Thursday, April 11, 2013

टिचक्यांच्या जगातली चार वर्षे

मुलाच्या निमित्ताने घरी राहताना मनात आलं म्हणून एक छोटी गुढी उभारली. त्यावेळी माहित नव्हतं याचं पुढे काय होईल पण व्यक्त व्हायला स्वतःच्या हक्काचं व्यासपीठ यानिमित्ताने मिळालं हे लक्षात आलं.मग काही खास अनुभव इथे मांडले गेले. 

पहिलं वर्ष थोडं धडपडीचं, मग नंतर फ़ेलो ब्लॉगर्सच्या सपोर्टमुळे जास्त उत्साहाचं, तिसर्‍या वर्षीदेखील बरेच फ़ॉलोअर्स वाढले आणि आज हे चौथं वर्ष पूर्ण होताना माझ्या ब्लॉगिंग कारकिर्दीला मागं वळून पाहताना जाणवतं ते माझं स्वतःचंच आता ब्लॉगिंग कमी करणं. म्हणजे ते ठरवून केलं गेलं नाही पण कदाचित वैयक्तिक जबाबदार्‍या वाढल्यामुळे असेल तितका नियमितपणा राहिला नाही.

सध्या फ़ेसबुकचे लाइक्स आणि गुगलप्ल्सचे अधिक, शिवाय ब्लॉगस्पॉट फ़ॉलोअर्स असं एकंदरित टिचक्यांचं राज्य आलंय. या टिचक्यांच्या राज्यात मला वाटतं प्रत्यक्ष दोन शब्द लिहिण्यापेक्षा सोपं पडतं म्हणून गुगल लाइक्स, फ़ेसबुक लाइक्स, गुगल प्लसवर शेअर करणं यांची संख्या अधिक दिसतेय. अर्थात लाइक्सच्या जमान्यात आपल्या पोस्टवर मिळणारी टिचकी हीच पावती आहे असं समजायला हवं.

इतक्यात ब्लॉगचे स्टेटस इ. पाहताना मी  पोस्ट टाकली नसेन तरी त्या त्या काळाशी मिळत्याजुळत्या पोस्ट्सवर पडलेल्या टिचक्या, नव्या पोस्टवरचे सोशल साइट्सचे शेअर इ. इ. चं प्रमाण वाढलेलं दिसतं. अर्थात माझं स्वतःचंही इतर ब्लॉग्जवर जाऊन बरेचदा तेच होतं त्यामुळे या टिचक्यांच्या जगातली चार वर्षे साजरी करताना माझ्या अपेक्षेपलिकडे वाढलेले फ़ॉलोअर्स तसंच इथल्या पोस्ट्स शेअर केल्यामुळे वाढलेले वाचक या सर्वांचे आभार मानण्याची एक संधी या वार्षिक पोस्ट्सद्वारे मी नेहमी घेते.

यावर्षी आमच्यासाठी खास म्हणजे काही महिन्यांपुर्वी राहायला गेलेल्या माझ्या नव्या  घरातला माझा पहिला गुढीपाडवा आहे. तर आमची तीच जुनी गुढी आणि नव्या किचनमध्ये उत्साहाने बनवलेलं ताजं श्रीखंड याचा आस्वाद घेतानाच आपल्याला येणारं वर्ष सुख-समाधानाचं जावो हीच मनोकामना. माझ्या स्वतःसाठी गुढीपाडव्याच्या मंगलमय दिवशी लिहिण्या-वाचण्याची बुद्धी द्यायची सरस्वतीस प्रार्थना :) 

ता. क. ही  पोस्ट  फक्त श्रीखंडासाठी थांबली होती  :)

7 comments:

  1. अभिनंदन्स.!
    अभिनंदन्स..!!
    अभिनंदन्स...!!!
    अभिनंदन्स....!!!!

    ReplyDelete
  2. मन:पूर्वक अभिनंदन!!!

    ReplyDelete
  3. अभिनंदन आणि नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा...

    ReplyDelete
  4. अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा :)

    ReplyDelete
  5. अपर्णा, तुला आणि ब्लॉग बाळाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा :) मला पाडव्यालाच आठवण आली होती , येऊन कमेंट लिहिणार होते पण राहून गेले. असो, पुढील वाटचालीस शुभेच्छा :)

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.