Sunday, January 15, 2012

पन्नासाव्या डेटची पहिली कहाणी

’ल्युसी’, हवाईमध्ये राहणारी एक मुलगी आपल्या बाबांच्या वाढदिवसासाठी अननस आणायला गेली असता झालेल्या अपघातात मेंदुच्या एका विशिष्त भागाला धक्का बसल्याने स्मृतिभ्रंशाच्या वेगळ्याच प्रकाराला सामोरी जाते. त्यानंतर ती रोज फ़क्त तोच १३ ऑक्टोबर जगते, ज्या दिवशी रविवार असतो आणि तिच्या वडिलांचा वाढदिवस असतो.
तिच्या या जागृत समाधीवर काही उपाय नसल्याने तिचे बाबा तिच्यासाठी हेही सुखकर व्हावं म्हणून तिला तोच दिवस आहे असं वाटावं याची शक्य होईल ती सोय करतात. तिच्यासाठी त्या दिवशीचं वर्तमानपत्र ठेवलं जातं. ती रोज तेच वाचते. नेहमीच्या ठिकाणी ब्रेकफ़ास्टसाठी जाते, मागवलेल्या वॉफ़ल्सचे त्रिकोण नाहीतर घरासारखे आकार करुन पुस्तकं वाचायची रविवारची सवय, मग घरी आल्यावर बाबांना तीच sixth sense ची कॅसेट गिफ़्ट देते. आधी ठरल्याप्रमाणे बाबा तिला भिंत रंगवायचं काम देतात. मग वर्तमानपत्रात वाचलं असतं त्याप्रमाणे वायकिंगचा गेम (तिला ठाऊक नसतं तिच्यासाठी कॅसेट टाकून ठेवली आहे) भावाबरोबर पाहताना त्याच पैजा. मग ती आधी दिलेली sixth sense ची कॅसेट पाहून पहिल्यांदीच पाहात असल्यासारखं त्यातल्या सस्पेन्सवर तिचं भाष्य. रोज तेच..तिच्या बेडरुमचा दिवा मालवला की मग लगोलग बाबा आणि भावाचं पुन्हा दुसर्‍या दिवसासाठी सारवासारव करणं...भिंत पुन्हा पांढरी करणं, वर्तमानपत्राची नवी प्रत काढणं, sixth sense ला गिफ़्ट रॅप करणं..
रोज हाच दिवस जगणार्‍या या मुलीच्या आयुष्यात त्या ब्रेकफ़ास्ट रेस्टॉरन्टमध्ये आलेला, एका मत्स्यालयात सील/वॉलरसचा व्हेट असणारा हेन्री येतो. तो तिच्या आयुष्यात येतो म्हणण्यापेक्षा ती त्याच्या आयुष्यात येते असंच म्हणायला हवं कारण सकाळी हिची पाटी पुन्हा कोरी होणार.
इथपर्यंत जर हटके वाटत असेल आणि त्यामानाने थोड्या इमो विषयावरही हलकाफ़ुलका चित्रपट बनू शकतो असं वाटत असेल तर पहायलाच हवा 50 first dates.
२००४ मध्ये आलेल्या हा चित्रपटाबद्दल मी आता का ब्लॉगवर लिहिते असा प्रश्न पडला असेल तर माझं आणि चित्रपटांचं नातं म्हणजे मी अगदी चित्रपटवेडी नाहीये आणि त्यातही मुख्य म्हणजे एकदा चित्रपट पाहिला तरी मी थोड्याच दिवसांत त्या चित्रपटाबद्दल विसरलेले असते. त्यामुळे मी काय पाहिलंय हे माझ्यापेक्षा ज्यांनी तो चित्रपट माझ्याबरोबर पाहिला असतो त्यांना जास्त लक्षात असतं.खूपदा दुसर्‍यांदा चित्रपट पाहताना मी याची शेंडी त्याला लावून एका वेगळ्याच चित्रपटाची पटकथा तयार होते.. आणि नट-नट्या यांच्या नावांबद्दल मी घातलेल्य गोंधळावर तर एक संपुर्ण वेगळी पोस्ट तयार होईल. या पार्श्वभूमीवरही काही हटके चित्रपट लक्षात राहिले जातात. या चित्रपटाततर विसराळूपणालाच खूप छानपणे सादर केल्यागेल्यामुळे हाही लक्षात राहणार हे माहिते त्यामुळे ही पोस्ट थोडीफ़ार माझ्या चित्रपटविसरभोळेपणाची माझी मलाच आठवण राहण्यासाठी.

image credit

14 comments:

  1. अरे, क्लास मुव्ही आहे !
    सगळ्यात भारी आहे तो 10 Sec Tom :D:D:D
    आणि हेन्री ने ल्युसी साठी गायलेले गाणे..
    Forgetful Lucy...

