आज माझा वाढदिवस आहे असं जर मी सांगितलं तर ही पोस्ट कुणी या एका ओळीच्या वर वाचणार नाही किंवा एक-दोन दिवसांनी एक एप्रिल संपुर्ण संपल्याची खात्री करून कदाचित वाचेल...म्हणजे आतापर्यंत आलेले अनुभव तरी तसंच काहीसं सुचवताहेत....
काही (आता किती ते विचारू नका...आणि विचारून खरं उत्तर दिलं तरी खोटं वाटेल...हे हे...) हां तर काही वर्षांपुर्वी अशाच एका एक एप्रिलला माझ्या बाबांना माझ्या मामाने असंच सांगितलं होतं,"भावजी अभिनंदन, मुलगी झाली"..."अस्सं का हा हा.." असं चक्क उडवुन लावत ते तीन एप्रिलला गेले होते...आणि तेही अजिबात असं न दाखवता की मुलगी झाल्याचं कळलय किंवा काय..उगाच आपलं कॅज्युअल व्हिसिट सारखं काहीतरी...पण मी अजुनही कधी कधी बाबांना, "बाबा खरं सांगा मुलगा हवा होता पण मुलगी झाली म्हणून उशीरा गेलात ना??" असं विचारुन पिडत असते....आता जिथे बाबांचाच विश्वास नाही तिथे बाकी पब्लिकचं काय बोलायचं...
पण ते काही असलं तरी मला माझा वाढदिवस फ़ार्फ़ार आवडतो...वाढदिवस विसरण्याच्या बाबतीत जितकी फ़ुल मी आहे तितकेच अगदी लक्षात ठेऊन मला वाढदिवसाला फ़ुल करणारेही माझे सगळे मित्र-मैत्रीणी,परिवार आहे...आणि मुख्य म्हणजे जितकं हक्काने मी ते वाढदिवस विसरू शकते तितक्याच हक्काने माझा वाढदिवस एकदा माहित पडल्यावर विसरणारे दिसले की मी रागवू शकते पण खरं तर कधी अशी वेळ आलीच नाही...
आई-बाबा शिक्षक असल्याने तशी परिस्थिती यथा-तथाच होती हे वेगळं सांगायला नको पण भावंडात शेंडेफ़ळ असल्याने माझा वाढदिवस नेहमी खास असायचा...आणि एके वर्षी तर मी आई-बाबांना न सांगताच शाळेतल्या मैत्रीणींना घरी बोलावुन आईलाच एप्रिल फ़ुल केलं होतं ते माझ्याही लक्षात आहे...आई बिचारी संध्याकाळी दमुन-भागून घरी आली आणि घरी हा घोळका...बिचारीला लगेच वेफ़र्स, चॉकोलेट्सचा भूर्दंड पडला...तरी नशीब केकचं फ़ॅड तोवर रूजलं नव्हतं ते...
माझी आता नाही आहे त्या मावशीची आठवण मला प्रत्येक वाढदिवसाला येते कारण माझी पहिली-वहिली खरोखरची स्टिलची भातुकलीमधली ताट-वाटी याचा सेट, एक स्टीलचा छोटा हंडा असं माझ्या चौथ्या वाढदिवसाला तिने दिलेलं जपून ठेवलेलं माझं बक्षिस अगदी माझी भाची पण खेळली इतकं छान टिकलंय....यापेक्षा चांगलं बक्षिस मला कधीच मिळालं नव्हतं असं मला नेहमीच वाटतं...
फ़क्त शाळेत असताना नेहमीच त्यावेळी वार्षिक परिक्षेचे वारे वाहात असायचे पण तरी शनिवार किंवा रविवार असला तर माझी मावसभावंडं वाढदिवस म्हटलं की हमखास येत आणि मग त्यांनी स्वतः परिश्रम करून बनवलेली खोटी बक्षिसं उघडायचं म्हणजे डोक्याला ताप असे...एकात एक बसणारे जमतील तेवढे बॉक्स आणि मग त्यात एप्रिल फ़ुल लिहिलेलं रंगीत चित्र असं त्यांचं पेटंट बक्षिस ठरलेलं असे..मुख्य मला त्याची आधीच कल्पना असली तरी केवळ आपला वाढदिवस आहे म्हणून थोडी मजा म्हणून मी ते उघडे....पण मावशीकडे माझ्यासाठी काही ना काही असे हेही माहित असे..मग नंतर जरा आठवीत वगैरे गेल्यानंतर हे खोका प्रकरण बंद झालं आणि सुरू झाली ती एप्रिल फ़ुलवाली ग्रिटिंग्ज...कधी कधी स्वतः केलेली किंवा कधी कधी विकतची..पण मूळ सुत्र तेच...एप्रिल फ़ुल...मला आतापर्यंत मिळालेली एप्रिल फ़ुलची ग्रिटिंग कार्ड जर एका ठिकाणी ठेवली असती तर खरंच छान कलेक्शन झालं असतं....अर्थात इ-कार्ड तर एकाला एक मागे टाकतील अशी येतात आता नेटच्य युगात..
