Tuesday, December 22, 2009

धागा वाढता वाढता वाढतोय.....

टॅगला धागा म्हटलं तर चालेल ना? महेन्द्रकाकांनी टॅगलंय म्हणून पहिले जाऊन त्यांची उत्तरं पाहिली आणि मग गौरी आणि मग जी...बापरे इनफ़ायनाईट लुपसारखी भटकणार की काय...इंजिगियरींगची सवय सगळ्यांच्या असाइनमेन्स्टस पाहुन मग त्यातल्या निवडक उत्तरांमधुन आपलं युनिक उत्तर बनवायचं...चला त्यानिमित्ताने गौरी आणि जी यांचीही उत्तरं पाहुन ठेवलीयत...
आता प्रयत्न करतेय माझी युनिक उत्तर लिहायचा. सुचलं तसंच लिहिणार तसंही ब्लॉगवर काय लिहायच पेक्षा कसं कारण दोन मिन्ट लॅपटॉपवर बसलं तर लेकरू लगेच बाजुच्या खुर्चीवर जमेल तसं चढुन पुढचा पाय टेबलवर मग काय उठा असं चाललंय...त्यामुळे एका शब्दात लिहिलं तर होईल तरी. पण मी शक्यतो वाक्य नाही लिहिणार....कृपया स्वल्पविराम आणि टिंबांमुळे वाढलेल्या उत्तरांना फ़क्त शब्दमर्यादा वाढवली असं म्हणुया फ़ार तर पण आपण महेन्द्रकाकांसारखं नाही हं....मुळीच नाही....वाक्य बिक्य....अह्म्म्म्म....
हे सगळे प्रश्न पाहताना उगाच लोकप्रभेसारख्या मासिकात सु(?)प्रसिद्ध व्यक्ती आपल्या आवडी-निवडी लिहितात ना तसं वाटतंय...हे हे...काय हरकत आहे एक दिवसाची सु(?)प्रसिद्धी....चलो...नमनालाच तेल ओत ओत ओततेय....

1.Where is your cell phone?
किचनच्या काउंटरवर...वाट पाहातोय नवरा दिवसात एकदा तरी फ़ोन करेल याची...................

2.Your hair?
आहेत अजुन तरी...काही डोक्यावर काही बाळाच्या मुठीत....पण आहेत...शिल्लक..

3.Your mother?
माझी सखी

4.Your father?
फ़िरणं, गप्पा, तळण खाणं.....

5.Your favorite food?
सध्या तरी आयतं पानात आलेलं काहीही....आणि नंतर भांडी आवरणारं पण कुणी देईल ते....उदा. भाग्यश्रीताईंची पाणीपुरी, इ.इ.....

6.Your dream last night?
रोजचं एकच स्वप्न...आरूष झोपेतुन उठून रडतोय आणि मी नवर्याला त्याला घ्यायला सांगते आणि मी अर्थातच शांत झोप घ्यायचा प्रयत्न....

7.Your favorite drink?
शहाळ्याचे पाणी

8.Your dream/goal?
फ़क्त स्वतःसाठी काम करणं....या कंपनीसाठी त्या कंपनीसाठी बास.......कंटाळा आलाय...

9.What room are you in?
डायनिंग एरिया...त्यातल्या त्यात सेफ़ जागा वाटतेय लॅपटॉपसाठी....

10.Your hobby?
निसर्गभ्रमंती...सध्या जवळजवळ थांबलीय...

Reading
आवडते ब्लॉग्ज, हरी कुंभाराचं अझकाबानचे कैदी कितव्यांदातरी.....

11.Your fear?
सगळे पाळीव (?) आणि मोकाट कुत्रे/मांजरी

12.Where do you want to be in 6 years?
माझी मुंबई...

13.Where were you last night?
वाटलं तरी कुठे जाऊ शकतो का सद्यपरिस्थितीत..नाहीतर गेलो होतो कधीतरी पब लाइफ़ पाहायला म्हणून...जो काही सांस्कृतिक धक्का बसलाय की त्यानंतर रोज फ़क्त रात्रीचे मूलंच....

14.Something that you aren’t?
तोंडावर गोडबोलायचं आणि मागून मार-मार मारायची....

