आजच्या लोकसत्ता ऑनलाईन मधलं "काय चाललंय काय" कार्टून आलंय. एक विद्यार्थी अगदी बाकापर्यंत लोंबणारी दाढी घेऊन बाकावर बसलाय आणि प्रश्नपत्रिका देणा-या प्राध्य़ापकाला सांगतोय " परीक्षा झाल्याशिवाय दाढी करायची नाही असा मी निश्चय केला होता! पण विद्यापिठाच्या परीक्षा एवढ्या पुढे जातील असं वाटलं नव्हतं!!"
हे वाचून हसायला अर्थातच येतं पण इंजिनियरींगच्या परीक्षेच्या वेळी आमच्या वर्गातील मुलगे खरंच दाढी करण्याचा वेळ वाचवायचे त्याची आठवण झाली. म्हणजे आम्हाला परीक्षेच्या आधी दोनेक आठवडे स्टडी लिव्ह असायची. त्यानंतर पहिल्या पेपरला या मुलांचे अवतार बघण्यासारखे असायचे. जरा गोरी स्मार्ट मुलं अजून हॅंडसम वाटायची पण काही मुलं अक्षरशः आजारी नाहीतर तद्दन कंगालही दिसायची. नंतर एक दीड आठवडा असाच अवतार असे. आणि तेव्हा परीक्षेच्या टेंशनमध्ये आम्हा मुलींचं हे ऑब्जर्वेशन नसे बरं! पण पाठोपाठ तोंडी परिक्षा चालू व्हायची ना तेव्हा सर्वजण एकदम चकाचक दाढी करुन येत तेव्हा मात्र नक्कीच काही वेगळा मेक अप केलाय का असा प्रश्न मुलींना पडे. तेव्हा मग आपसूक त्यांच्या पुर्वावतारावर प्रदीर्घ चर्चा होतं. आज एकदम त्याची आठवण करुन दिल्याबद्द्ल लोकसत्तासाठी ही छोटीशी पोस्ट (आणि पोस्त)
हा हा हा!!! आठवले हो ते Engg. चे दिवस.....
ReplyDeleteपरिक्षेच्या दिवसातले मुलांचे अवतार लिहिलेत पण मुलींनाही वॅक्सिंग न केलेले हात लपवायला पुर्ण बाह्यांचे ड्रेस घालावे लागतात बरं!!!!
पोस्ट मस्त!!
आठवले ना?? पण आता मुलींचे का पाय खेचतेस....:)
ReplyDelete