Friday, August 16, 2013

पि पि पि

नावात काय आहे हे कुणीतरी म्हणून ठेवलं  आणि आपण पुढे सुरु ठेवलंय. पण कितीतरी प्रसंग असे येतात की  नावात बरचं काही आहे हे आपण आपलं मान्य करतो. 

नावांचे गोंधळ घालायला पश्चिमेच्या कुठच्याही देशात आपण पूर्वेकडच्यानी जायचं. त्यांनी गोंधळ घालायचे आणि मग आपणच ते निस्तरायचे हे आताशा अंगवळणी पडलंय. दुपारच्या जेवणाला कुठे जावं तर ऑर्डर घेणारा "How do you spell your first name" म्हणून अभ्यासाला बसणार, आपण त्याला शुद्धलेखन घालणार आणि तपासायची, आपलं  पिक अपची वेळ आली की त्याने केलेला उच्चाराचा गोंधळ आपला आपण निस्तरून "किती छान बोलतो आमचा बाळ", करून पुन्हा येरे माझ्या मागल्या करायला त्याच दुकानात जाणार.
 
यावर उपाय म्हणून माझ्या एका मैत्रिणीने एका ठिकाणी स्वतःच्या नावाचं आद्याक्षर वापरायचं ठरवलं म्हणजे एक तर शुद्धलेखनाचा वेळ वाचवा आणि पुन्हा याने काय उच्चारलं म्हणून रडायला नको. तर आम्ही दोघी गेलो आणि ऑर्डर झाल्यावर नाव म्हणून P अर्थात पि  लिहायला सांगितलं आणि आम्ही बाजूला झालो. तिकडे लंच टाइमचा नेहमीचा गोंधळ होता त्यात आमच्या गप्पा रंगात. 
 
कधी तरी तिथे पि चा धोशा सुरु झाला पण आमच्या दोघींच्या गावी ते कुठलं? नशिबाने ही एकाक्षरीवाली आमची युनिक केस असावी की काय पण ऑर्डर घेणाऱ्याच्या आम्ही लक्षात होतो (कदाचित रंगामुळे पण असेल) पण बिचारा वाट काढत आला आणि "your order is ready maa'm" म्हणून आवताण देऊन गेला. आता या "पि"ने गप्पपणे जेवण घ्यावं की नाही पण तरी तिने मताची पिंक टाकलीच "Everytime when people mess my name I feel bad about it. This time for change hope you got the taste of home medicine" 
 
आम्ही दुकानातून बाहेर गेल्यावर मला वाटतंय आमच्या (नसलेल्या) नावाची पिपाणी तिथे नक्की वाजवली असणार. 

7 comments:

  1. Starbucks are the best people who can screw up your name in a more innovative names than you could possibly imagine. I have drank coffee there as eram, haram, harm to name a few. And of course as H.

    ReplyDelete
    Replies
    1. स्टारबक्सवाल्यांच तर काय बोलूच नको. ऑफिसजवळच्या स्टारबक्सवालीने एकदोन वेळा स्वतःच माझ्या badge वरून नाव लिहून घेतलं पण बरिस्ताने पुन्हा गोंधळ घातलाच. इतक्यात मी माझ्या नावाचं "एपर्णा हे एक वर्जन ऐकलय :)
      बाकी तुझ्या नावांचे गोंधळ ऐकून तू हे राम म्हणून घेतलस का? ;) :)

      Delete
  2. एsss ओंssss

    "गोलमाल"मधली तुषार कपूरची भाषा शिकून घ्या... ;-)

    ReplyDelete
    Replies
    1. सिद्धार्थ, आधी मला वाटलं तू "हेओ" ला हाक मारतोयस:)

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.