सध्याच्या सारेगमपच्या एका भागात सलीलने त्याची एका गाण्याची प्रतिक्रिया देताना सहज म्हटलं की नव्याने स्वयंपाक शिकलेल्यांच्या पोळ्या लगेच ओळखता येतात. तसं माझी आणि माझ्या नवर्याची नजरानजर झाली आणि काय बोलणार एका दुखर्या नसेवर बोट ठेवलं गेलं. म्हणजे तसं ते रोजच ठेवलं जातं, कारण पोळीशिवाय पान हलत नाही (म्हणण्यापेक्षा पान वाढल जात नाही) आणि पोळी तर करता येत नाही. मग नाचता येईना अंगण वाकडं तस वातड पोळीसाठी इथलं विकतचं पीठ म्हणजे मैदा, नाहीतर कॉइलवाला गॅस असली कायबाय निमित्त करुन आपलं मनाचं समाधान करून घ्यायचं आणि काय...
माझ्या पिढीतल्या बाकी सगळ्याच मुलींसारखं मलाही घरातल्या स्वयंपाकघरात कधी काम करावं लागलं नाही. किंवा जास्त स्पष्ट सांगायचं तर आपल्या मुलांनी चांगलं शिकुन मोठ्ठं व्हावं म्हणून माझ्या आईने कधीच आम्हा कुणालाच अभ्यासातून बाहेर काढुन हे करा ते करा केलं नाही. जो काही वेळ असे तेव्हा तिला सटरफ़टर मदत नक्कीच केली पण स्वयंपाक अहं...कधीच नाही. त्यामुळे लग्न झाल्यावर थेट अमेरिकेत आल्यावर सर्वात जास्त आठवण झाली ती रोज मिळणार्या आईच्या हातच्या स्वयंपाकाची. ती तशी अजुनही येते पण तो पहिला महिना किंवा सुरुवातीचे बरेच महिने खाण्याच्या बाबतीत एकदम बेकार होते.
पहिल्यांदा नवर्याबरोबर जाऊन भाज्या-बिज्या घेऊन आलो. काही मसाले इतर सामान भारतातून आणलेल्या बॅगमध्येही होतं. पण कसं करायचं?? मुख्य प्रश्न. भाज्या तरी तशा सोप्प्या आणि कुकरचाही आधार होता. पण चपातीचं काय? आणि नवर्याला तर काय कधीही विचारलं काय करायचं जेवायला तर उत्तर चपाती-भाजी असंच असे. माझ्या आईकडे तसं भात खाणारेच जास्त म्हणायचे कारण आम्ही टेक्निकली कोकणातले. पण सासरकडचं गाव नाशकाकडे म्हणजे त्यांना जास्त सवय पोळीची. त्यामुळे जरी भाज्या साधारण फ़ोडणीचा मंत्र मारून आणि जमेल ते मसाले घालुन केल्या तरी पोळ्यांचं काय. हा काय नुसता वरण-भात-भाजी खायचा नाही शिवाय डब्यात रोजची सवय असल्याने मलाही पोळ्या आवडतात. पण स्वतः करायच्या म्हणजे गाडं कायमचंच अडलेलं.
मग इथे ज्या सुग्रास जेवण करणार्या मैत्रीणी भेटल्या त्या सगळ्यांकडून पोळ्या कशा करायच्या हे शिकायचाही प्रयत्न केला.कुठेही जेवायला बोलावलं की साधारण भाज्या, गोड पदार्थ इत्यादींच कौतुक पहिल्यांदी होतं. पण आम्ही दोघं कुठे गेलो की मऊसुत पोळीचा लचका तोडता-तोडता लगेच आणि जवळ जवळ एकत्रच पोळीला दाद देत असु तेव्हा त्या घरच्यांचा चेहर्यावरचा भाव खरंच पाहण्यासारखा असे.
