अरे काय सांगत होते...पाहिलं इथल्या जाहिरातींचा विषय काढला की असं भरकटायला होतं...बरं आता मंदीपण आहे, मोठी लोकं आजारी असतील..पण लहान मुलांचं काय तर त्यांनाही ADHD आणि सगळी एबीसीडी वाले आजार, त्याचं औषध आणि तेच ते वरचं रामायण ऐकुन ऐकुन कान किटलेत...एकही अशी जिंगल पण नाही की प्रॉडक्ट मरो पण गाणं आठवतंय...छ्या...प्रगत प्रगत म्हणताना या बाबतीत कसे इतके मागासलेले बुवा असला विचार येतो...
किती वेळा या असल्या रद्दड जाहिराती पाहुन वैतागलेले आम्ही (आमच्या वेळच्या) जाहिरातींच्या आठवणी काढत बसतो...अगदी "कुछ खास है" मधली स्लोमोशनमध्ये धावणारी ती मुलगी किंवा "जलेबी???" म्हणणारा मुलगा (पाणी आलं यार....(तोंडातुन हो...)) नाहीतर "बुस्ट इज द सिक्रेट ऑफ़ माय एनर्जी" हे कसं बरं लक्षात राहिलं......या पार्श्वभुमीवर आताच ताज्या मेलनी आलेल्या या जाहिराती मलातरी थोडं ताजंतवानं करुन गेला..हे फ़ोटो म्हणजे माझ्यासारख्या जाहिरातींसाठी आसुसलेल्या मनाला दुधाची तहान ताकावर...काय???
सशक्त दातांसाठी??
नेरोलॅक पेंट सुकलं सुद्धा....
धारदार चक्कु...
Karate school of Martial Arts.
If you drink don't drive
जाड केसांसाठी...
ये फ़ेविकॉलका मजबुत जोड है भैया..
थंडा मतलब???
हाय ये सफ़ेदी....
Bhaaarrriiii......!!!!
ReplyDelete:)
:) :)
ReplyDeleteझक्कास.... अगं ती जाड केसांची आणि डोन्ट ड्राईव्हची एकदम अप्रोप्रिएट...च च... इंग्रजीत... आजकाल डोकं जरा हलकं झालयं नं मेले योग्य ते शब्द म्हणजे चपखल बसणारे गं आठवतच नाय येळेवर... ही ही...
ReplyDeleteमस्त, अशीच एक सुंदर जाहीरात मला आवडते, सेव ट्रीज, ट्रीज सेव वाली.
ReplyDeleteईथे बघ, तुला नक्कीच आवडेल/आवडली असेल..
खरंय ग. हा देश अनेक बाबतीत मागासलेलाच आहे अजून. जाहिराती, मोबाईल फोनचे प्लान्स, त्यांची contracts अजून काय काय. असो.
ReplyDeleteजाहिराती मस्तच आहेत. मला धारदार चक्कू आणि कराटेच्या सगळ्यात आवडल्या.. सही.
अगं श्रीताई, जाड केसांची जाहिरात पाहुन माझ्या डोळ्यात पाणीच आलं...ही ही....काही वेळा इंग्रजीला मराठी शब्द मिळाले तरी वापरायची पंचाईत होते...(पहा: वरचा एक कंस)
ReplyDeleteआनंद, मस्त आहे तुझी लिंक...मी पाहिली नव्हती आधी...
ReplyDeleteहेरंब मला वाटलंच होतं तुझं या देशाच्या मागासलेपणाबाबत अनुमोदन असणारे....after all greats minds...(पक्षी: घशातल्या घशात दोनदा घरघरल्यासारखा आवाज) ....असो..या विषयावर काही काही पोस्टांमधुन प्रकाश पाडण्याची गरज आहे....:)
ReplyDeleteचक्कुची जाहिरात एकदम मस्तच आहे नं?? मी अजुन आमच्या चक्कु-दे-मलिक ला दाखवली नाहीये....(जाहिरातींचा पण धसका घेतलेला बरा...)