15.Muffins?
बनाना वॉलनट फ़क्त नवरा आणतो म्हणून आणि मग फ़क्त त्याच्याबरोबर चाखायचं म्हणून....

16.Wish list item?
खरंच मोठी आहे.....आणि थोडी कंटाळवाणी....

17.Where did you grow up?
वसई, जि. ठाणे..म्हणजे टेक्निकली मुंबई...

18.Last thing you did?
पोराचा डायपर बदलला...(हात धुतलेत अर्थातच....)

19.What are you wearing?
हिरवा आणि राखाडी...थोडक्यात जे मिळालं ते....

20.Your TV?
पॅनासोनिक त्याच्यावर झी सारेगमप चाललंय आणि नको तिथे वरचे नी पाहायचं कर्मात.....पार्शालिटी नेहमीप्रमाणे...जाऊदे...भरकटतेय....

21.Your pets?
सध्यातरी मुलगाच आणि नेहमीचाच तोच...

22.Friends?
वृक्ष आणि काही काही वल्ली....

23.Your life?
चाललंय नेहमीचंच....

24.Your mood?
सेलेब्रेटी...

25.Missing someone?
हो....कामवाली..............:(

26.Vehicle?
सगळ्या देशी लोकांची इथे असते तिच....कुमारी टोयोटा ...(टोयोटा कॅमरी यार...)

27.Something you’re not wearing?
कानातले...सगळ्यात पैलं लेकाच्य हातात लागतात ना आजकाल....

28.Your favorite store?
ट्रेडर जोज, खादी ग्रामोद्योग...ही खरेदीसाठी आणि नुस्तं पाहायला मुंबैतलं मेसिज उर्फ़ शॉपर्स स्टॉप
Crosswords/Landmark
पाइन्स

Your favorite color?
पांढरा आणि गोड गुलाबी....(टॉम बॉय कॅटेगरीपण शेवटी मुलगीच असतात असं अचानक लक्षात आलं)

29.When was the last time you laughed?
सक्काळीच बापाच्या मागे पोरगा त्याचा बाथटब घेऊन गेला ते ध्यान पाहुन....हे हे....

30.Last time you cried?
घर सोडताना मागच्या महिन्यात

31.Your best friend?
जगभर कामासाठी फ़िरतोय...

32.One place that you go to over and over?
diaper changing station....

33.One person who emails me regularly?
सध्यातरी ब्लॉगस्पॉटवाले...प्रत्येक कॉमेन्टसाठी इमाने इतबारे मेल करतात बिचारे...बाकीच्यांनी इमान कधीच सोडलंय...

34.Favorite place to eat?
गजाली, पी एफ़ चॅंग, तंदुरी मिळेल ती सगळी आणि दादरमधली अगणीत.............

तन्वीला सगळ्यांनीच टॅगलंय म्हणजे आतापर्यंत ती खरडत असेल...म्हणून मी पेठेकाका,हेरंब,रोहन, अजय, भाग्यश्रीताई, अश्विनी(तिचा ब्लॉग आय डी पण माहित नाही पण लेट्स सी ती प्रतिक्रियेमध्ये लिहीणार का काही....अश्विनी............ये ना..........) यांना टॅगतेय.....

46 comments:

 1. अपर्णा: माफ कर पण टॅग करणे म्हणजे काय हे मला कुणी सांगेना का आणि तु मला टॅग केलंस म्हणजे मी ते कुठे पाहू हे ही सांग. ब

  ReplyDelete
 2. अपर्णा सहीच.... डायपर चेंजिग स्टेशन...हा हा... बाकी तोंडावर गोडगोड आणि मागून...पर्फेक्ट गं....एकदम पट्याच.मस्त मूड बनवलास. थांकू थांकू... आता या धाग्याचे मारूतीचे शेपूट होतेय बघ... :)

  ReplyDelete
 3. अजय जी काही तोडकी मोडकी माहिती बाकी काही लोकांनी यापुर्वी टॅग ही भानगड त्यांच्या ब्लॉगवर केलीय त्यावरून थोडक्यात म्हणजे गाण्याच्या भेंडीसारखं एकाचं संपलं की दुसर्याने चालु करुन बघायचं हा धागा किती पुढे पुढे नेऊ शकतो. In short, blogs linking thru a similar post...थोडंफ़ार खो दिल्यासारखं..वाच ना हिच पोस्ट तुला कळेल...या पोस्टमध्ये याच प्रश्नांवर खरं तर एकच शब्दात उत्तरे देणं हा टास्क आहे..बघ बाकिच्या पोस्ट मी लिंक केलेल्या तुला कळेल...:) एक प्रकारचा खेळ कम थोडं माहितीसारखं....