अर्थात आमच्याकडे येऊन जर चुकून घरची पोळी ताटात आली तर त्यांना लगेच कळेल ते दाद का मिळतेय..पण तशी मी हुशार आहे.एकतर कुणाला बोलावल्यावर शक्यतो पोळीला जमेल तेवढं टाळता येईल असंच काहीतरी मेन्युवर ठेवायचं नाहीतर सरळ भारतीय दुकानात विकत मिळणारी पोळी मायक्रोवेव्ह करून पानात आणि हेही नसेल तर मग पोळीचा सख्खाच भाऊ पराठा भरपुर बटर लावुन दिला की कोण पोळीची आठवण काढील?
मला तर वाटतं ही बया माझ्यासारख्या काहींना कधीच प्रसन्न होत नसावी. सुरुवातीला इथं मिळणारं गोल्डन टेम्पल जरा मैद्यासारखं वाटलं म्हणून इतर पीठं वापरून पाहिली तर त्यांनीही मला कधी साथ दिली नाही. म्हणजे आमच्या इतर मित्रमैत्रीणींच्या घरी जाऊन "अरे वा, चांगल्या होतात वाटतं पोळ्या. कुठलं पीठ वापरतेस?" म्हणून ते वापरावं तरी ते माझ्याकडे आल्यावर येरे माझ्या मागल्या. मग कुणी म्हणे अगं पीठ कोमट पाण्याने मळ, नाहीतर मळताना त्यात दूध घाल.एक ना दोन कितीतरी सल्ले पण माझ्या स्वयंपाकघरात मंत्र मारल्यासारखी पोळी वातड ती वातडच..
त्यानंतर आमच्याकडे माझे सासु-सासरे आले दोन-तीन महिन्यांसाठी. माझी पोळीबद्दलची रड त्यांच्या कानावर गेली असावी. सासुबाई माझ्यासाठी खास गिरणीत दळलेलं पीठ घेऊन आल्या.मुख्य त्यांनी माझ्या घरी पहिल्यांदाच इलेक्ट्रिकचा गॅस पाहिला त्यामुळे त्यांची माझ्याबद्दलची (की माझ्या नेहमी बिघडणार्या पोळ्यांबद्दलची) कणव वाढली. मग त्या स्वतःच मुक्काम संपेपर्यंत पोळ्या करायच्या आणि तेही मी आणलेल्या इथल्या पिठाच्या. मी परत गेले की तू मी आणलेलं पीठ वापर, मग चांगल्या होतील असा दिलासा पण दिला. पण अगदी माझ्या आईसारखंच मला पोळ्या करायला मात्र त्या शिकवु शकल्या नाहीत. किंवा कदाचित त्यांनी माझी एकंदरित प्रगती पाहुन तो विचारच सोडला असावा.
त्यानंतर मग आम्ही घर घेतलं आणि इलेक्ट्रिकच्या गॅसची कटकट संपली. आता तरी पोळी प्रसन्न होईल अशा विचारात मी होते. पण थोडा वातडपणा कमी झाला इतकंच आणि फ़ुलके थोडे बरे व्हायला लागले.म्हणजे नवर्याच्या भाषेत होस्टेल बदललं..मी म्हटलं त्याला अरे पोळी करणं किती चॅलेंजिंग आहे माहित आहे का तुला?? तर यावर साहेबांचं उत्तर म्हणजे, त्या खाणं किती चॅलेजिंग आहे माहित आहे का तुला?? काय बोलणार मी स्वतःच माझ्या चपात्यांना चॅलेंजिग चपाती म्हणते..फ़क्त याची व्याख्या आमच्या दोघांच्या दृष्टीने वेगळी आहे इतकंच. आणि आता तर काय पुन्यांदा कॉइलवाला गॅस इकडच्या घरात त्यामुळे परत एकदा बोंबाबोंब. वैरीण आहे माझी ही पोळी दुसरं काय?
ता.क.फ़ोटोअर्थातच मायाजालावरुन साभार हे काय सांगणं??
ता.क.फ़ोटोअर्थातच मायाजालावरुन साभार हे काय सांगणं??
शेवटी झाली एकदाची प्रसन्न... मस्त आहे पोस्ट!! इतका द्रविडीप्राणायम.. बापरे..
