इथे सगळीकडे स्वाईन फ़्लुची साथ सुरु आहे म्हटल्यावर आपण पण सुरात सुर मिळवायला हवा नाही का? म्हणजे झाले असे की साधारण एप्रिल संपता संपता जसा स्प्रिंग बहराला येतो तसा पाऊसही चांगला पडतो. पण यावर्षी मात्र या पावसाच्या आधी हिट वेव्ह ने चांगले चार दिवस हजेरी लावली..पारा ९४ फ़ॅ. म्हणजे ३५ से. च्या आसपास. त्यातून सावरतोय तितक्यात एकदम ५५ फ़ॅ. म्हणजे १३ से. इतक्या खाली उडी.
लहान माझं बाळ ते! कसं झेपायचं त्याला? मग काय नाक लागलं गळु आणि तापानेही हजेरी लावली. रविवारी संध्याकाळी कणकण वाटली म्हणुन तापाचं औषध दिलं तर स्वारी सोमवार दिवसभर खेळली. नेमका सोमवारीच नवरोबांचा ऑफ़िसमधून फ़ोन. म्हणतोय मला ताप येईल असं वाटतय. त्याच्या ऑफ़िसमध्ये ऑन ड्युटी डॉक्टर किंवा नर्स असते. त्याला तिथुन तात्पुरतं औषध घे म्हटलं. पण तो संध्याकाळी घरी आला आणि घरातला हिटर एकदम ७५ फ़ॅ.वर वाढवला. नॉर्मली आम्ही ७० पर्यंत ठेवतो बाहेर गार असेल तर. मी म्हटलं पड थोडा वेळ. पण आम्हा आय.टी. वाल्यांच्या अंगात लॅपटॉप इंटरनेट अंगात भिनलंय की हा उगाच काहीतरी काम करतोय आणि म्हणतो मला वाटतं हा स्वाईन फ़्लु असेल. त्याही अवस्थेत इतकं हसु आलं ना. मी म्हटलं 'तू नेटवर त्याची लक्षणं वाचतोयस का? तसं असेल तर तुला नक्की वाटेल की हा स्वाईन फ़्लुच'. 'नाही, ऑफ़िसच्या मेलमध्ये आलंय'...हे ऑफ़िसचे एच. आर. वाले पण ना...इथे मंदीच्या काळात रोगाची लक्षणं कसली वाटताय..नोकरी शाबुत राहिलसं काही सांगा ना....असो. पण माझा जोक कळण्याच्या मनस्थितीत हा अर्थातच नव्हता. म्हणुन त्याने लगोलग डॉक्टरच्या इमर्जन्सी लाइन वर फ़ोन केला. खरं तर ही बया कधीही स्वतः लागलीच फ़ोनवर येत नाही पण त्यादिवशी चक्क मॅडम स्वत:च्या घरच्या लाईनीवर कॉल घेतात म्हणजे....(हा पण मंदीचा परिणाम की काय..पेशन्टस कमी झाले असतील. :)) असो..तिने दुस-या दिवशी सकाळची अपॉइन्टमेन्ट दिली..म्हणजे हा स्वाईन नव्हता. माझा नवरा वर तिला विचारतो आर यु शुअर की मी आत्ता नको यायला?? मला इतके हसायला येत होते ना.
त्याचा ताप पाहते तोवर बाळराजे पण तापलेले वाटले आणि यावेळी ताप चांगला १०२ फ़ॅ. जरा घाबरलोच. लगेच तापाचे औषध देऊन कपाळाला चंदन उगाळुन लावले. आता मात्र मला खरोखरच थोडं टेंशन आले कारण बाळाला सतत दोन संध्याकाळ ताप येत होता.
रात्री माझी खरी कसोटी होती. तापातल्या नव-याला उनउन खिचडी आणि पटकन सुचलं तसं सुप देऊन दुस-या बेडरुममध्ये झोपवलं. नेहमीच्या ठिकाणी मी आणि माझा लेक. दर दोन तासांनी उठणा-या माझ्या पिलाला मध्ये काही वेळ मांडीवरच घेऊन बसले. अक्षरश: कशीतरी रात्र सरली. सकाळी पहिल्यांदा नव-याची फ़ॅमिली डॉक्टरकडे अपॉइन्टमेन्ट. तो एकटाच ड्राइव्ह करुन गेला. काही पर्यायच नव्हता. कारण नाहीतर तिघांना जावं लागलं असतं. तो गेल्यावर मी बाळाच्या डॉक्टरकडे फ़ोन केला. (इथे मात्र नर्सच हं) इतर वेळी काय लक्षणं आहेत ऐकुन ती कधीकधी थांबायला सांगते पण यावेळी मात्र तिनेही जरा दुपारची अपॉइन्टमेन्ट दिली. नवरा येईस्तो थोडी फ़ार जेवणाची तयारी, बाळाची खिचडीचा कुकर बनवुन ठेवला आणि मग एकटी बाळाला घेऊन डॉक्टरकडे. "इयर इन्फ़ेक्शन" इथे इतर आयांकडुन नेहमी ऐकलेला शब्द आज आमच्यासाठीपण लागु झाला. चला आता घरी उरलेल्या दिवसांचा सामना करायला.
आल्या आल्या जेवणं आटपुन पुन्हा नेहमीची कामं. बाळाचा डायपर बदला, सर्वांची भांडी आवरा, बाळाला झोपवा कामांची रांग वाढतच होती. मनातल्या मनात आठवत होते माझ्या ताईकडे किंवा माझ्या मामे/मावस बहिणींकडेही असं कुणी आजारी पडलं की लगेच माहेराहुन कुणी मोठं व्यक्ति तिथे दिमतीला. इथे म्हणजे आपणचं काळजीवाहु कम कुक कम सर्वंट. असो...