आमच्याकडे एप्रिलमध्ये मी धरून तीन मावसभावंडांचे वाढदिवस आहेत..पण त्यात सगळ्यात स्पेशल माझा असं मला नेहमीच वाटतं....कुणीही एप्रिलचं भेटलं की "तुझा एक एप्रिल??सही आहे :)"....असं ऐकायचं म्हणजे काही भव्यदिव्य असं वाटायचे ते दिवस अजुनही तसेच आहेत..अगदी कुणी नवं जरी एप्रिलला जन्मलेलं असलं तरी मी पुन्हा माझ्या वाढदिवसाच्या आठवणीत शिरते...
अरे वा. मस्तच.. वा दि हा हा शु !!! तुझ्या बाबांचा पण विश्वास बसला नाही ... हा हा हा..
ReplyDeleteआणि हो माझा पण आजच आहे वाढदिवस.. मस्त वाटलं आपल्याबरोबर अजून कोणा ब्लॉगरचा वाढदिवस आहे ते बघून !! ;-)
हेरंब खूप खूप आभार्स...:)
ReplyDeleteतुझा आज वाढदिवस असला तरी मी बिल्कुल तुला शुभेच्छा देणार नाही...हम उतने नही थोडे कम फ़ुल है....:)
अपर्णा, वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!!! सहीच आहे गं... लक्षात ठेवायला एकदम सोपे....चला पुढच्या वेळी तुला पहाटे झोपेतून उठवलेच म्हणून समज... मग आज काय काय बेत आहे? Enjoy your big day! :)
ReplyDeleteअगं श्रीताई नुस्तं उठवून भागणार नाही...तुला त्यावेळी पार्सलने केक नाहीतर काही तरी चटपटीत करून पाठवावं लागेल...यावेळी जरा तुला आधी कल्पना दिली त्याचा फ़ायदा देतेय पण जसं वाढदिवस लक्षात ठेवशील तसंच हेही ठेव बरं.....
ReplyDeleteहा..हा... त्यापेक्षा विमानाचे तिकीटचं धाडून दे मी लगेच येईन आणि मस्त जंगी बेत करू की गं... सध्या एक चटपटीत फोटू धाडतेय.... घे समाधान मानून... :) आणि तरीच म्या म्हनत होते की आज बाईसाहेब कुठे गायब आहेत....कॉलते गं तुला...
ReplyDeleteहम्म्म..अगं त्यापेक्षा पार्सलचं भाडं देते नं?? हमें तो आम खाने से मतलब...
ReplyDeleteमला तर वाटलं तू आधी कॉलशील आणि मग कॉमेन्टशील...पण असो...भा.पो...
आयला... तुझा खराह्क वाढ दिवस होता??? मग आज फोन करायला हवा होता की... :) आणि हो 'दवबिंदू' - देवेंद्रचा सुद्धा आजच असतो वाढदिवस...
ReplyDeleteअपर्णा, वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
ReplyDeleteहो रोहन खराच आहे...(इथे फ़क्त पाच वाजतील आता संध्याकाळचे...) आणि आता काय रे मुलांचे वाढदिवस साजरे करायचे आणि आपलं वय कमी करायचे दिवस आहेत त्यामुळे तसं काही कौतुक नाही...:)
ReplyDeleteधन्यवाद सुहास....
ReplyDeleteवाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा .... :)
ReplyDeleteबाकि तुझे लाड करायला श्रीताई येतेच आहे, मजा करा....
आमचे ओर्कुट मित्र चिंतामणी काका यांचाही होता १ एप्रिल ला वाढदिवस त्यांना आम्ही रात्रीच फोन करून शुभेच्छा दिल्या
ReplyDeleteबाकी ज्यांचा १ एप्रिल ला वाढदिवस असतो त्यांना त्या दिवशी मजा येण्यापेक्षा सजा असल्यासारखे वाटत असावे असे मला वाटते कोणालाही खरे वाटत नाही त्यांचा वाढदिवस आहे म्हणून
त्यामुळे प्रेमळ शुभेच्छांचा ओघ कमी होतो बाकी दिवसांपेक्षा :(
विक्रम अरे मी तरी माझा वाढदिवस नेहमीच यंज्व्याय केलाय....:)
ReplyDeleteविक्रम अरे मी तरी माझा वाढदिवस नेहमीच यंज्व्याय केलाय....:)
ReplyDeleteवाढदिवसाच्या शुभेच्छा.. काय केलंत मग वाढदिवसाला?
ReplyDeleteधन्यवाद तन्वी आणि महेंद्रकाका..
ReplyDeleteकाका, अहो काही विशेष नाही आम्ही आधीच कॅनडा ट्रिप केली नं तशीही...या विकांताला बाहेर जेवायला जाऊ...आणि काल गेलो नाही कारण गुरुवारी मी शाकाहारी(च) असते...त्यामुळे मग काय खायचं हा मोठा प्रश्न असो..बाकी रोहनला म्हटलं तेच आहे....
एप्रिल फूल - आपलं वाढदिवसाच्या शुभेच्छा!
