सध्या ब्लॉग्ज, वृत्तपत्रं, फ़ॉर्वड मेल्स सगळीकडे २००९ ला निरोपाच्या भाषा सुरू आहेत त्यामुळे थोडंसं टॅगच्या पोस्टसारखं ठरवलं आपणही देऊया आपला एक छोटासा निरोप आणि येणार्या वर्षासाठी शुभेच्छा. आपण कितीही घोष केला की हिंदु नववर्ष आता नाही पाडव्याला तरी काय आहे, शेवटी रोज जी तारीख लिहितो तिचं वर्ष बदलायचा दिवस १ जानेवारीलाच येतो. म्हणजे या नववर्षापासून कुणाची सुटका नाही.
तर काय काय घडलं २००९ मध्ये माझ्याकडे? काही नाही एका साध्यासुध्या मराठी घरात घडू शकेल तेच...सगळं घरगुती तरीही खास. सगळ्यात पहिलं मागची थंडी आवरता आवरता हा ब्लॉग चालु केला आणि आठवड्यामाजी काही बाही लिहून चालुही ठेवला. खरं तर विश्वास बसत नाही की चक्क २९ लोकांना या ब्लॉगशी दोस्ती करावीशी वाटली आणि जवळपास दहा हजार भेटी. अधेमधे काही लिहायची प्रेरणा म्हणजे माझे फ़ॉलोअर्स आणि आवर्जुन मिळणार्या प्रतिक्रिया.त्यानंतर मुख्य म्हणजे मुलाचा पहिला वाढदिवस. कालपरवापर्यंत रांगणार्या आणि महिन्यांमध्ये मोजणी होणार्या बाळाला वाढदिवशी औक्षण करताना आधीचं वर्ष लख्खपणे तरळलं. आईची खूप आठवण झाली त्याच्यासाठी पण आई नाही येऊ शकली तरी भारतातून त्याची आत्या आणि नवर्याची एक मैत्रीण येऊ शकले हा बोनस. आता एका मित्राच्या भाषेत सांगायचं तर terrrible two चालु झालेत.
त्यानंतर बी.एम.एम.ची तयारी. जे काही थोडं-फ़ार करता आलं वॉलेंटियर म्हणून त्यातल्या शेवटच्या टप्प्याचं काम आणि मग मुख्य तीन दिवसांची धमाल. खूप सारे कार्यक्रम, भारतीय जेवण, मैत्रिणींशी गप्पा, थोडंफ़ार गॉसिप आणि बरंच काही पण फ़ुल टू मजा. त्यानंतरही जवळच्या मराठी मंडळात कार्यकारिणीत असल्याने वेगळी धमाल होतीच. सणावारी कार्यक्रम, त्याच्या मिटिंग्ज, थोडंफ़ार वेबचं काम शिकणं असं काही ना काही चालुच होतं.
उन्हाळा म्हटला की काहीतरी हिंडण्या-फ़िरण्याचा कार्यक्रम झालाच पाहिजे तसं ऑगस्टच्या सुरूवातीला लेक जॉर्जला जाऊन आलो. एकदम रिलॅक्सिंग जागा आहे. खरं तर फ़ॉलमध्ये गेलं तर रंगांचा बहर फ़ार छान पाहता येईल. पण उन्हाळ्यात बोटिंग आणि मोठमोठ्या दिवसांची मजा लुटायलाही अगदी योग्य.
सगळं आवरून कसंबसं कडाक्याची थंडी पडायच्या आत निघालो आणि जवळजवळ दुसर्याच आठवड्यात तिथे जुन्या जागी बर्फ़ पडल्याचं मैत्रीणीने कळवलं. म्हटलं नशीब नाहीतर मुव्हिंगमध्ये हाल झाले असते.
इथे महिनाच होतोय आताशी, नव्या जागी रूळायचं काम पुढच्या वर्षातच होणार आता. पण सध्यातरी सरत्या वर्षाला शांततेत निरोप आणि येणारं वर्ष सर्वांसाठीच आशेचे किरण घेऊन येवो ही अपेक्षा.....
अपर्णाजी.
ReplyDeleteनविन वर्षाच्या अनेक शुभेच्छा!!
