Tuesday, April 13, 2010

ट्युलिपोत्सव...

"अगं आपणं या शनिवारी जाऊया का ट्युलिप फ़ेस्टिव्हलला??" इतक्यात ओळख झालेल्या एका मैत्रीणीचा मागच्या आठवड्यातला फ़ोन; पण बाहेर पडणारा पाऊस पाहून कळत नव्हतं काय म्हणायचं.तसंही ट्युलिपच्या बागांबद्दल यश चोप्रांच्या चित्रपटांतील गाण्यांनी निर्माण झालेलं कुतुहल केव्हापासुन आहे...आणि दुधाची तहान ताकावर प्रमाणे घरी ट्युलिपचे जमतील तितके बल्ब्स लावुन आठ आठवड्यांचा त्यांचा वसंतातील वावर काही वर्षे अनुभवलाय..पण तरी ट्युलिपच्या शेतीबद्दल कुतुहल होतंच...आमच्या नशीबाने वरुणदेवाने चक्क विकांताला सुट्टी घेतली आणि आम्ही आमच्या मोहिमेवर निघालो...किती रंग किती रांगा म्या पामराने काय वर्णन करावं..ट्युलिपांचा उत्सवच जणू इतकंच म्हणेन...फ़ोटो टाकते...बास....यंज्व्याय..(हेरंबा चांग भलं रे तुझ्या शब्दांना...)


32 comments:

 1. सही अपर्णा, डोळ्याला काय सुख मिळालं... सुंदर दिसतात ही ट्युलिप्स... 'युव गॉट मेल' मध्ये मेग रायनला ट्युलिप्स का आवडतात हे आता कळालं ;-)

  ReplyDelete
 2. झक्कास, लाजवाब.. चांगलंच यंज्वाय केलं आहेस तू.. पूर्वी (म्हणजे अनेक वर्षांपूर्वी) तर मला ट्युलिप म्हणजे काय ते माहित पण नव्हतं. नंतर माझ्या एका मित्राने हॉलंडच्या ट्युलिप्स चे फोटो पाठवले होते. हॉलंडचे ट्युलिप्स आणि त्या बागा जगातल्या सर्वोत्कृष्ठ ट्युलिप्सपैकी गणल्या जातात (ही माहितीही त्यानेच दिली होती तेव्हा).. पण तुझे फोटो बघून "अमेरिकन्स भी कुछ कम नही" असं वाटतंय.. !! सहीच. BTW, ही ट्युलिप्सची शेतं exactly कुठे आहेत?

  ReplyDelete
 3. अगदी खरंय आनंद...मेगला काय आपल्या सगळ्यांनाच नक्कीच आवडणार या ट्युलिप्सच्या बागा...वेळ कसा गेला भटकताना कळलंच नाही बघ...

  ReplyDelete
 4. हेरंब, मिशिगनमध्ये एक हॉलंड नावाचं गाव आहे आणि तिथला ट्युलिप फ़ेस्टिवलही खूप प्रसिद्ध आहे पण नेमकं स्प्रिंगच्या आधी आम्ही शिकागोहून बस्तान हलवलं त्यामुळे मग पुन्हा कधी संधी मिळाली नाही...आणि हॉलंडचा फ़ेस्टिव्हल जास्त छान असेल असं वाटतं मला पण ही लागवडही अगदी मनोहारी होती...हा फ़ेस्टिवल इथे जवळचं वुडबर्न म्हणून गाव आहे तिथले फ़ोटो आहेत....

  ReplyDelete
 5. खुप खुप धन्यवाद आमच्या डोळ्यांना इतकी सुंदर ट्रीट दिल्याबद्दल...प्रत्यक्ष तिथे फ़िरतांना तर नक्कीच डोळ्याचे पारणे फ़िटल्यासारखे झाले असेल तुम्हाला...

  ReplyDelete
 6. खुप खुप धन्यवाद आमच्या डोळ्यांना इतकी सुंदर ट्रीट दिल्याबद्दल...प्रत्यक्ष तिथे फ़िरतांना तर नक्कीच डोळ्याचे पारणे फ़िटल्यासारखे झाले असेल तुम्हाला...

  ReplyDelete
 7. वाह..मन किती प्रसन्न होतात अश्या फुलांकडे बघून..खूपच छान आहेत आणि ट्यूलिप हे खूपच क्यूट दिसतात. बँकॉक, सिंगापुरला पण मिळतात ना..खूप प्रकार असतात म्हणे याचे..खराय काय?

  ReplyDelete
 8. अप्रतिम!
  जपानला रस्त्याच्या बाजुला अशा ट्युलिपच्या रांगा पाहिल्या आहेत, खुपच सुंदर फुल असते हे. जपानला पाहिलेल्या Lavender pharms ची आठवण झाली. दूरवर पसरलेली Lavender ची फुले अशीच सुरेख दिसतात.

