एक निवांत दुपार/संध्याकाळ मिळालीय आणि कुठेतरी थोडं एलेगन्ट, अपस्केल तरी फ़ॅमिलीश रेस्टॉरन्ट हवं असेल तर चीजकेक फ़ॅक्टरी हा त्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकेल..बाहेरून पाहिलं तर थोडंसं मिडल इस्टर्न राजवाड्यासारखा लुक आत गेल्यावरही नजरेत भरेल असा ऍंबियन्स आणि मुख्य म्हणजे अप स्केल रेस्टॉरन्टमध्ये असणारी भयानक शांतता नावालाही नाही. सगळीकडे चहलपहल...आतमध्ये गेल्याक्षणीच आवडेल अशी ही अमेरिकन चेन मी जवळपास सगळीकडेच पाहिली. फ़क्त फ़िलीत आम्हाला जरा अर्धा तास तरी लांब होती इथे थोडी जवळ आहे म्हणून खास लक्षात ठेऊन जाऊन घेतलं.
१९४० च्या दशकात डेट्रॉईट मध्ये एव्हलिन नावाची एक महिलेने स्वतःच्या चीजकेक रेसिपीने एका छोट्या चीजकेकच्या दुकानाने सुरुवात करुन मग पोटापाण्यासाठी दुकान गुंडाळून सरळ मोठ्या दुकानांना चीजकेक पुरवणारं हे जोडपं १९७१ च्या सुमारास सगळा बोजा बिस्तारा लॉस एंजल्सला हलवुन मोठं म्हणजे ७०० चौ.फ़ुटाचं चीजकेकचं दुकान काय थाटतात आणि अगदी अथक परिश्रमाने आपले हे केक सगळ्या होलसेल दुकानांमध्ये पोहचवता पोहचवता शेवटी १९७८ ला त्यांचाच मुलगा डेव्हिड कॅलिफ़ोर्नियाच्या बेव्हर्ली हिल्स भागात चीजकेक फ़ॅक्टरीचं पहिलं रेस्टॉरंट उघडतो आणि तेही या व्यवसायाचा विशेष अनुभव नसताना, आपल्यासाठी सगळंच नवल. त्यानंतर तीसेक वर्षांनंतर संपुर्ण अमेरिकेत असलेली त्याची १५० रेस्टॉरंन्ट्स हा यशाचा दाखलाच नव्हे का? आणि चीजकेक ही जरी इथली नावाजलेली डेलिकसी आहे तरी इथलं साधारण सगळच अन्न खाऊगल्लीत फ़िरणार्यांनी जरुर चाखावं असं निदान आमचं मत.
साधारणत: अशा रेस्टॉरन्टमध्ये बार आणि रेस्टॉरन्ट असे दोन विभाग असतात..आता नावातच चीजकेक आहे म्हटल्यावर इथे बेकरीचाही एक छोटा विभाग आहे जिथे अनेक पद्धतीचे चीजकेक आणि इतर काही बेकरी विकत घेता येऊ शकते. साधारण २०० पदार्थ असणारा त्यांचा मेन्यु इतका मोठा आहे की तो वाचण्यातच केवढातरी वेळ जाऊ शकेल म्हणजे एकंदरितच होऊ द्या निवांतसाठी संधीच....अर्थात गरज पडल्यास मदतीसाठी तुमच्या टेबलचा वेटर/वेट्रेस सज्ज असतात म्हणा..
यांच्या लंब्या चौड्या मेन्युबद्द्ल छोटंस उदा. द्यायचं तर नुस्ते ऍपेटायजर्सचेच अगदी मेक्सिकन केसिडियाज इ. पासून ते एग रोल्स, क्रॅब केक, लेट्युस रॅप्स अशा असंख्य तर्हा उपलब्ध आहेत. आणि काही काही शाकाहारी पर्याय जसं स्वीट कॉर्न केक, वॉकॉमोली, नाचोस हेही खाता येईल...आज मात्र अगदी आयत्यावेळी ठरल्यामुळे आम्ही तडक जेवणावरच हल्ला करायचं ठरवलं त्यामुळे जास्त त्या भानगडीत न पडता कामाची पानंच चाळली...तोवर फ़क्त एक जास्मिन आइस टी मागवला आणि फ़ारसं कधी हिरव्या चहाच्या वाटेला न जाणार्या माझ्या नवर्याला चक्क तो आवडलाही. तसंच तिने फ़ॅक्टरीवाल्यांतर्फ़े पाव आणि बटर आणून दिले. त्यातला ब्राउन ब्रेडवर लोणी लावलं की केकला मागं सारील अशी चव आहे. दुसरा साधा ब्रेड इतकाच काही मला आवडत नाही.पण हे खात बसलं की तडक जेवलेलंच बरं म्हणून आम्हीतरी यावेळी ऍपेटायजरच्या फ़ंदात पडलो नाही.
