Monday, September 5, 2011

पुन्हा एकदा हूड हूड

ओरेगावात प्रथम आल्यावर मारे कौतुके माउंट हूड माउंट हूड म्हंटल आणि मग जिथून तिथून तो दिसतो म्हणून ब्लॉगवर लिहायचं राहिलं...पण त्याला विसरले नाहीये..मागच्या दीड वर्षात त्यानंतर खरं तर तो बऱ्याचदा दिसला..इथे आसपासच्या फिरतीच्या बऱ्याच जागा आता पायाखालून गेल्या आहेत...प्रत्येक वेळी नवी जागा मिळाली की असं वाटतं इथून जास्त छान दिसतो मग काढा फोटो आणि नाही काढला तर पुन्हा आहेच की 'परत येऊ रे एक दिवस'..



फक्त आता थोडी (माझ्या मुळात गोल असणाऱ्या) भूगोलात आणखी भर पडलीय ती म्हणजे अश्या प्रकारे जवळजवळ वर्षभर बर्फ असणारा इथे फक्त हूडच नाही तर त्याचे अजून चार मित्र आहेत...पैकी तीन मित्र आमच्या शेजारच्या म्हणजे वॉशिंग्टन राज्यात आहेत पण या दोन राज्यात मुख्य कोलंबिया नदीने घातलेल्या डिव्हायडरमुळे ते ओरेगावाच्या पोर्टलॅंड शहरातूनही तितक्यात जवळ असल्यासारखे दर्शन देतात. हे मित्र म्हणजे माउंट सेंट हेलेन्स, माउंट रेनीअर, माउंट अडाम्स आणि माउंट जेफरसन. पैकी माउंट हेलेन्स आणि हूड पोर्टलॅंड शहरात जा ये करायच्या मुख्य रस्त्यावरून प्रसन्न दिवशी नक्की दिसतात..

माउंट हेलेन्स तसं बाजूच्या वॉशिंग्टन राज्यात येतो आणि याबाबतीत खास सांगण्यासारखं म्हणजे या बऱ्यापैकी जागृत असलेला ज्वालामुखी आहे. १८४० आणि १८५० नंतर मे १९८० ला याचा सर्वात शेवटचा उद्रेक होऊन त्याची राख पोर्टलॅंड शहरावर पसरली होती. अगदी आतापर्यंत म्हणजे २००८ पर्यंतही याच्या तोंडाशी काही ना काही हालचाल सुरु असलेली नोंद केली गेली आहे..


माउंट रेनीअरहाही वॉशिंग्टन राज्यात असलेला तिथला सर्वात उंच १४००० फुटापेक्षा जास्त उंच आणि जास्त प्रमाणात ग्लेशिअल बर्फ असलेला आणि International Association of Volcanology and Chemistry of the Earth's Interior च्या पहिल्या सोळा डेंजरस डोंगराच्या यादीत असलेला पर्वत..अतिशय क्लिअर दिवस असतो तेव्हा पोर्टलॅंड तसंच जवळंच (पाच तास ड्राइव्ह) असणार्‍या कॅनडातील व्हॅन्कुव्हरहूनही दिसतो..


माउंट अडाम्स हाही असाच जागृत ज्वालामुखीवाला पर्वत. मुळात अनेकदा ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झालेले अनेक कोनाकृती आकार बाजूने दिसत असेल तरी विमानातून दिसताना थोडा फार रेनीअर सारखं वाटणारा कारण त्याचा वरचा भाग सपाट असल्यासारखा दिसतो. सल्फर असल्याच्या आशेने खाणीसाठी याचा वापर होईल का म्हणून इथे एक ट्रेल करून थोड फार उत्खनन करण्यात आलेला या भागातला हा एकमेव डोंगर आहे.










 













माउंट जेफरसन हा अमेरिकेच्या माझी राष्ट्राधक्ष्याच्या नावाने असलेला ओरेगावातलाच उंचीने क्रमांक दोनचा बर्फाच्छादित पर्वत ज्यावर खरं जास्त संशोधन झालं नाहीये पण यावरचा ज्वालामुखी अगदी अलीकडे १९७४ मध्ये जागृत झाला होता. आम्ही कधी इथे सागरकिनारी गेलो आणि येताना कोरव्हालीस म्हणून एक गाव आहे त्यामार्गे आले की हूड आणि जेफ़रसन भावाभावासारखे दिसत राहतात..