ReplyDeleteशेवटच्या फोटोतल्या फुलक्यासारखाच लेखही फुलून आलाय!
ReplyDelete-अनामिक
अपर्णा पोळीपुराण लय भारी रंगलयं बरं का... आता पोळी प्रसन्न होणार बघ तुझ्यावर. मस्त टुमटुमीत फुगलीये. वाढ पटकन नव~याच्या पानात पण अर्धी करून गं...अर्धी तुला पण घे...:)
ReplyDeletekhara aahe aparna tai...
ReplyDeletemala pan poli jamat nahi....lagnala ata 5 warsha zali...tari pan...
aaj kalche naware kharach changale aahet....bichare bayko karel te khatat....
महेन्र्दकाका, प्रसन्न कुठे हो अजुनही चॅलेंजिगच आहे कारण नव्या जागी पुन्हा एकदा गॅसने साथ सोडलीय ना...:(
ReplyDeleteअनामिक स्वागत आणि खूप खूप आभार...उगाच फ़ुलून आल्यासारखं वाटतंय.....:)
ReplyDeleteभाग्यश्रीताई, तळटीप नीट वाच. फ़ोटो मायाजालावरचे आहेत...हे हे....अशी पोळी फ़ुगली तर खरंच वाट्याला येणार नाही..
ReplyDeleteमनल (की मिनल?) अगं माझ्याही लग्नाचं सहावंच वर्षं चालु आहे तर तू मला ताई-बिई म्हणायची गरज नाही..आणि हो अगं आजकाल बाकी पण बरंच बदललंय ना आपण नवर्यांसारखी किंवा त्यांच्यापेक्षा जास्त कामं करतो मग काय तक्रार करणार ते?? प्रतिक्रियेबद्दल आभार आणि अशीच भेट देत रहा...
ReplyDeleteही ही ही......ही ही ही.....ही ही ही....एका बाईला पोळ्या येत नाही!!! टुक टुक.............
ReplyDeleteलिहीलीस लगेच पोस्ट...मस्त झालीये.....मला वाटतं मला ईतकी सवय झालीये पोळ्या करण्याची की ईतर काहिही करण्यापेक्षा पटापट पोळ्या बडवल्या की बरे वाटते.....आईची तर पोळ्यात मास्टरी आहे पण माझे बाबा एकदा आईला म्हटले होते की ताईपण त्याच कणकेच्या पोळ्या करते ना मग तिच्या कश्या अश्या वेगळ्या छान होतात....तेच कढीच्या बाबत पण.....
बयो तुझा नवरा नासिकचा ना गं!!!! देशावरचे आम्ही.............
पोस्ट मस्त........
अगं तन्वी,vफ़ारा दिवसांपासून लिहित होते..आता इथल्या कॉइलवाल्या गॅसने लिहायला भाग पाडलं म्हण...:)
ReplyDeleteह्म्म्म हे देश-कोकण जेवणाच्या वेळी फ़ार गोंधळ घालतात...माझा नवरा मला कोकनाटे म्हणतो...(अर्थातच प्रेमाने...:))
पोळ्या करणं म्हणजे खरचं चॅलेंज असतं. मी आणि माझा रूम पार्ट्नर बहुतेक सगळ्या भाज्या, पिठलं, थालिपीठ, मासे, चिकन, बिर्याणी असे सगळं बनवायचो. पण चपातीच्या वाटेला कधी गेलो नाही. प्रयत्न देखील केला नाही.
ReplyDeleteघरोघरी मैद्याची पोळी.. ;)
ReplyDeleteबघ सिद्धार्थ, मानलंस ना?? उगाच नाही जागोजागी पोळी-भाजी केंद्र आलीत..त्यांच्या पोळ्या खपवायला माझ्यासारखी कुटुंब आहेत ना....
ReplyDeleteहा हा हा..हेरंब इथे अमेरिकेत तरी मैद्याचीच...इथल्या कुठच्याच पीठाचं काही खरं नाही...