आणखी एक वैऱ्याची रात्र तशीच काढली. आणि खरं तर दिवसही वैऱ्याचाच. कारण कामं वाढलेली. इतर वेळी सरळ शिळं, फ़्रोजन वगैरे खाल्लं जातं. त्यामुळे मोठ्यांचं जेवण रोज करावं लागत नाही. पण आजारपणात ही चैन परवडत नाही ना? मग काय एक जादा काम. तिस-या दिवशी नवऱ्याला बरं वाटत होत पण त्याने WFH घेतलं म्हणजे प्रवासाचा शीण नको. पण आता माझीच बॅटरी डाउन व्हायला लागली होती. ह्या दोघांच्या सर्दीने मलाही त्रास द्यायला सुरुवात केली होती. रात्री मध्येच इतकी थंडी वाजली की ताप आलाय हे कळत असुन उठवत नव्हतं. तो बिचारा आला तसाच रात्रीच्या पोटात गडप झाला. करणार काय? त्याच्याकडे लक्ष द्यायला मला मुळी वेळच नव्हता. आणखी दोन दिवस असेच कसेतरी काढले.
मध्ये एकदा नवऱ्याला वाटत होते कुणाला भारतातुन बोलवुया का? पण मी म्हटलं फ़क्त सर्दी-ताप आहे. जाईल. आणि आपण सर्व एकत्र आजारी पडलोय म्हणुन वाटतय. आपण इतकं सर्व एकट्याने करतो ना मग हा प्रसंगही एकट्याने जमतोय का बघु. पुढच्या वेळी आपण अधिक तयार असु...
असो. आठवडाभरात सर्वजण थोडेफ़ार का होईना बरे झालोय आणि ही पोस्ट लिहितेय. मला माहितेय असं एकट्याने सर्वांचे आजार काढण्याचा पर्याय बऱ्याच जणांना आवडणार नाही. पण आजकाल सर्वांनाच थोडेफ़ार प्रश्न समोर असतात. त्यात अशा साध्या साध्या आजारांसाठी मदत घ्यावी असं वाटलं नाही. तसं आमचं इथलं मित्रमंडळही हाकेला लगेच धावुन आलं असतं पण हा एक आजारी आठवडा मला स्वतःला एक वेगळा आत्मविश्वास देऊन गेला.
Mala samaju shakate tujhi awashtha...ashyaveli kharach gharachi aani tya kalaji karanarya manasanchi khup aathavan yete.......
ReplyDeleteTanvi
अगदी खरय तुझं
ReplyDeleteIthe post hote ahe. comment but pahilya ajobanchya postvar hot nahi.
ReplyDeleteकाही का होईना, तुला एक्पेरिअन्स तर आलाच ना.. यापुढे अशा परिस्थितीत अजुन हिंमतीने लढू शकशील.. आणि असे प्रसंग प्रत्येकाच्या बाबतीत घडणं महत्वाचं असत, तोपर्यंत ती व्यक्ती अशा परिस्थितीत काय काय अनुभव येतात आणि त्यांना कसं हाताळावं लागतं या गोष्टींपासून वंचित राहते... मी जरी अजुन लहान असलो (म्हणता येणार नाही, कारण केसं ढवळे-फटक झालेत, एखादा बुढ्ढा दिसतोय मी सध्या...! ;) ), तरी तुमच्यासारख्या अनुभवी मित्र-मंडळींकडून खुप काही शिकायला मिळतंय, इन ऍडव्हान्स! हे नक्की...
ReplyDelete- विशल्या!
बाबा विशालदेव, आता केस पांढरे झालेत म्हणून आपला सल्ला लक्षात ठेवते :)
ReplyDeleteअगदी खरंय. अगं तिथे काय किंवा इकडे काय न्युक्लियर फ़ॅमिली म्हणजे सगळं आपणच आपलं ओढावं लागतं. अगदी परवाच्या दिवसापर्यंत मीही यातोन चालले होते. आधी सानू आजारी मग शर्मन आजारी मग परत होळी खेळल्यानं सानू आजारी असा सर्दी आणि तापाचा खो खो गेले कित्येक दिवस आम्ही सोसतोय. मागच्या दहा दिवसांपूर्वी तर शर्मन सतत तीन रात्री १०३ डि. ताप चढायचा. इतकुसं पिल्लू वैतागुन जायचं. सगळ्या टेस्ट निगेटिव्ह आल्या. जाणते अनुभवी सांगत होते की अगं हा दाताचा ताप आहे, आपोआप जाईल पण डॉक्टर मानायला तयार नव्हते. पोरांना काही झालं की सुचत नाही. त्या तीन रात्री आम्ही फ़क्त कॉफ़ी पिऊन काढल्या. (वाईटातही चांगलं हेच की त्यामुळे वजनाचा काटा झर्रकन हलला, ट्रेनर जाम खुश झाली. म्हटलं बयो असा वेटलॉस परव्डायचा नाही)
ReplyDeleteअगं शिनु खरंय तुझं...मला वाटतं मला वाटायचं ते म्हणजे grass is greener on the other side असो....आता सगळं पुर्ववत आलं असावं अशी आशा..आम्हीही इतक्यात सर्दी-तापाच्या एका साप्ताहिक सत्रातुन गेलो..:)
ReplyDeleteआणि वजनाचा काटा माझाही इतक्यात कमी झालाय त्यात मोठा सहभाग बालसंगोपनाचा आहे हे सांगणे नलगे....असो...