खरं तर थंडीवर आणि त्यातल्या त्यात बर्फ़ावर लिहायचं नाही असं फ़िली सोडताना असं जाम ठरवलं होतं. एकतर ओरेगावात जास्त बर्फ़ नसतो हे आणि दुसरं कारण असं काही नाही पण जितकं थोडा थोडा बर्फ़ पडताना पाहाणं छान वाटतं तितकाच वैताग तो गाडीवरून आणि घराबाहेरून काढताना येतो आणि मुख्य त्यानंतर बरेच दिवस रेंगाळणार्या थंडीचा. त्यामुळे तोंडदेखलं बर्फ़ाचं कौतुक करा आणि मग नंतर कंटाळा आला म्हणा म्हणून टाळलं...
आजही इथल्या हिवाळ्यासारखी डिमेन्टर्सवाली गडद धुक्याची सकाळ सुर्याचा पेट्रोनस चार्म घेऊन नाही येणार हे जरी माहित होतं तरी थोड्या फ़्लरीज सुरू झाल्या आणि पुन्हा तेच "वॉव! स्नो फ़ॉल" असं वाटणं झालंच....मग पुन्हा थोडा वेळ तो थांबला आणि दुपारनंतर तो छान भुरभुरतोय..अशावेळी हातात चहा नाहीतर कॉफ़ीचा कप. आणि भजी बिजी असतील तर काय बहारच...सध्या तरी मागच्या वर्षीचा फ़ुटातला बर्फ़ आठवतेय आणि इथल्या इंचवाल्या बर्फ़ाचा आस्वाद घेताना राहावत नाही म्हणून ताजे घेतलेले फ़ोटो टाकतेय....चला व्हाईट ख्रिसमस नाहीतर नाही पण आत्ता सगळीकडे पांढरी चादर पसरतीय आणि या वर्षी बर्फ़ साफ़ करायची भानगड नाहीये...घर भाड्याचं असल्याने...त्यामुळे मस्त निवांत आनंद घेतोय....
अपर्णा
ReplyDeleteआम्ही खास स्नो फौल साठी दूर दूर जातो आणि तुम्हाला कंटाळा आला
तास पहिला गेले कि कोणतीही गोष्ट अति झाली कि वैताग येतोच
बाकी फोटो एकदम झाक बर का :)
विक्रम मला बर्फ़ पाहायला जायचं म्हटलं तर अजुनही आवडेल. पण राहायला लागलं ना की रोजचा सामना म्हणजे चार किलो कपडे, स्कार्फ़, ग्लोव्ह्ज घालून गाडी साफ़ करा..शुज सांभाळून चाला एक ना अनेक..फ़क्त पाहायचा असतो तेव्हा गरम कपडे घातले की झालं..आणि अति तिथे माती हेच खरं शेवटी...पण तरी या भागातला थोडा कमी बर्फ़ चांगला वाटतो म्हणून थोडे फ़ोटो टाकले...प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद.
ReplyDeleteभाड्याचं घर असणे किती चांगलं असतं न तिकडे न पाने गोळा करायची ना बर्फ साफ करायचा..मला तर वाटते देवाने त्या लोकांना एक प्रकारची शिक्षाच दिली आहे :-) बाकी फोटो झकास आहेत
ReplyDeleteमस्त आहेत गं फोटो......बघितलेस भाड्याच्या घराचे फायदे(!).....