ReplyDeleteपोळीचा दर्जा पीठ मळताना पिठात सुरू झालेल्या रासायनिक क्रिया पूर्ण होण्यावर अवलंबून असतो. यासाठी पीठ मळण्यास अधिक वेश देणे व मळलेल्या पिठाची पोळी अर्ध्या तासाने भाजण्यास घेणे हे उपाय आहेत.
ReplyDeleteधन्यवाद अनामिक....माझी पोळी रासायनिक प्रक्रियेच्या पलीकडे गेली आहे...माझ्यावर कधीच प्रसन्न न होण्याचा तिने चंगच बांधलाय....म्हणून तर तिला वैरीण म्हटलंय....:)
ReplyDeleteila photu tar lai bhaaree aahet ke g!
ReplyDeletenavryala mhnaav tu polee kar ek diwas ;)
mazya polyaa mich khaat aslyaane mi kunalaahee naav thevt naahee ;) :D
btw polee he golch kaa asawee hyavr aamch ekda kadakyach bhandan zal hote aani tenvha paasn me polecha aakaar darvelee badlto! hahaha
अरे दीप, फ़ोटो कुठे आमच्या घरच्या पोळीचा आहे??? :)
ReplyDeleteआणि पोळीवरची भांडणं काय विचारू नकोस. तू कर म्हणून सांगुन झालंय पण तो पीठ मळायला मदत करतो...आकारापर्यंत आम्ही जातच नाही...ते फ़ाइन डिटेल्स मध्ये येतं ना...ही ही.....
पण सांगु का??
"पोळीवरून भांडण रंगतं दूरदेशीच्या स्वयंपाकघरात
आणि मायदेशी जायची स्वप्न ती दोघं बघतात पोळीवाली मिळेत या भरवशात...."
Bap re polya karan itak kathin asat :)
ReplyDeleteरविन्र्दजी पोळ्या करणं खरं तर यापेक्षाही कठिण असतं...निदान माझ्यासारख्यांसाठीतरी..
ReplyDeleteधन्य माझ्या आईसारख्या सगळ्या माऊल्या ज्यांनी आयुष्यभर मऊसूत पोळ्या करून वाढल्या आणि धन्य त्या तन्वीसारख्या काही ज्यांना पोळ्या करायची पण सवय झालीये आणि त्यांच्या चांगल्यापण होतात...
आम्ही मात्र पोळीच्या नावाने रोज रडे....
boss apne ko bhi poli nahi aati .... hehehe ...lagna nantar pahilyan da pol-pat latane hatat ghetale teva aathav li aai hehehe thode diwas kelya polya ... nantar bai ch lawali :) ajun hi bai ch aata muli sathi parathe karate me kadhi tari aani manoman prathna karat aste deva fulu de plz hehehehe .... post mast aahe :)
ReplyDelete-ashwini
अश्विनी, अगं आपली पिढीच असली...हे हे....अशा तन्वीसारख्या गुणी मुली कमीच असतील...तुला बरंय ना पण बाई आहे ती..या एका कारणासाठी मला कधीही भारतात परतायचयं....:)
ReplyDeleteमस्त झाली पोस्ट पोळीची. येतील हळू हळू...... मजा आली वाचताना. मी पण मस्कत आल्यावर स्वयंपाक एकटीने करू लागले. जाऊदे कणीकच नीट
ReplyDeleteनाही असे म्हणायचे.
माझ्या ब्लॉगवरची पोस्ट पहा. टॅग..
ReplyDeleteअनुजाताई प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद..चला पोळीने त्रासलेली मी एकटीच नाहीये हे पाहातेय बरं वाटतंय....:)
ReplyDeleteमहेन्द्रकाका, आपने बोला तो अपुनने ताबडतोब सुन्या..सुन्या और टॅगा भी....
ReplyDeleteही पोस्ट कशी सुटली माझ्या हातातून ... ते सुद्धा खायची असून ??? दाखवून दिलीस बरे झाले.. मी तिकडे आलो ना की मला सुद्धा अश्या पोळ्या हव्या बरं का... :) नाहीतरी मी भात कमीच खातो ... हेहेहे
ReplyDeleteअरे रोहन वातड पोळीची आहे म्हणून सुटली असेल...तू आता काय स्वतःच बळी व्हायला तयार झालास तर माझ्या वाटच्या (मी केलेल्या) पोळ्यासुद्धा तुलाच देईन...:)
ReplyDeletejabaree, khUp mast post.