  ReplyDelete
 4. भाग्यश्रीताई, नशीब तू मुडात आलीस ते....नाहीतर मग तुला फ़ोन करून छळता नसतं आलं...आणि बयो पाणी-पुरी दिसली नाही वाटतं उत्तरातली????आम्ही नाही जा...

  ReplyDelete
 5. अग दिसली गं दिसली.... तुझी इच्छा लवकरच पुरी होवो....बाय द वे, आमची पोटे ठणठणीत हायेत बॊ...हा हा...मला माहीत होतेच तू शिव्या दिल्यास तरी थोड्या कमीच देशील...:)

  ReplyDelete
 6. हम्म्म..सगळं पाणीपुरीसाठी यार....

  ReplyDelete
 7. अपर्णा, आत्ता बघितली डकवा-डकवी.. आदितेय-१ झोपला की आदितेय-२ (laptop ग :) ) माझ्या वाट्याला येईल. मग सरकवतो धागा पुढे.

  ReplyDelete
 8. हो त्याशिवाय कसं लिहिणार तू हेरंब...आणि हो पोस्ट दिसणेबल राहु दे..मागची एक दिसतच नाहीये....;)

  ReplyDelete
 9. हो. मागची पोस्ट पण टाकतो १-२ दिवसात. आ-१ & आ-२ चं समीकरण जुळल्यावर :)

  ReplyDelete
 10. मी पण टॅगची उत्तर दिली बरं का, मस्त आहे हा खेळ

  ReplyDelete
 11. वो बाय लय भारी लिवलत बघा...त्ये तोंडावर ग्वाड वालं तर येकदम म्हनजे बाय अवो रडू आलं येव्हढ खर वो............
  आरुषचे ध्यान मलाहि दिसले आणि हसु आले बघ.........त्याला माझा गोड गोड पापा.....आणि मेल लिहीते म्हटलय ना चार लोकात ईज्जत काढू नकोस...........

  ReplyDelete
 12. अजय वाचते आता तुझी पण.....

  ReplyDelete
 13. तन्वी बाय तुमास्नी पन बरेच लोकांनी पिंगलय....कदी टाकतासा पोस्त...
  अगं हसायचे प्रसंग आजकाल आरूषमुळेच मिळतात..नाहीतर मी कामं करून कावलेली असते...म्येलचं आता -हाऊद्या...म्या कुटं काय बी बोलले न्हाय...

  ReplyDelete
 14. actully me Anuja la mail madhe pathav le aahe aani aata tu mhanalis mhaun comment madhe dete .... aani ho maza blog nahi ye :)


  1.Where is your cell phone?
  Office table


  2.Your hair?
  Neatly tied (pony tail)


  3.Your mother?
  amm she is like me only hehehe my elder sister J
  4.Your father?
  My friend

  5.Your favorite food?
  pani-puri/kachori (aai ne keleli)/pav bhaji (my hubby don’t all these food)
  6.Your dream last night?
  hmmmm …….i m not sleeping continually from past 1 n half yr. my daughter is only 14mth old heheheh
  7.Your favorite drink?
  butter milk/mangola
  8.Your dream/goal?
  my hubby should become successful businessman and I will help him in background

  (he recently started his own business)
  9.What room are you in?
  in office cubical L

  10.Your hobby?
  playing any game TT/Carrom/Badminton etc etc
  11.Your fear?
  don’t want become lonely
  12.Where do you want to be in 6 years?
  actually there are many things ………..