ReplyDeleteफोटोंचा कोलाज पण सही दिसतोय...आम्ही आपला ब्लॉगावर स्नो पाडुन आनंद मानतोय....:)
काशsss! भारतात बर्फ पडत असता असा. मी २०१२ ची आतुरतेने वाट बघतो आहे. तेंव्हा काही राडा झाला, हवामानाचे रुतूचे चक्र फिरेल, निसर्ग कलाटणी मारेल आणि भारतात स्नो-फॉल आणि लाल-पिवळ्या रंगाच्या पानांची झाडं उगवतील असे एक स्वप्न उगाचच उराशी बाळगुन आहे. असो. फोटो अजुन कुठे अपलोड करत असलीस तर त्याची लिंक दे ना, किंवा ऑर्कुट्वर तरी अपलोड कर
ReplyDeleteहसू नका, पण मी आयुष्यात कधीच स्नो फॉल अनुभवलेला नाही, अगदी स्वप्नात सुद्धा :-)
ReplyDeleteमी खरं तर स्नो फॉल साठी मरतोय, कधी अनुभवलाय मिळेन माहीत नाही. आता अपर्णा ने बोलावलंच तर, ( म्हणजे बोलवावच तिने अस काही नाही :-)) पण जर बोलवलंच तर मात्र एवढ्या विचार करावा लागेन. ब्लॉगावर तर बर्फ पाहीला हेच भाग्य.
खूप छान फोटो. आणि अजयला अनुमोदन. स्नो फॉल पाहायची माझी देखील खूप इच्छा आहे.
ReplyDeleteहा हा हा वैभव....पानं गोळा करायचं तर पूर्णच विसरले....:) खरंच स्वतःचं घर असणार्यांना य दोन शिक्षाच आहेत.....:)
ReplyDeleteतन्वी, मी एकदा एका संकटात पडले की मग त्याचे फ़ायदेच शोधत असते..हे तर काय फ़क्त घर....आणि खरं सांगते भाड्याच्या घराचे विशेष करून अमेरिकेत खूपच फ़ायदे आहेत आणि हे आम्ही जेव्हा भाड्याच्या घरातून स्वतःच्या घरात राहायला गेलो होतो ना तेव्हाच लक्षात आलं होतं...म्हणून तर यावेळी ती चूक पुन्हा नाही केली....:)
ReplyDeleteअनिकेत, अरे २०१२ चा फ़क्त प्रोमोच पाहिला..बघुया डीव्हीडीवर आला की येईलच घरात...पण त्यासाठी तुला २०१२ ची कशाला वाट पाहातोस...उत्तर भारतात आहे नं आपल्या बर्फ़....एकदा रोहनला पकडा सगळ्यांनी मिळून आणि जाऊया...मलाही यायला आवडेल....आणि हो मी ऑरकुटवर टाकते हे फ़ोटो.....
ReplyDeleteहे हे अजय...येतोयस का तू...आता लगेच शुक्रवारी स्नोची वॉर्निंग आहे...चल बॅग भर...मी तुला लिस्ट मेलवर देते...माझ्यासाठी बाकरवडी धरून काय काय आणायचं त्याची.....:)
ReplyDeleteसिद्धार्थ स्वागत...तू आणि अजय बरोबर येत असाल तर चांगलंच आहे...नवर्याची लिस्ट पण देता येईल....:)
ReplyDeleteअपर्णा, मस्त आहेत फोटोज. आणि १००% सहमत. गेल्याच आठवड्यात नवीन-योर्कात फुटभर बर्फ पडला त्यामुळे आम्ही आपले आठवडाभर कुडकुडतोय थंडीने. पण तरीही सिझनच्या पहिल्या स्नोची मजा काही औरच..
ReplyDeleteहेरंब, अरे मागच्या सगळ्या थंड्या अशाच कुडकुडत गेल्यात...तुला सांगते एकदा याइथे पण येऊन पाहा चांगलं वाटतं..मुख्य म्हणजे थंडीच वाजत नाही...:)
ReplyDeleteअग मी ओरेगावात नाही पण वेस्ट-कोस्टात होतो ६-७ महिने. बे-एरियात.. शून्याच्या खाली पारा गेलेला बघितलाच नाही कधी. :)
ReplyDeleteबे एरिया म्हणजे तसंच....पण इथं सगळ्या प्रकारचं हवामान extreme ला न जाता आहे त्यामुळे बरं वाटतंय असं सध्या तरी आहे...बघुया कसं काय होतं ते एकदा ऋतुचं वर्तुळ पुर्ण झालं की मग कळेलच...
ReplyDelete