ReplyDelete:) धन्यवाद सोनाली...
ReplyDeleteमाझ्या पण पोळ्या खुप वाईट होतात, मी खुप टाळते करण. एकतर पोळी भाजी केंद्र मदतीला येतात नाहीतर पोळीवाल्या बाई.
ReplyDeleteतुला ती सोय आहे बाई सोनाली...काहीतरी योगायोग आहे बघ नेमकी तुझी प्रतिक्रिया आणि इतक्यात इथे भेटलेल्या एका मैत्रीणीने घेतलेला माझा पोळीचा क्लास...लक्षात राहिल बघ...
ReplyDeleteतुला पोळी करता येत नाही? हीहीही... माझाही हाच प्रॉब्लेम आहे. म्हणजे इकडे सातासमुद्रापार यायचं म्हटल्यावर ‘जेवण बनवता यायला हवं तुला. अगदी पंचपक्वान्न बनवता आली नाहीत तरी चालेल, पण पोटापाण्यापुरतं यायला हवं. मुलगा असलास तरीही!’ या अर्थाच्या सूचना कम आज्ञा मिळाल्यावर मी काही दिवस स्वयंपाक शिकण्याचा प्रयत्न केला होता. त्यात पोळ्या करण्याचाही एक कोर्स होता. पण मी केलेली पोळीही कधी मऊ झाली नाही. मला कणीक चांगली मळता यायची आणि माझ्या लाटलेल्या पोळ्यापण अगदी व्यवस्थित गोल व्हायच्या पण त्या मऊ कधी झाल्या नाहीत. गॅस बारीक केला तर वातड, मोठा केला तर जळक्या आणि मध्यम ठेवला तर कच्च्या व्हायच्या! काही प्रयत्नांनंतर मात्र मी परत कधी आईला मदत करण्याच्या नावाखाली तिचं काम वाढवलं नाही... ;-)
ReplyDeleteसंकेत, तुझी प्रगती मला माझ्यापेक्षा बरीच चांगली वाटते....काहीवेळा माझं कणिक तिबण्यापासून रडारड असते.....आणि पोळीवाली बाई हे आमच अमेरिका सोडण्याचा मुख्य कारण असेल हे मी तुला आगाऊ(पणे) सांगून ठेवते....:)
ReplyDeletepoli khupach aavadali !!! aga ghabru nakos, sarvanchech ase hote, mazehi asech hoat hote,, lagnanantar kahi divas,, mag chhan jamayla laglya,, tyavar poli prakaran asa lekhhi lihila aahe :) Ashirvaad aata chhan aahe,,aani coil var polya titkya chhan hoatach nahi,, mi step by step poli changli honyakarta poli chi recipe pan lihili aahe,, mast vatle pan hi post vachun :)
ReplyDeleteरोहिणीताई खूप आभार. आता माझ्या घरात पुन्हा gas आला आहे त्यामुळे पुन्हा एकदा जोमाने पोळ्या कराव्या म्हणते. :)
Deleteतुम्ही नेटवर फोटो पहिला तो यंदा पहिल्यांदा केलेल्या पुरणपोळीचा असणार …तशी माझ्या मानाने बरीच बरी झाली होती. तुमच्यासारख्या सुगृहिणीच्या कमेंटमुळे आता बहुतेक पोळ्या सुधारतील माझ्या.
तुम्हाला होळीच्याही शुभेच्छा :)
http://www.rohinivinayak.blogspot.com/2009/04/blog-post_07.html
ReplyDeletehttp://www.rohinivinayak.blogspot.com/2007/01/blog-post_116888606746916222.html
poli prakaran,,, aani poli recipe var 2 links dilya aahet,, thanks
रोहिणीताई दोन्ही रेसिपी सवडीने नक्की पहते.
Deleteआभार.