Saturday, January 1, 2011

सरत्या वर्षाच्या आठवणी...बाळ उतरे अंगणी

कुठल्याही वर्षात भलं-बुरं दोन्ही वाट्याला येणार हे कुणी न सांगता ठाऊक असलेलं सत्य. गेल्या गोष्टीच्या बेरीज-वजाबाकीला अर्थ किती याचा हिशेबही तसा व्यक्तिसापेक्ष बदलणार त्यामुळे हा आढाव घेतला तरी येत्या वर्षात पुन्हा नवी गोळाबेरीज होणार हेच खरे. २०१० कडे या दृष्टीने पाहिले तर माझ्याकडे घडलेल्या मुख्य घटनांचं सार म्हणजे एका नवीन जीवाचा जन्म.
त्याच्या आगमनाची सूचना ते त्याला हातात घेणं सारंच पुन्हा एकदा नव्याने अनुभवताना हे वर्ष कसं संपलं कळलंच नाही...अगदी आजुबाजुला होत असलेल्या काही कटू घटनांसकट...हा एकच जीव पण त्याच्यामुळे हे वर्ष कायम आठवणीत राहावं असंच..
त्याला यायचं होतं २५ डिसेंबरच्या दिवशी..म्हणजे scheduled arrival होतं सांताक्लॉजबरोबर...शेजारी-पाजारी, मित्र-मैत्रीणी सर्वांना या तारखेची उत्कंठा असताना प्रत्यक्षात मात्र काही कारणांमुळे आमच्या लाडक्या डॉ. केनेडींनी २० डिसेंबर नक्की केली. अर्थातच हे आम्हा तिघांमधलं गुपीत होतं...घरी येऊन कालनिर्णय पाहिलं तर हे planned arrival होतं नेमकं दत्तजयंतीच्या दिवशी..खरं तर नाताळपेक्षा ही तारीख मलाही आवडली..मागच्या पोस्टमध्ये ही दत्तजयंती स्पेशल असल्याचं का म्हटलं होतं कळलं ना??
पण पठ्ठ्याने सगळ्यांना चकमा दिला आणि स्वारी १० डिसेंबरच्या दुपारी अवतरलीच...scheduled, planned अशा सगळ्या arrivalsना आपल्या जागी ठेऊन "ऋषांक" बाळाने आपण आपलं actual arrival स्वतःच ठरवणार याचा जणू ऐलान केला आणि सगळं विश्व पुन्हा एकदा बाळपावलांनी व्यापलं....



प्लान्ड सी सेक्शन, त्यात आम्ही दोघंच नव्या बाळाचं आणि अडीच वर्षांच्या आरुषचं कसं करणार या सर्व विवंचना माझ्या बाळानेच नैसर्गिकरित्या जन्माला येऊन सोडवल्या आणि दुसरं अपत्य, त्यातही मुलगा(च) असला तरीही पुन्हा एकदा आई होताना मी सारं काही विसरले...ते ’आपलं’ बाळ असतं ही एकच गोष्ट आईला पुरेशी असते आणि आईला सारी मुलं सारखी असतात हे माझ्या आईने मला बरेचदा सांगितलेलं तत्व या बाळाच्या जन्मांनंतर त्याला हातात घेतल्या घेतल्या लगेचच उमजलं.
खरं तर या ब्लॉगमध्ये मागचे काही महिने सारख्या सारख्या येणार्‍या खादाडी पोस्टांमुळे कदाचित ’दाल में कुछ काला है’ चा वास काहीजणांना लागलाही असेल पण ते नेमकं कसं सांगावं हे कळत नव्हतं..आणि ते अगदी छान प्लान करुन सांगुया म्हणून अगदी दत्तजयंती पर्यंत ब्लॉगवर टाकायचे ड्राफ़्टही नोव्हेंबरच्या शेवटी करत होते..अर्थात everything happens for a reason असं जे म्हणतात त्याप्रमाणे आत्ता या पोस्टद्वारे ते गुपित ब्लॉगवाचकांसाठी उघड करुन एका सुट्टीची सुरुवात (जी खरं तर आधीच झालीय) करतेय..
म्हणायला सुट्टी..पण हे न संपणारं आईपण खरं तर पहिल्यांदी आई झाले तेव्हाचंच आहे..आता त्या जबाबदारीत आणखी एका गोड बाळाच्या आगमनाने भर पडलीय. या बाळाच्या आगमनापासून आता त्याला पाळण्यात घालताना जे गाणं घरी वाजतंय त्यानेच रजा घेते.

या ब्लॉगवरचा आपला लोभ असाच ठेवाल ही आशा आणि २०११ साठीच्या शुभेच्छा....

26 comments:

  1. आता बाळाची पावले जसजशी मोठी होऊ लागतील तसतसं ब्लॉगविश्वावरचं माझं पाऊल थोडं मागेमागे होत जाईल हे साहजिक आहे..त्या दत्तजयंतीच्या हिशेबाने काही काही गोष्टी ब्लॉगसाठी पण प्लान केलेल्या होत्या आणि यथावकाश ते ब्लॉगवर येईलही..पण तरी एकंदरित माझ्या आवडीच्या ब्लॉगांवर चटाचट प्रतिक्रिया देणं आणि इथल्या प्रतिक्रियांनाही उत्तरं देणं हे मात्र थोडं अवघड वाटतंय...तेही सांगण्यासाठी ही माझीच पहिली कमेन्ट..

    ReplyDelete
  2. मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा... :)

    ReplyDelete
  3. अभिनंदन तर केले आहेच , पण ब्लॉग वर पोस्ट जरी नाही, तरी फोटो नक्की घालत जा.. :)

    ReplyDelete
  4. अभिनंदन.....अन नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...:)

    ReplyDelete
  5. हे अ‍ॅप्स ! छान पोस्ट !
    पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन!