  13.Where were you last night?
  home
  14.Something that you aren’t?
  aggressive


  15.Muffins?
  malai burfi

  16.Wish list item?
  nothing (satisfied)

  17.Where did you grow up?
  malegaon/dhule/nashik/pune/hyderabad

  18.Last thing you did?
  came to office
  19.What are you wearing?
  salwar+kamiz

  20.Your TV?
  no cable at home
  21.Your pets?
  no pets

  22.Friends?
  too many friends thanks to god for that
  23.Your life?
  happy/some times very sad (mix)

  24.Your mood?
  right now happy (I m very moody person)
  25.Missing someone?
  my lovely daughter for each n every moment
  26.Vehicle?
  activa n santro

  27.Something you’re not wearing?
  sarrie
  28.Your favorite store?
  not specific

  Your favorite color?
  sky blue
  29.When was the last time you laughed?
  yesterday

  30.Last time you cried?
  amm not remember
  31.Your best friend?
  my daughter heheheh
  32.One place that you go to over and over?
  office

  33.One person who emails me regularly?
  Gnats hehehe (bug reporting s/w)
  34.Favorite place to eat?

  Mother’s place

  -Ashwini

  ReplyDelete
 15. क्या बात है अश्विनी...लगेच आलीस...या टॅगच्या मूळ मालकाने तुझ्या प्रतिक्रियेची नोंद घ्यायला हवी....(रियॅलिटी शोजचे जजेस चावल्यासारखं वाटतंय....असो...) धन्यवाद....
  अगं माझं पण लेकरू आता एकोणीस महिने म्हणजे कसली झोप नी कसलं काय....

  ReplyDelete
 16. ्डायपर चेंज.. आणि हात पण धुतले... आता हेसांगायची वेळ का यावी बरं?

  ....

  ReplyDelete
 17. सांगितलेलं बरं म्हणून हो फ़ाइन प्रिंट होती ती...सिगरेटच्या पाकिटावर सैद्धांतिक इशारा असतो ना तसं काहीस....(आज काय झालंय कळत नाही सैद्धांतिक सारखे शब्द आठवताहेत म्हणजे....ये टॅगमें जरुर कुछ मिलावट है)

  ReplyDelete
 18. धागा सरकवला पुढे

  ReplyDelete
 19. नेहमी सारखा हा पण धागा मस्त जोडलास. आरुष चे खुर्चीवर येणे मस्तच!!!! आता भानस चे व अजय चे वाचायला जाते.

  ReplyDelete
 20. धन्यवाद हेरंब आणि अनुजाताई.

  ReplyDelete
 21. :-) डायपर चेंज.. आणि हात पण धुतले... :) :)

  ReplyDelete
 22. अपर्णा: माफ कर पण टॅग करणे म्हणजे काय हे मला कुणी सांगेना का >>> Aparna maaph kar mala kunee tagel ka? ;)

  ReplyDelete
 23. दिप अरे अजयच्या प्रतिक्रियेला उत्तर म्हणून मी तोडकी मोडकी माहिती दिली आहे...वाच...a

  ReplyDelete
 24. निवडक उत्तरांमधून युनिक उत्तरं बनवायची हे हे हे
  मिसिंग कामवाली ... अगदी जिव्हाळ्याचा विषय - जिची आपण डोळ्यात प्राण आणून वाट बघतो अशी व्यक्ती :D :D
  सहीच जोडलाय धागा :)

  ReplyDelete
 25. हा हा गौरी धन्यवाद...तूच पाठवलायस शेवटी.....कामवालीची इथे नेव्हरएंडिंग वेट आहे गं म्हणून अगदी सेकंदात तिचंच नाव आलं...

  ReplyDelete
 26. डायपर चेंजिग स्टेशन...
  कामवाली...
  सहीच!
  मी पण या खेळात सहभागी झालोय... कुणी टॅग करायची काय गरज... नाही का?

