा आदर नक्की दुणावेल.
- The SBA Outstanding Business Person Award for Oregon (1977)
- The Oregon Chapter of Women’s Forum Woman of the Year Award (1987)
- A Top 50 Woman Business Owner by Working Woman Magazine (1993-96)
- Oregon Entrepreneur of the Year, Oregon Enterprise Forum (1994)
- The Golden Plate Award, American Academy of Achievement (1998)
- Awarded the Jimmy Huega “Can Do” Award (2003)
- Member, Oregon Commemorative Coin Commission (2004)
- Granted Portland, OR’s prestigious First Citizen Award (2005)
- Women of Distinction Award, Marylhurst University (2008)
- Small Business Association Impact Award (2009)
- Outstanding Mother Award, National Mother’s Day Committee (2009)
- Women of Achievement Award, Oregon Commission for Women (2009)
तळटीप:
आतापर्यंत माझ्या करीयरमध्ये consulting मध्ये असल्यामुळे वेगवेगळे क्लायंट्स आले आणि माझ्यासाठी आदराची नवनवीन स्थानं निर्माण होत गेली. या टफ मदरच्या एका मुख्य प्रोजेक्टवर काम करायची संधी मिळणं हे माझंच भाग्य. आता तिचा मुलगा मुख्य कारभार संभाळत असला तरी कार्यकारिणीवर असलेली ही आई मला बाजूलाच असलेल्या employee store मधल्या तिच्या One tough Mother या पुस्तकामुळे आणि येता जाता लावलेल्या तिच्या पोस्टरमुळे नेहमी दिसते. तिला तसं पाहताना मला तिची पार्श्वभूमी जाणून घ्यावीशी वाटली. हे पुस्तक खर अजून माझ्या विशलिस्टवरच आहे. आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गेले काही महिने मला तिच्याबद्दल वाटत असलेल्या भावनांना शब्दांत मांडता आलं की नाही माहित नाही पण त्या निमित्ताने या वाचकांना एका स्त्रीच्या यशाची कहाणी वाचावीशी वाटली तरी ते या पोस्टचं यश मी समजेन. तिच्या पुस्तकाचा काही भाग अमेझॉनवर या लिंकवर आहे.
सुपर्ब... सिंपली सुपर्ब. तुझा त्या प्रोजेक्टबद्दलचा अनुभव वाचायला आवडेल गं :)
ReplyDeleteसुहास आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल अनेक आभार. प्रोजेक्टबद्दल पब्लिक ब्लॉगवर लिहिता येईल का माहित नाही कारण रिटेलमध्ये अशा गोष्टी आपण उघड करणार नाही याचं हमीपत्र दिलं असतं. जेनेरिक काही लिहिता आलं तर पाहीन. :)
Deleteअजून तपशील वाचायला आवडेल. तिचं नाव गर्ट नसून ग्रेटच असायला हवं होतं नाही का !
ReplyDeleteमस्त लिहिलंय.
AJ, तुझं तिला "ग्रेट" म्हणणं आवडलं. आणि वर सुहासला म्हटल आहेच तेच पुन्हा सांगेन. Its always better to follow the confidentiality rules as applied to corporate work life :)
Delete