मेन्युवर स्मॉल प्लेट्स आणि स्नॅक्सचाही पर्याय होता पण त्यात काही आम्हाला रस नव्हता. मुख्य पदार्थातही तर्हेतर्हेचे पिझ्झे, काही लंच स्पेशल्स, पास्ता, बर्गर, खास स्पेशालिटी आणि स्टेक्स इ. पर्याय होते. पैकी पिझ्झाच खायचा तर इथं कशाला आणि बीफ़,पोर्क खात नाही म्हणून निदान आम्ही उरलेल्या मेन्युवरच लक्ष केंद्रित करु शकलो तरीही लंच स्पेशल्स मधलं रेनेज (रेने ही एव्हलिनची मुलगी) स्पेशल मला त्यादिवशी थोडं खुणावत होतं. सुप, सलाड आणि चिकन किंवा टर्की सॅंडविच असा साधा-सोपा पण आता इथं बाहेर खायची सवय झाल्यामुळे आवडणारा पर्याय आहे. एक म्हणजे त्यात आपल्याला सगळं थोडं थोडं खायला मिळतं, पुर्ण जेवल्यासारखंही होतं आणि नाहीच त्यातलं काही आवडलं तरी निदान ट्राय करु शकतो असा एकंदरित अनुभव आहे. त्यामुळे मी तरी तेच घ्यायचं ठरवलं. स्पेशालिटीमधुन व्हाइट चिकन चिली मला टेम्प्टिंग वाटलं होतं पण नवरोबाची पसंती क्रिस्पी चिकन कॉसोलेटाला होती.कदाचित त्याबरोबर साईडला मॅश पोटॅटो आणि फ़क्त ऍस्परॅगस (शतावरी) असल्यामुळे असेल अशी एक (कु)शंका मला आली कारण इथल्या पद्धतीने उकडून मीठ-मिरी लावलेल्या भाज्या खाणं त्याला आवडत नाही आणि मग त्या फ़ुकट जातात त्यापेक्षा कशाला ती अनेक भाज्यांची भाऊ(की भाजी)गर्दी??
चला थोडं गप्पा मारतोय तोच जेवण समोर आलं आणि ताटं पाहुन नाही म्हटलं तरी भूक खवळलीच. माझी ऑर्डर देताना मला एकच प्रश्न होता तो म्हणजे आज नेमकं सुप ऑफ़ द डे क्लॅम चाउडर होतं आणि आतापर्यंत जिथे जिथे ते मी खाल्लंय तिथे त्याच्या वासामुळे मला ते कधीच खूप आवडलं नव्हतं. त्यामुळे ते बहुतेक नवर्याच्या पानात जाईल असा माझा अंदाज होता. पण नेमकं पहिल्याच चमच्याला अहाहा...अगदी क्रिमी आणि कुठलाही वास न येणारं ते सुप आम्हाला दोघांनाही आवडलं..सॅलडही ओव्हरड्रेस नव्हतं, बहुतेक बल्सामिक व्हिनेग्रेट असावं आणि गरम सॅंडविच ज्यात सढळहस्ते मेयो असतं ते छानंच लागतं हे वेगळं सांगायला नको...आणि त्या स्पेशालिटी चिकनचं वर्णन काय करावं..चिकन ब्रेस्टला चांगलं ठोकुन(फ़ुड टि.व्ही.वर तरी मी त्यांना ठोकतानाच पाहिलंय म्हणून इतकं आत्मविश्वासाने लिहिलंय) पातळ करुन ब्रेडच्या चुर्यात घोळवून लेमन सॉसवाली, बटरमध्ये खरपुस (जवळजवळ) तळलेली ती चिकन अगदी क्रिस्पी, छानच होती...मॅश पोटॅटोला लाल बटाटाची स्किन अधेमधे दिसत होती आणि चवही अति क्रिमी नव्हती. शतावरी खायला मला असंही आवडतं त्यामुळे तो नाही तर मी तरी ती खाल्लीच असती.
आजचा एक खादाडी दिवस खर्या अर्थाने सार्थकी लागला होता..निमित्त असं काहीच नव्हतं पण मागच्या मायदेश दौर्यावरून परत आल्यापासुन म्हणजे दिड वर्षांनी चक्क दोघंच जात होतो आणि नेहमीप्रमाणेच जास्त प्लानिंग न करता...लेकरू त्याच्या पाळणाघरात आणि आम्ही दोघं घरी असा समसमासंयोग जुळून आल्यामुळे हे सारं जमलं होतं..या दोन गच्च प्लेट खाऊन पोटोबा इतके भरले की जोतिबाला जाऊन भंडारा न लावल्यासारखं चीजकेक न खाता आम्ही बिल मागवलं. पण जाता जाता पावलं बेकरीकडे कधी वळली आणि घरच्यासाठी चीजकेक कसा हातात आला कळलंच नाही....

Yuuuuuummmyyyy..
ReplyDeleteअजुन काही शब्दच नाहीत बघ :)
:D
ReplyDeleteयमयमीत दिस्तंय... मूड छान टवटवीत झाला !
एकदा जाईन आता चीजकेक फॅक्टरीत. जवळच आहे.
yuuuuuuuuuupppppppp सुहास...