माझ्या पोस्ट मुळे उगाचंच सगळे सिरीअस झालात नं अपर्णा?
ReplyDeleteअसो, मला जे वाटतं ते तुम्हालाही तसंच वाटलं यात खुप समाधान आहे मला..
तुला, तुझ्या मिस्टरांना आणि पिल्लुला..आई आली आहे तेव्हा तिलाही नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा!
नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना अनेक अनेक शुभेच्छा!!!!!!!!!!!!!!
ReplyDeleteअपर्णाजी.
ReplyDeleteनविन वर्षाच्या शुभेच्छा!
पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा..
ReplyDeleteतुमच्या कर्तॄत्वाला, पुन्हा एक नवी दिशा..
मागे वळुनी नको पाहणे, नको भाषा दु:खाची..
सदैव वाहो तुमच्या दारी, सरिता ही आंनदाची..
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !
२९ नव्हे, मी धरुन ३० फ़ॉलोअर्स आहेत.
ReplyDeleteलेक आणि केक दोन्ही गोड आहेत.
लेक(जॉर्ज)मस्तच!
नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा..
आणि आता मलापण अॅड कर... म्हणजे आता ३१ झालेत, नाही का?
ReplyDeleteनववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!
-अनामिक
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्याना हे वर्ष भरभराटीच, आनंदच आणि सुखाच जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
ReplyDeleteHappy New Year 2010
ReplyDeleteअपर्णा
ReplyDeleteनविन वर्षाचं स्वागत छान केलंय. मागचं वर्ष एकदम वेगळंच गेलं.. मुली मोठ्या झाल्या, कॉलेज मधे जाउ लागल्या, त्यामुळे एकदम मोठ्ं झालो असं वाटतंय.. अरे हे काय, मी तर माझं पोस्ट सुरु केलंय इथे.. असो..
नविन वर्षांच्या शुभेच्छा
महेंद्र
सुंदर
ReplyDeleteनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
आनंदजी, मुग्धा, तन्वी, मनमौजी, भुंग्या, मीनल, अनामिक, सुहास, विक्रम, महेन्र्दकाका, रविन्र्दजी सगळ्यांनाच आभार आणि पुन्हा एकदा शुभेच्छा..
ReplyDeleteमुग्धा, अगं तुला आमच्यापुढे सगळं सांगावंसं वाटलं हेच माझ्यासाठी खूप आहे गं....आणि माझी पोस्ट नंतरची आहे म्हणजे आता पुन्हा वातावरण फ़ोटो पाहुन बदलुया....:)
मीनल आणि अनामिक तुम्ही दोघांनी मिळून मला ३१ तारखेला ३१ दोस्त दिलेत, एक अनोखी नवीन वर्षाची भेट....याबद्दल डबल धन्यवाद....
महेन्द्रकाका, मी खरं तर मनात म्हणत होते टॅगण्यासाठी चांगली पोस्ट आहे पण सगळ्यांनी ३१ ला आणि तेही २००९ मध्ये काय घडलं सांगतील का जरा शंका वाटली...पण अजुन ३१ आहे तुम्ही करताय का तुमच्या ब्लॉगवर सुरू....सगळी पेटतील लगेच....ही ही......:)
सगळ्यांना पुन्हा एकदा २००९ ची शेवटची संध्याकाळ आपल्या आवडीप्रमाणे घालवण्यासाठी अनेक शुभेच्छा...(यावेळी एकच प्रतिक्रिया सगळ्यांना देतेय...कारण हेच जलद होईल असं वाटतं आणि कुणी राहून जाणार नाही)
अपर्णा नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना अनेक शुभेच्छा!:) आपली ओळख आणि छान मैत्रीही या वर्षातच झाली. त्याचा खूप आनंद आहे.ती उत्तरोत्तर वाढतच जाईल ही खात्रीही आहे.:)
ReplyDeleteअगं भाग्यश्रीताई खरंच की...वर्षाच्या जवळजवळ शेवटालाच झाली पण चांगलं झालं...आता या वर्षात प्रत्यक्ष भेट झाली तर खरं...
ReplyDelete