 











मागच्या वर्षात कोलंबिया नदीकाठच्या नितांत सुंदर रस्ता(scenice by way) फ़िरयला नेहमी जायचो तिथे एका information center मध्ये मिळालेल्या माहितीप्रमाणे शेरार्ड व्ह्यू पॉइन्ट केला त्यावेळी अचानक स्वर्ग गवसल्याप्रमाणे हे पाची मित्र एकाच ठिकाणी पाह्यला मिळाले...सगळ्यात प्रथम गेलो होतो ते मागच्या फॉलमध्ये...जायचा रस्ता म्हणजे आणखी एक डोंगर (लार्च माउंटन) आहे. वळणं वळणं घेत एका बाजूला चिनारची उंच झाडे आपल्या उंचीला येत पाहत वर गेलो की पहिले तर हूडहुडीच भरते..

मग गाडी खाली लावून आणखी एक पाव मैल दमछाक करून चढल की एका चौथर्‍याला फ़ेन्सिंग करुन ज्या दिशेला जो डोंगर दिसणार तिथे त्याच्या माहितीचे दगडी फ़लक आहेत. जर स्वच्छ सूर्यप्रकाशाचा दिवस असेल तर वर चढल्या चढल्या डोळ्यात भरतो तो माउंट हुड आणि दृष्टी वळवावी तसे त्याचे इतर भाऊबंदही टप्प्यात येतात. या ठिकाणी आणखी एक खास लक्षात येणारी गोष्ट म्हणजे इथे असलेली निरव शांतता.काही न बोलता फ़क्त हे डोंगर आणि त्याखालचं पाइनचं गर्द अरण्य डोळ्यात, मनात साठवुन घ्यावं.





इथुन खाली उतरताना निसर्गाच्या समृद्धीला जसा सलाम करावासा वाटतो तसंच कौतुक करायला हवं थॉमस शेरार्ड या फ़ॉरेस्ट सुपरवायजरचं , ज्याने असे काही पॉइंन्ट्स सर्वसामान्य लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध करण्याचं प्लानिंग केलंय...

12 comments:

  1. वाह वाह...मस्त माहितीपुर्ण पोस्ट :)

    ReplyDelete
  2. सुहास +१. फोटोही छान ! :)

    ReplyDelete
  3. झक्कासच फोटो आणि पोस्ट.. मस्त तपशीलवार फोटो.. आमचीही टूर झाली असं वाटतंय :)

    ReplyDelete
  4. सुहास आणि श्रीताई, हाबार्स...:)

    हेरंब, तुला ती टुर करायची असल्यास वाटाड्या म्हणून यायला आवडेल मला...:D

    ReplyDelete
  5. Photo blog chhan hota..pan dard se mera daman bhar de la tod nahi :). That was just superb and out of the world. Expecting many more of those kind.

    ReplyDelete
  6. रवींद्रजी ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार...
    "दर्द से मेरा" ची आठवण काढलीत आणि दुर्दैवाने आज दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झालाय...काय म्हणू...:(

    ReplyDelete
  7. मस्त! नॉर्थ-वेस्टला एकदाही गेलो नाहीये पण फोटो पाहून मस्त वाटलं!

    ReplyDelete
  8. आभारी सारंग..नॉर्थ वेस्टात एक ट्रीप कर जमल तर...खूप सुंदर आहे...तू या पोस्ट मधले फोटो पहा.

    http://majhiyamana.blogspot.com/2011/07/blog-post.html

    तुझा यायचा बेत नक्की होईल...:)

    ReplyDelete
  9. तुझ्या त्या आधीच्या पोस्टवरून मी एक पोस्ट ब्लॉगवर लिहिली होती .... आता पोस्टच नाव वाचतांना उगाच सलमानच्या हूड हूड दबंगची आठवण झाली.... :)

    बाकी माहिती आणि फोटू नेहमीप्रमाणे मस्तच... :)

    ReplyDelete
  10. हो तुझी ती पोस्ट माहिते मला..:) फोटू अजून चांगले हवे होते...नंतर फक्त माउंट हूडचे टाकेन असा विचार केला होता आणि विसरलेच...तुझ्या कमेंटवरून आठवलं तर शोधते...:)

    ReplyDelete
  11. पुढल्यावेळी नक्की!!

    ReplyDelete
  12. अगदी अगदी नक्की.... :)

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.