    ReplyDelete
  2. चित्रपट म्हणजे थोडा Out of Syllabus Topic. आधीच हेरंब, बाबा, आप, सुझे यांनी बझ्झवर ओतलेल्या लिंक्स पडून आहेत त्यात आत्ता तुझी भर... पर इतने लोग बोलते तो देखना तो पडेगा...

    ReplyDelete
  3. छान आहे पोस्ट! चित्रपट बघायला पाहिजेच असं वाटतंय! आभार!

    ReplyDelete
  4. मस्त आहे एकदम. आपला 'गोजिरी' याच्यावरून घेतलाय.

    ReplyDelete
  5. बिंगो दीपक....:)
    मला forgetful Lucy परत ऐकावं लागणार....:)

    ReplyDelete
  6. सिद्धार्थ माझा पण out of syllabus topic आधी होता पण देश सोडला आणि देशी परदेशी सगळे चित्रपट पाहणं आलं..आणि म्हटल तस सगळं लक्षात पण राहत नाही त्यासाठी हा लक्षात राहिला बहुतेक..तू नक्की बघ तुझ्या बायडीबरोबर..जोडीने बघण्यासारखा आहे....
    आणि अरे त्यासाठी आपल्या दिग्गज लोकांच्या पंक्तीत मला बसवू नकोस रे...माझं चित्रपट (अ)ज्ञान पाहून पळून जातील सर्व...:D

    ReplyDelete
  7. विनायकजी साधारण आवडेल (किंवा नाही आवडणार) इतपत कथानक मुद्दाम सांगितलय ...नक्की पहा आणि कळवा...

    ReplyDelete
  8. हेरंब हाबार्स...गोजिरी पण पाहून बघेन..

    इतक्यात एक मराठी चित्रपट पाहिला pursue of Happiness वरून बेतलेला (आणि ही प्रतिक्रिया देताना नाव अर्थातच आठवत नाहीये :D) चांगल मराठीकरण होतं..

    गोजिरी तसा काही असेल तर बर आहे....:)

    ReplyDelete
  9. मलाही आवडला होता हा चित्रपट. मराठीतला गोजिरी तर यावर बेतलेला होताच, हिंदीतला 'U, Me और हम' हाही, तोही ठाकठीक जमला होता.

    ReplyDelete
  10. प्रीती, हिंदी चित्रपटाच माहित नव्हत मला....आभार....

    ReplyDelete
  11. मी किती तरी वेळा हा सिनेमा पाहीला असेल. म्हणजे कुठूनही पाहायला सुरवात केली तरी चालते. :)”गोजिरी ’चं माहीत होतं पण हिंदीतही यावरुन सिनेमा आलेला आत्ताच कळलं.

    ReplyDelete
  12. कुठूनही पहिला तरी चालत न ग....म्हणून माझ्यासारखीला बर पडत....तस एक Princess Diary बद्दलही आहे माझ.....

    ReplyDelete
  13. Aparnaji;

    Masta watla wachun... pan Gojiri pahilay tya warun kalpana ali ha movie kasa asel.

    "Pursuit of Happiness" war betalela Marathi Moviecha naav pls athawa ani reply kara.

    Pahayla awadel... since English movies itka chaan ahe.

    Dhanyawaad!!! :)

    ReplyDelete
  14. संतोष, आपलं ब्लॉगवर स्वागत आणि आवर्जून लिहिल्याबद्द्ल खूप खूप आभार...
    मी एखादा सिनेमा इंग्रजी किंवा कुठल्या इतर चित्रपटावरून बेतला असेल तर मूळ चित्रपट पाहण्याचा प्रयत्न करते त्याप्रमाणे तुम्ही हा चित्रपट पाहिला तर कदाचित तुम्हाला काही जागा वेगळ्या, बॅरी ड्रुमोरचा निरागस अभिनय इ.इ. नक्की आवडेल..तेव्हा Fift first dates पाहायचा नक्की प्रयत्न करा...
    आणि हो तुमच्या त्या Pursuit of Happiness च्या कमेंटमुळे मला हसू आलं कारण खरंच मी नाव विसरले होते पण सुदैवाने मी ते नाव एका मैत्रिणीला मेलवर कळवलं होतं म्हणून आता तेही जुन्या पत्रपेटीत जाऊन शोधलं ....नक्की पहा..."अंकगणित आनंदाचे", छान घेतलाय..मला वाटतं श्रेय दिलं नाहीये पण पण पहा नक्की...मी Purisuit of Happiness दुसर्‍यांदा पाहूच शकणार नाहीये its really too much to handle emotionally ..आणि मुख्य हा सत्य घटनेवर आधारीत आहे so cant face the reality again.....
    Thanks again for refreshing myself...:)

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.