ReplyDeleteहम्म हेरंब आता ते मेन्यु यंज्व्याय करायचे दिवस खरंच आठवावे लागतात म्हणून मग अशा भानगडी करुन जावं लागतं...तुला तिथे शाकाहारी पर्यायपण मिळतील कधीतरी ट्राय कर...
ReplyDeleteनॅक्बा, त्येवडं त्ये मोट्या म्येनुचं धेनात असु द्या...न्हाईतर आमाला शिव्या पडतील...
ReplyDeleteहे जस्मिन टी नक्की काय हाय.... आपल्या ग्रीन टी सारख हाय का??? बगायला तर झॅक वाटतय!!! फोटू भारी आलेत बगा. . .मजा करताय!!
ReplyDeleteयोगेश, तो ग्रीन टीचाच एक प्रकार आहे...थोडा वास आणि चव जास्मिनी...बाकी काय संधी मिळाली की करुन घेतो थोडी मजा..
ReplyDeleteकेक म्हणजे अगदी वीक पॉईंटच, वर्णन तर मस्तच आहे चीजकेक फॅक्टरीचे.
ReplyDeleteखरचं मला पण असं 'a' ला त्याच्या आजीकडे ठेवून मोकळेपणी साउथ मुंबईत भटकायचेय, बघुया कधि जमते ते :)
सोनाली
वाटलेलच.. ;) आज ऑनलाइन आल्यावर खादाडी पोस्ट तयार असणार ते... :)
ReplyDeleteअपर्णा.. येताना ज़रा स्टोक घेउन ये गं... :D आणि हो फोटोबद्दल काही बोलायलाच नको...
वा! तोंडाला पाणी सुटले. न्यू जर्सीतल्या चीज केक फॅक्टारी मध्ये एकदा जाण्याचा योग आला होता. प्लेट एवढी भरून देतात की दोन वेळचे जेवण होईल.
ReplyDeleteमज्जा आहे बुवा, फोटो बघुन तोंडाला पाणी सुटेश (हेरंब उवाच)...
ReplyDeleteजेवण करून आलो होतो तरी भूक लागली परत ;)
ReplyDeleteसोनाली धन्यवाद..अगं मला वाटलं होतं की तुला तिथे असं अधुनमधुन भटकायला मिळतही असेल..आम्हाला इथे तसा आधार फ़क्त पाळणाघरांचाच असतो...
ReplyDeleteरोहणा, मी ढीग घेऊन येईन रे स्टॉक..पण माझी बॅग उघडणारी माकडं केक ठेवतील असं वाटतं का तुला??
ReplyDeleteनिरंजन हे बाकी खरंय इथे बाहेर जवळजवळ बर्याच ठिकाणंचं लेफ़्ट ओव्हर मला दुसर्यावेळी पुरतं..त्यामुळे आजकाल दोघंच असलो की ऍपेटायझर मागवावं का याचा विचारच पडतो...
ReplyDeleteभा.पो. आनंद.
ReplyDeleteविक्रम, अरे त्याला डेझर्टची भूक म्हणतात...:)
ReplyDeleteमस्त टेस्टी आहे एकदम.
ReplyDeleteधन्यवाद सिद्धार्थ...:)
ReplyDeleteयम्मी...खुपच यंज्वाय केलात तुम्ही...पण एक गोष्ट लक्षात ठेवा इथे असे फ़ोटो टाकुन आम्हाला पिडायच असेल तर ते खाताना थोड तरी आमच्या नावाने बाजुला काढुन टाकत जा ..नाहितर पुढील स्थितीस आम्ही जबाबदार राहणार नहीत याची नोंद घ्यावी...:)
ReplyDeleteहा हा देवा आधीच सांगलं मी तुला हम इसी पाठशाला के हेडमास्टर रह चुके है...ही गोष्ट तशी बरीच जुनी आहे त्यामुळे काकबळी नाही काढला तरी डरने की कोई बात नही है....:)
ReplyDeleteअगं किती मेला हा छ्ळ... तोंडाला पाणी सुटलेयं... चीजकेक तो अभी खानाच पडेगा... ऐसे भी खुदके थोडे लाड करनेकी जरुरत हैं... हा हा... मस्तच गं.
ReplyDeleteश्रीताई तू आता बाहेर पडलीस की पहिली चीजकेक फ़ॅक्टरीमध्येच जा...मस्त मजा कर आणि लाड करून घे..इथे आपले लाड रेस्टॉरंटवालेच करु शकतात तसंही..:)
ReplyDeleteपरत एकदा wow!!
ReplyDeletebtw हा चीजकेक किती कॅलरीला पडतो? आमच्यासारख्यांना खाउन चालणार नाही..:)
हे बघ चीज म्हटलं की कॅलर्या-बिलर्या विसरायच्या...आणि तुला एक सांगते कितीही आवडला आणि पट्टीचा खाणारा असला तरी चीजकेक एक छोटा त्रिकोणी तुकड्याच्या पुढे खायला होत नाही...ट्राय कर..एकदम गच्च होतं पोट लगेच...
ReplyDelete