    ReplyDelete
  6. ब्ल़ॉग लिहिण्यापेक्षा जीवनाचा प्रवाह वाहता रहाणे महत्त्वाचे आहे.

    ReplyDelete
  7. अपर्णा,
    खूप खूप खूप शुभेच्छा, तुम्हा तिघांना आणि फोटोतल्या इलूश्श्या पायांना! :)
    नविन वर्षाची इतकी गोड सुरवात, क्या बात है! आता तुला हिरकणीलाही मागे टाकून पदर आपलं, टिशर्ट खोचायला पाहिजे.. ;)

    ReplyDelete
  8. पुन्हा एकवार अ्भिनंदन आणि शुभेच्छा! नवीन वर्ष खूप खूप आनंदाचे जावो.

    ReplyDelete
  9. अभिनंदन!:)छान वाटले बातमी ऐकून! पिल्लू चे नाव पण मस्तच आहे,'रुशांक' ....अपर्णा अजून busy झालीस.... :) २०११ साठी खूप साऱ्या शुभेच्छा !!

    ReplyDelete
  10. हार्दिक अभिनंदन.

    आणि तुम्हा चौघांना नवीन वर्षाच्या खुप खूप शुभेच्छा.

    ReplyDelete
  11. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन...
    तुम्ही भर दुपारी बझ्झ करू शकण्यामागचे कारण देखील आत्ता माझ्या लक्षात आले. बाळराज्यांची कृपा नां?

    ReplyDelete
  12. त्रिवार अभिनंदन !!! 'दत्तजयंती स्पेश्यल' पोस्ट आवडेश :)

    ReplyDelete
  13. रोहन, महेंद्रकाका, योगेश, दीपक, शरयु, मीनल, श्रीताई, श्रिया, सचिन, सिद्धार्थ आणि हेरंब आपल्या प्रतिक्रियांबद्दल मंडळ आभारी आहे.

    महेंद्रकाका, फ़ोटू सोशल साइट्सवर टाकेन जमेल तसं...

    मीनल, अगं तुझ्या डोक्यात जी हिरकणी पोस्ट आहे नं नेमकं त्यादिवशी पण पोटात एक आणि बाहेरचं एक असं दोन्ही सांभाळत टी-शर्ट खोचायचा होता आता तर काय नं. २ बाहेर आलंय म्हणजे सारखंच हिरकणी मोडमध्ये राहावं लागणार बघ....

    सिद्धार्थ, बाळराजांच्या कृपेने मी ब्लॉग नाही पण बझ आणि अशा सोशल ठिकाणीतरी भलत्या वेळेत असते आणि थोडं माझंही विश्व राहातं.....

    ReplyDelete
  14. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन ....!!!

    ReplyDelete
  15. नवीन वर्षाच्या व ब्लोगला शुभेच्छा,अभिनदन , ब्लोग आवडला , मस्त ,

    ReplyDelete
  16. आभारी देवेंद्र आणि महेशकाका...

    ReplyDelete
  17. अभिनंदर अपर्णा...
    अन नववर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!!

    ReplyDelete
  18. हाभार्स बाबा....
    नववर्षाच्या शुभेच्छा तुलाही...

    ReplyDelete
  19. अभिनंदन
    फेसबुकवर फोटो पहिले.
    गोड आहे पिल्लू :)

    ReplyDelete
  20. हाबार सागर...तुलाही शुभेच्छा नव्या नोकरीसाठी...:)

    ReplyDelete
  21. Dear Aparnatai,

    Tumhi post lihine band ka kelet - may be busy with ur baby - pan please tumhi lihit raha - tumchya lihinyamadhe ek sachhepana aani vastav aahe - nustech goad goad lihit nahi tumhi :) so tumche likhan khupach realistic vatate (unlike some other blogs ;) you may imagine which blog i m talking about
    Anyways plz plz do continue writing :)

    Thanks
    Meera

    ReplyDelete
  22. निशा/मीरा,

    सर्वप्रथम ब्लॉगवर स्वागत आणि आवर्जुन लिहिल्याबद्द्ल अनेक अनेक आभार...
    अगं तुझं खरंय बाळाने सारंच विश्व व्यापलंय. त्यामुळे बरेच दिवसात काहीच नवं लिहिलं गेलं नाहीये...म्हणजे लिहायचंच नाही असं नाहीये..फ़क्त कधी मुहुर्त येईल ते सांगता येत नाही..तोवर तू जुनं लिहिलेलं वाचून त्यावरही मत दे...:)
    आणि हो अगं जमलं तर पुढच्यावेळी ताई आणि तुम्ही ऐवजी सरळ अगं अपर्णा म्हटलंस तर आणखी बरं वाटेल....आभार पुन्हा एकदा...

    ReplyDelete
  23. hi Aparna ,
    Mi navin aahe tula pan tuzi aani mazhi same case aahe mhanun sangte maza pan dusra mulga "Kush" planned c-sec vagalun aadhich hajar zala ......that was very exciting aani its really a nice feeling to be a mother again the new arrival get love from 3 .....
    ok bye

    ReplyDelete
  24. प्रतिक्षा, सर्वप्रथम स्वागत आणि खास तुझा अनुभव लिहिलास त्याबद्द्ल आभारी..तुला ही पोस्ट वाचताना जास्त टची वाटलं असेल जसं मला तुझी प्रतिक्रिया पाहून वाटलं अशी आशा आहे....अशीच येत जा जमेल तसं आणि तुलाही "कुश"साठी अनेक अनेक शुभेच्छा..

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.