  ReplyDelete
 9. देवेंद्र, धन्यवाद...डोळ्यांचं पारणं फ़िटणं म्हणजे काय हे खर्‍या अर्थाने कळलं...इतकं की दूर माउंट हुडपण होता पण त्याकडे नेहमीसारखं जास्त लक्ष नव्हतं...

  ReplyDelete
 10. सुहास, आहे भरपूर प्रकार तिथे बरीच नावं वाचली पण त्या रंगीबेरंगी रांगांमध्ये ही किचकट बॉटनी नाही लक्षात ठेवली...

  ReplyDelete
 11. हो सोनाली लॅव्हेंडर माझ्या आधीच्या शेजारणीकडे होता..छानच वाटतो...तुला जपानला चेरीचा बहर पण पाहायला मिळाला तर तो अप्रतिम असेल...:)

  ReplyDelete
 12. Aparna, I love your blog and am an ardent reader! And beautiful picture of Tulips! Sorry, still haven't figured out how to use Marathi font properly. Please keep up the good work of pleasing readers!

  (BTW, with regards to the first comment, Meg Ryan in "You've Got Mail", is a fan of Daisies and not Tulips! Coz, I am an ardent fan of Ms Ryan, too.)

  Bye!

  ReplyDelete
 13. Hi Sucharita,

  Thank you for your comments and welcome on my blog... The comments encourgaed me to write so keep up to that as well...
  And about Meg Ryan and daisies lets meet Anand and beat him up...(शुद्ध मराठीत कोपर्‍या घेऊया...) I kind of someone who watches and forgets moveis but Anand you are not allowed to do it...hee hee...

  Keep visiting here...:)

  ReplyDelete
 14. अपर्णा माझा चेरी ब्लॉसम थोडक्यात हुकला, तो एप्रिलमधे होता आणि मी मे महिन्यात गेले त्यामुळे नवर्‍याने काढलेले फोटोंवर समाधान मानले. ते ही अप्रतिम होते.

  ReplyDelete
 15. मस्तच गं ..फारच मस्त..

  काय एक एक रंग आहेत आहाहा!!!

  ReplyDelete
 16. चुकलं... डेजी तर डेजी.. मी मेग रायनला पाहत होतो... फुलांकडे नाही .. ;-)

  ReplyDelete
 17. हा हा हा आनंद.. हे म्हणजे "मेगला कारलं आवडत असतं तरीही ती मला तेवढीच आवडली असती" असं म्हणण्यासारखं झालं.
  पूर्वी माझा माधुरीचा डाय-हार्ड पंखा असलेला मित्र म्हणायचा 'माधुरी टकली असती तरी मला तेवढीच आवडली असती.'.. त्याची आठवण झाली ;-)

  ReplyDelete
 18. एकदम मस्तच गं. हॉलंडला( आमच्या बरं का... :) ) आम्ही तीनदा गेलोयं. खरेच डोळ्यांचे पारणे फिटते. माझ्या स्वत:च्या बागेतही अनेक प्रकारचे ट्युलिप्स, डेजी, लॅंव्हेंडर किती काय काय होते... फार फार आठवण आली बघ त्याची. बरे वाटले गं इतकी मोहक फुले पाहून.

  ReplyDelete
 19. धन्यवाद तन्वी....

  ReplyDelete
 20. आनंद पण तरी तुला मेग आणि ट्युलिप्स पण आवडतात यात मला तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये..म्हणजे डेझी पण आवडतीलच...आणि हेरंब तेवढ्यासाठी माधुरीला कशाला टकली करताय रे तुम्ही??

  ReplyDelete
 21. अगं श्रीताई, आता वर हेरंबला लिहिताना तुझीच आठवण आली होती तितक्यात तुझी कॉमेन्ट आली बरं झालं बघ...अगं इथे नस्ती तर पुढच्या स्प्रिंगला तुझ्याकडेच तळ ठोकणार होते ट्युलिप्ससाठी...:)

  ReplyDelete
 22. अप्रतिम. काश्मीरमधे ही टुलिप्सच्या बागा आहेत. मध्यंतरी त्याचे फोटो वर्तमानपत्रात आले होते.

  आणखिन फोटो टाकाना.समाधान अजुन झालेले नाही

  ReplyDelete
 23. Bharriii......!!!
  Awesome.............!!! :)

  ReplyDelete
 24. अरे हो काश्मिरमध्ये असायला हव्यात बागा..अरे किती ठिकाणं जायची राहिलीत असं वाटतंय...हरेकृष्णाजी,खरं तर बरेच फ़ोटो आहेत अपलोड करायचा कं केला....:) परत थोडी भर घालेन नक्की नंतर..

  ReplyDelete
 25. धन्यवाद मैथिली आणि ब्लॉगवर स्वागत..

  ReplyDelete
 26. तुषार, धन्यवाद आणि ब्लॉगवर स्वागत...

  ReplyDelete
 27. अप्रतिम फुलं, शब्दातीत सौंदर्य... लई झ्याक

  ReplyDelete
 28. धन्यवाद संकेत.

  ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.