  ReplyDelete
 27. इसको बोलते है स्पिरीट अनामिक...तसंही तन्वीने लिहिलंय ना की कुणी राहिलं असेल त्यांना ती टॅगतेय...आत्ता वाचते तुमचंही पुराण...:)

  ReplyDelete
 28. बर्‍यापैकी युनिक आहेत उत्तरं, आणि खुमासदारही .. मजा आली :)

  ReplyDelete
 29. धन्यवाद प्रसाद...अरे काय आहे एकदा का माणूस मुंबई युनिव्हर्सिटीमधुन इंजिनियरिंगची परिक्षा (विथ अ फ़्यु ऑनरेबल केटीज) उत्तीर्ण झाला की हे प्रश्न सोडवायला त्यांनी दिलेली पंधरा मिन्ट आरामात पुरतात...

  ReplyDelete
 30. धन्यवाद रविन्द्रजी.....

  ReplyDelete
 31. खरच..मारुतीच शेपूट झालाय :)
  खूप छान लिहलाय टॅग...आणि ब्लॉग पण :):)

  ReplyDelete
 32. धन्यवाद सुहास...ब्लॉग आवडला बरे वाटले....अशीच भेट देत राहा...:)

  ReplyDelete
 33. chaan chaan...sadhya tari aayushy diper bhovati firtay tar. :)

  ReplyDelete
 34. हा हा हा सोनल....डायपर एक मोठंच अंग झालाय :)

  ReplyDelete
 35. अजय च्या ब्लॉग वर तुझ्या ब्लॉग चा सन्दर्भ होंता, तुझी "धागा वाढता वाढता वाढतोय" ही पोस्ट वाचली. खूप amazing वाटल वाचताना specially, तुझे "Reading, Your fear, missing someone, आणि your dream goal वरचे comments खूप आवडले. मुख्य म्हणजे ही संकल्पनाच खूप सही वाटली...

  ReplyDelete
 36. धन्यवाद अनुजा...ते dream/goal फ़क्त dream राहू नये इतकंच....स्वागत आणि लोभ असूदे....नवीन वर्षाच्या शुभेच्छा....

  ReplyDelete
 37. आता वेळ काढून धागा शिवलाच पाहिजे ... :)

  ReplyDelete
 38. हा हा हा...रोहन वेळ तर आता तुला मिळेलच..फ़क्त शिवण नीट घाल म्हणजे झालं....

  ReplyDelete
 39. tumhala he sagal jamat kas...lay bhari

  ReplyDelete
 40. ह्ये म्हन्जे काय भौ (की भन?) ???

  ReplyDelete
 41. अरे? हे माझ्या वाचनातून कसं सुटलं? बाई बाई गं तुमचं आणि आमचं सगळंच कसं सेम निघालं. आजपर्यंत फ़क्त माझं आणि तन्वीचंच असं व्हायचं आता बहुदा आपली तिकडी जमणार. मस्त धमाल झालाय धागा.

  ता.क.-माझ्या धाग्यावर तू डायपरचं सेम आहे म्हणाली होतीस. पण मी कंसात हात धुतल्याचा उल्लेख नव्हता केला. :) (धुतला असावा बहुदा)

  ReplyDelete
 42. अगं शिनु तू ते तुझ्या त्या अंबानी नेटवर्कवर ढकल....आणि अजून काही राहिलं असेल तर ते पण वाचुन कॉमेन्टून टाक...:) आपली तिकडी जमणार हे नक्की...फ़क्त कधी,कुठे हे माहित नाही...
  आणि अगं तुपलं आपलं श्येम मग ते हात धुतल्याचं इथलं तिथे चिटकव की...ही ही ही....:)

  ReplyDelete
 43. वसई जि. ठाणे.. म्हणजे टेक्निकली मुंबईबाहेरचं खेडेगाव... हीहीही (मुंबई सोडून जगातली कुठलीही जागा म्हणजे खेडेगाव असं मुंबईकर मानतात. त्या न्यायाने ह्यूस्टन हेही गाव आहे; शिकागो हेही गाव आणि न्यू जर्सी हेही गावच! ;-) ) छान आहे लेख. मजा आली वाचताना. :-)

  ReplyDelete
 44. संकेत, तुझ टेक्निकली बरोबर आहे...फक्त आता सासर आणि माहेर दोन्ही मुंबईत आले आहेत....(अंधेरी आणि बोरीवली अनुक्रमे...) आणि मला वसईपण खूप आवडत...शांत, हिरवं, स्वच्छ मस्त....:)

  ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.