फर्मास..झकास..सुपर्ब..क्रियेटिव :)
ReplyDeleteकराटेवाली आणि फेवीकॉल वाली जाहिरात आवडेश
सुहास जाहिरातजगतात काम करणारी आपल्याइथली माणसं महान आहेत....:)सगळ्या कॉमेन्ट्स त्यांना समर्पित..
ReplyDeleteजाहिरा्तीचे सगळेच फ़ोटो छान आणि क्रीएटीवीटी ठासुन भरलेले आहेत...कराटेची जाहिरात तर एकदम झक्कास...खरच ताजतवान करणार्या आहेत हया जाहिराती...जाहिरातीचच नाव काढलत तर सध्या आयपीएलचे सामने चालु असतांना येणारया झुझु च्या जाहिराती खुपच क्रिएटीव असतात..शिवाय लहानांपासुन मोठ्यांना त्या आवडतात...बाकी जुन्या जाहिरातींची तर गोष्टच वेगळी...
ReplyDeleteनिरमा, रिन, आणि फेविकॉल च्या सगळ्याच जाहिराती लक्षात आहेत. कोलगेटचे ’सुरक्षा चक्र’- सकाळी कोलगेट उघडली की टिंग आवाज कधी येतो म्हणुन नकळतच वाट पहायचॊ.. इतका जाहिरातींचा असर होता आमच्यावर.
ReplyDeleteसगळे फोटो पळत पळत पाहून घेतले! लय भारी!!!! क्लोज अपची "पास आओ" माझी सगळ्यांत फेवरिट आहे, ती का नाही टाकली गं..!!!
ReplyDelete;)
देवेंद्र, झु-झु च्या जाहिरातीबद्द्ल अनिकेतच्या ब्लॉगवर वाचलं होतं आणि मग नंतर काही झी मराठी होतं तेव्हा पाहिल्या होत्या..मस्त आहेत त्या पण...इथला टि.व्ही.जाहिराती लागल्या की दुसरी चॅनेल लावलेलंच बरं असं आहे त्यामुळे जाहिराती जाहिरातीसारख्या कार्यक्रमांमध्ये पाहाणं खरंच मिस करतो...
ReplyDeleteमहेंद्रकाका, निरमाची जाहिरात तर अजरामरच म्हणावी...आमच्याकडे ती मुलगी नंतर कुठल्या आजाराने गेली असं काहीतरी पण लोकं बोलायचे..खरं खोटं माहित नाही..रिनची जाहिरात पण खूप लक्षात आहे.....
ReplyDeleteविश्ल्या, अरे हो "पास आओ" ही जिंगलपण मस्त आहे...या मला मेलमध्ये आलेल्या जाहिरातींची चित्र लावली आहे.................वेळात वेळ काढल्याबद्द्ल धन्यवाद पण अभ्यासाला बस पाहु...:)
ReplyDeleteमस्त आहेत सगळ्या जाहिरातिंचे फोटो.
ReplyDeleteमधे एकदा मेलवर असेच खुप क्रिएटीव जाहिरातींचे फोटो आले होते ते पण खुप मस्त होते मिळाले तर पाठवते.
मला तर कधि कधिमुळ कार्यक्रमापेक्षा जाहिरातीच बघायला आवडतात.
अगं सोनाली मला पण जाहिराती पाहायला आवडायचे म्हणून तर इथे त्याही मिस करतोय....इथल्या जाहिराती म्हणजे टॉर्चर आहे...
ReplyDeleteसशक्त दात, कराटे, जॉनी वॉकर.. (सगळ्याच)मस्त आहेत..
ReplyDeleteया जाहिरातींमधे अतिशयोक्ती असते, आणि तिच आपल्याला खूप आवडते नां?
(अगं, च्यामारिकेच पेटंट नाहीये. पुढच्या वेळी नाव टाकल नाहीस तरी चालेल..मी दावा नाही ठोकणार तुझ्यावर:))
ठांकु मीनल...अगं खरं मी लिंक देणार होते..पण तशी मी खूप आळशी आहे...
ReplyDeleteआणि तुझं निरीक्षण पटेश...
Bhariiiiiii
ReplyDeleteधन्यवाद सायली आणि blog वर स्वागत.
ReplyDelete