सामान लावताना पुस्तकांच्या खोक्यात "फ़ुलोरा" दिसलं आणि लक्षात आलं अरे, आई आल्यापासुन आपण गाणी शोधत नाही आहोत. मागे मारे ठरवलं होतं की आपणही इथे एक गीतपुष्पांचा फ़ुलोरा मांडुया आणि एक आज्जी क्या आ गयी और गाने-वाने की छुट्टी...आता आज्जी आहे म्हटलं की बाळ झोपण्यासाठी पहिलं प्राधान्य तिलाच आणि तिची गाणी इतकी वेगवेगळी असतात की मग पुस्तकांची गरज लागत नाही. पण आता जास्तीत जास्त महिना आणि मग जाईल ना आज्जी. नंतर हे प्रकरण माझ्याचकडे येणार तेव्हा आताच तयारी केलेली बरी म्हणून मग उघडलं एकदाचं आणि ही एक मस्त कविता हाती लागली. खास छोट्या कंपनीसाठी. लिहिली आहे, पद्मिनी बिनीवाले यांनी.
"असा होता गाव"
एक होता हलवाई
त्याचे नाव दलवाई
बसल्या बसल्या दुकानात
खात राही मिठाई...
एक होता धोबी
रोज नवी खुबी
शर्ट नवा पॅंट नवी
घालून स्वारी उभी...
एक होता शिंपी
कापड घेई फ़ार
दिवाळीचे कपडे
शिमग्याला तयार...
एक होता गवळी
पाणी घाली दुधात
म्हैस फ़ार पाणी पिते
अशा मारी बात...
असे होते लोक आणि
असे होते गाव
राजा होता असातसा
माहित नाही नाव...
:)
ReplyDeleteअगं ही कविता विस्मरणातच गेली होती. मस्तच. हां करा करा आता तयारी करा.... :)
ReplyDeleteवा... एक कविता अशी समोर आली, तर!
ReplyDeleteअरे हां, तुमच्या ब्लॉग वर शेवटी एक "कोड लाईन" दिसतेय.
/**-- End Google Analytics --*/
यातला सुरुवातीचा एक * काढुन टेंप्लेट सेव करुन पहा.
भाग्यश्रीताई, तुला ही कविता ठाऊक होती?? सही आहे...आता तुलाच बोलवायचं म्हणतो...:) अगं म्हणजे पुस्तक शोधायला नको गं....
ReplyDeleteभुंग्या बर्याच दिवसांनी उडत उडत आलास...खरंतर मी कामंच लावलं ब्लॉगच्या कोडचं मग तू तरी काय करणार..आणि हो तो कोड पाहाते मी..तुझं बाकी बारीक लक्ष हो.......कधीतरी काही इतर किडे करताना हे राहिलं वाटतं...आपलं सॉफ़्टवेअरवाल्यांचं नेहमीचंच नाही का?? introducing new bug...:)
ReplyDeleteमस्त आहे ग! माझ्या विस्मरणात गेल्या आहेत. तुझ्या मुळे उजाळा मिळाला. अजून काही पण पोस्टल कर न. आईचा आवाजाचा जमला तर व्हीडी ओ पाठव. अजून एकदा बालपण आरुष सारखे अनुभवता येईल.. आग्रह नाही पण आवडेल.
ReplyDeleteमस्त आहे गं माझ्या कार्ट्याला देते आता म्हणायला....काल तुमचे गाणे ऐकले चिरंजीवांना आता तू लाडकी मावशी आहेस!!!
ReplyDeleteअनुजाताई, खरं म्हणजे मी फ़ुलोरामधुन कविता टाकेन असं ठरवलंच होतं मागे पण टाकल्या होत्या. आई आल्यापासुन विसरुनच गेले..आता शोधते.....
ReplyDeleteतन्वी, अगं लहान आहे ना तो म्हणून त्याला आवडेल माझा आवाज...:) मोठा झाला की पळेल...:)
ReplyDeleteआणि हो नक्की दे त्याला ही कविता आणि मला ऐकवा...
एक होता शिंपी
ReplyDeleteकापड घेई फ़ार
दिवाळीचे कपडे
शिमग्याला तयार... :)
हलवाई, शिंपी, धोबी, गवळी सगळे झाले,
तरी काहीतरी कमी आहे
मी प्रयत्न करतो
एक होता गुणी बाळ
त्याची गोष्ट गमतीची
सार्या जगा एक नाव
त्याने दिले चीची चीची
मस्त आहे कविता
सही आहे प्रसाद.....सॉलिड एकदम...केवळ या ऍडिशनसाठी तरी मला कविता पण करता यायला पायजेल असं वाटायला लागलंय....पण सध्या गोष्टींवरच थांबतेय....खूप खूप मजा आली ही चीची वाचायला...
ReplyDeleteअपर्णा, अग हे पोस्ट मी वाचलंच नव्हत. राहून गेलं होतं वाटतं. म्हणून आत्ता कमेंटतोय.. छान कविता आहे. आणि प्रसादचं addition तर एकदमच भन्नाट !!!
ReplyDeleteधन्यवाद हेरंब. मी फ़ुलोरा अशा लेबलने काही कविता (अर्थातच माझ्या नाही..मला कविता करता येतच नाहीत..असो) टाकल्यात ब्लॉगवर..तुला उपयोगी पडतील चिरंजीवांसाठी...:) बरं झालं आठवण केलीस..या महिन्यासाठीपण पाहाते काही मिळतं का..
ReplyDelete