आज २२ एप्रिल म्हणजे जागतिक वसुंधरा दिवस...ही पोस्ट वाचेपर्यंत भारतात साजरा होऊन संपलाही असेल कदाचित.पण मराठी मंडळीवर वेळेवर एक पोस्ट टाकली होती. ती इथे आहे...त्यातलचं या पोस्टमध्ये लिहिण्यापेक्षा एक पृथ्वीच्या वाढत्या तपमानाबद्दल एक माइंड मॅप आला होता काही दिवसांनी तो (ज्यांनी कुणी बनवला त्यांचे आभार मानुन) आज टाकते आहे..बाकी याच विषयावर मागच्या वर्षीही लिहिलंय आणि दरवर्षी उल्लेख होईल..तेवढीच एक माझी या save earth साठीच्या सागरातली छोटीशी ओंजळ..
तुझे तिन्ही म्हणजे 'मराठी मंडळी' वरचा, गेल्यावर्षीचा आणि हा असे तिन्ही लेख वाचले. सगळ्यावर एकदम प्रतिक्रिया देतो. खूप छान निरीक्षणं आहेत. म्हणजे पाण्याचा कमी वापर, ओला सुका कचरा, निर्माल्य वगैरे माहित होतं. पण "फळांच्या बिया निसर्गभ्रमंतीला गेल्यावर टाकणे, कमी पॅकेजिंग असलेल्या गोष्टी खरेदी करणे" हे मला आवर्जून आवडले..
ReplyDeleteहेरंब, आभार..अरे यापैकी ते बिया टाकणं मी भटकंतीत एकजण करायचे त्यावरुन शिकले आणि दुसरी टिप N.P.R. च्या एका कार्यक्रमात मिळाली..
ReplyDeleteशाळेतून जेव्हां जेव्हां आम्हांला कॅम्प, सहलीनां नेले जाई त्या सगळ्या ठिकाणी फुलांच्या व फळांच्या बिया ( आम्हीच खाल्लेल्या ) टाकायला लावत. हा नकाशा छानच आहे. मराठी मंडळावरची पोस्टही आवडली. गेली वीस एक वर्षे घंटागाडी फिरते आहे त्यामुले हे ओला-सुका कचरा गणित हाडीमासी रूजलेय. इथे मी बॅकयार्डमध्येच एक ड्रम आणून खत तयार करत असे. सोलारचा वापरही फारच उपयोगी.
ReplyDeleteखरंय गं श्रीताई...अगं सोलार इथे तर खूप वापरतो...भारतात अजुन आहेत का माहित नाही पण सुरुवातीला महाग पडतं असं ऐकलंय...जाता जाता नवल म्हणजे जिथे सुर्याचं राज्य कायम तिथे सोलार वस्तु नाहीत आणि इथे थंडीत चारला अंधार तरी बागेतले दिवे सोलारचे....काय म्हणायचं???
ReplyDeleteआमचा ग्रूप डिग्री पासून अपारंपारिक उर्जा यावर काम करतोय...ज्यामध्ये आम्ही शेततळं, बायो गॅस,रेन वॉटर हारवेस्टिंग या सगळ्यावर काम करतोय... आम्हीसध्या तरी सामान्या माणसाला शक्य होतील अशा किमती मधे या डिझाइन्स होऊ शकतील का?? यावर शोध काम चालू आहे.... बघू पुढे खूप सारे प्लॅन आहेत.....सध्या हाफिस अन् हे काम अशी दुहेरी कसरत चालू असते!! अपारंपारिक उर्जा वापरणे हे अत्यावश्यक झाले आहे!!
ReplyDeleteयोगेश हा तर फ़ारच उपयोगी प्रकल्प आहे..शुभेच्छा आणि मी काही मदत करु शकत असेल तर नक्की मेल कर....
ReplyDeleteकालच डिस्कव्हरीवर पण एक मस्त कार्यक्रम पाहिला या संदर्भात. छोट्या छोट्या गोष्टींमधुन आपण आपला सहभाग देवु शकतो. प्लस्टीकच्या पिशवीचा वापर कमी करायचा मी प्रयत्न करणार आहे.
ReplyDeleteसोनाली
सोनाली माझिया मनाची आठवण आलीस की निदान सामानासाठी घरुन पिवशी घेऊन जा गं...बरं वाटेल मला...:)
ReplyDeleteधन्यवाद अपर्णा...काही मदत हवी असेल तर नक्की मेल करेन..:)
ReplyDeleteमाईन्ड मॅप आवडला .. एक नंबर !
ReplyDelete