ReplyDeleteधन्यवाद गौरी....
ReplyDeleteअपर्णा ताई,खरच वाढदिवस होता का ग तुझा...
ReplyDeleteअजुनही विश्वास बसत नाहिये...कारण १ एप्रिलला मी खुपच सावध असतो...मी सुदधा ऑरकुट मध्ये १ एप्रिलला वाढदिवस असल्याच जाहिर केल होत आणि त्यावर ३५-४० लोकांनी मला शुभेच्छाही दिल्या (रोहनभाई तुमच्या भावना दुखावल्या असतील तर सॉरी )..असो बाकी यावेळी मी प्रत्यक्षही बरयाच लोकांना फ़ुल केल....उशिरा का होइना वाढदिवसाच्या अगदि मनापासुन शुभेच्छा......
(उशिराने का होईना) वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
ReplyDeleteदेवेन....तुम जिस पाठशाला में पढते हो उसके हम हेडमास्टर रह चुके हैं...
ReplyDeleteशुभेच्छांबद्दल धन्यवाद...
धन्यवाद अनिकेत...
ReplyDelete३ दिवस सुट्टीवर असल्यामुळे, आजच ऑन लाईन आलोय. . . चला उशिरा का होईना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!! पार्टी कधी देणार आहेस??? केक हवाय बर का???
ReplyDeleteबघ योगेश तू एकटाच पार्टी मागतोस म्हणजे तू खरोखर विश्वास ठेवलायस...(नाही म्हणजे मी फ़ुल बनवत नाहीच आहे तसंही) पण मला एकाच पद्धतीचा केक येतो तो तर पाहून सगळीच जणं कंटाळली असतील...मलाही मॉंनिजिनीजचा ब्लॅक फ़ॉरेस्ट खावासा वाटतोय...:)
ReplyDeleteओह्ह्ह्ह.... म्हणजे अगदी लगेच कॉमेंटले-बधाई दिली मग कॉलून पुन्हा छान शुभेच्छा दिल्या ना गं... मग तरीही तू नाराजच का?जाऊ दे बाई, पुढच्या वेळी नुसतेच कॉलेन... :P
ReplyDeleteवाढदिवसाच्या शुभेछ्या..तुझे पोस्ट असे वाचायचे राहतात बघ..ते फीड बर्नर नाही का तुझ्या ब्लोगवर?
ReplyDeleteकाय गं भाग्यश्रीताई वाढदिवशी (आणि तेही ए.फ़ु.च्या दिवशी) लाड कर ना जास्त....(म्हणजे इतर वेळपेक्षा....:)) बाय द वे पुढच्या वेळचं तिकीट आत्ताच काढून ठेवलं तर एअरलाइन कंपनीने चकटफ़ुच दिलं पाहिजे असा त्यादिवशी विचार करत होते...मग मजाच होईल न??
ReplyDeleteसागर आता परिक्षा झाली आहे नं मग सरळ ब्लॉगवर वाचत जा की वेळच्या वेळी....(तसाही जागं राहायचा तुझा स्वभाव आहे नं?? मग वेळ ब्लॉगोपयोगी लाव जरा...)
ReplyDelete*नेटोपासामुळे* प्रतिक्रियाद्यायला उशीर झाला... एकापरीने बरेच झाले नाहीतर खरंच विश्वास ठेवला नसता :)
ReplyDeleteवाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
ReplyDeleteकोकणात ३ दिवस मस्त फिरून आले, त्यामुळे शुभेच्छा द्यायला उशिर झाला.
सोनाली केळकर
हा हा आनंद...मला सवय आहे उशीरानं विश्वास ठेवणार्या लोकांची...
ReplyDeleteधन्यवाद सोनाली....कोकणात जाऊन आलीस मग एकदम ताजं वाटत असेल नं तुला?? आंबापोळी गिफ़्ट म्हणून चालेल मला....
ReplyDeleteअपर्णा, आजकाल अजिबात वेळ नसल्याने तुझा ब्लॉग जरा उशीराच वाचतोय. पण उशीरा का होईना, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
ReplyDelete-अनामिक
अनामिक भा.पो...आणि आधी म्हटलं तसं आता मुलांचे/भाच्यांचे वाढदिवस साजरे करायचे दिवस आहेत...
ReplyDeleteअपर्णा, १ एप्रिलच्या शुभेच्छा आता द्यायच्या म्हणजे too much. तरी एप्रिल महिना चालू आहे.हीच validity धरुन तुला अनेक शुभेच्छा.
ReplyDeleteBelated Happy birthday..!
शुभेच्छांच काय गं? ही फ़क्त छोटीशी गम्मत म्हणून ब्लॉगवर टाकलंय..नाहीतर काय आता जितकं उशीरा शुभेच्छा तितकं चांगलं (वेगळ्या अर्थाने)..
ReplyDeleteधन्यवाद.
तुझा एक एप्रिल??सही आहे :)
ReplyDelete:) संकेत.
ReplyDeletebelated Happy Baddde!! (aata kalal mipan April) :)
ReplyDelete