आजकाल काय होतं कळत नाही पण बहुधा हा इथल्या थंडी, पाऊस आणि बहुदा जरा जास्तच लवकर आलेल्या बर्फ़ाचा परिणाम असावा असं वाटतं पण सारखं चायनीज खायला हवंय आणि तेही आपलं भारतीय चायनीज असंच..ते इथे तसंही मिळणार नाहीच. अर्थातच आपल्या चवीचं चायनीज खायला मी मुंबईत आले की आवर्जुन कुठे न कुठे जाते. अगदी पहिल्यांदी मी चायनीज खाल्लं होतं ते दादरला चायना गार्डनमध्ये आणि खरं सांगते एकतर त्यांचं सूप पिऊनच माझं पोट भरलं होतं आणि त्यात अमेरिकन चॉप्सी हे प्रकरण मला अजिबात झेपलं नव्हतं...नशीब एक राइस पण मागवला होता. पण तरीही नंतर कधीतरी ती गोडी लागलीच..आणि इतकं झालं तरीही कधीही जिप्सीच्या आत जाऊन चायनीज खाल्लं नव्हतं..मी आणि माझी मैत्रीण नेहमी जिप्सी कॉर्नरमध्येच काहीतरी चटरमटर खाऊन आपल्या बाहेर यायचो.नाहीतर नेब्युलामध्येही जायचो.पण जिप्सीच्या आत कधीच गेलो नाही.
यावेळी मात्र जिप्सीच्या आत जायचा योग होता. एक म्हणजे आम्ही थोडं द्राविडी प्राणायाम करुन आलो होतो...झालं काय की थोडं मुंबईदर्शन करावं म्हणून सिद्धीविनायकापासुन सुरुवात करुन मग वरळी, गेटवे असं फ़िरलो आणि संध्याकाळ झाली तेव्हा मला अचानकपणे दिल्ली दरबार कुठं ते आठवेचना. बरं मे महिना म्हणजे घामाच्या धारा वाहायला लागल्या होत्या..कुणाला विचारायचं नाही हा एक अलिखित नियम करुन बसलेला माझा नवरा सरळ एक कुलकॅब करुन दादरला जाऊया आणि मस्तपैकी खाऊया म्हटल्यामुळे माझ्याकडे काही पर्याय नव्हता. मी फ़क्त कुलकॅबवाला भैय्या आहे हे पाहिल्यावर आधी एसी सुरु आहे नं इतकं विचारुन घेतलं...मजा म्हणजे त्या कुलकॅबने गाडी वळवली आणि दिल्ली दरबारचा बोर्ड मला दिसला..म्हणजे जिसे ढुंढा गली गली प्रकरणासारखंच होतं पण आता काही उतरणं शक्य नव्हतं...
मग आलो ते सरळ जिप्सी आणि आत थंड हवेत बसायचं म्हणून आपसुकच आत गेलो.आमच्या मुलाला तिथे काय तेजी आली होती कळत नाही पण लेकाने आम्हाला वैताग आणण्याचे सगळे प्रकार त्यादिवशी करुन झाले. पण आमचा वेटर मात्र फ़ारच चांगला होता. ज्या टेबलवर आम्ही बसलो होतो योगायोगाने ते आत्ताच निर्वतलेले माझे लाडके चंद्रलेखाचे मोहन वाघ यांच्या आठवणीसाठी होतं. आम्ही आधी सुप मागवायचं ठरवलं पण नेमकं गुरुवार होता आणि मी शाकाहारी होते त्यामुळे त्याने आणि मी वेगवेगळी सुपं डिशेस मागवली. वेटरने आमची गडबड ओळखली बहुधा म्हणून त्याने आम्हाला मुख्य जेवण मागवताना हाफ़ डिश (म्हणजे हाफ़ राइस इ.) पण मागवता येईल हे सुचवलं...आणि एकदम मला मी कुठून आलेय (काय गं अलिबागहून आलीस का? मधलं) असं झालं..म्हणजे याआधी हे इतकं सराइत होतं नं तरी मी आता अगदी विसरुनच गेले होते की असे हाफ़ ऑप्शन्सपण असतात म्हणून.
असो..एकदा ती चायनीज चव तोंडाला लागली की समोर आलेलं खाणं कसं चटाचट संपतं हे काही वेगळं सांगायला नको.आत्ता नुस्ते फ़ोटो पाहिले तरी जीव जातोय मग म्हटलं की एकट्यानेच कशाला हा छळ सहन करा? ब्लॉगवरही टाकुया. त्यादिवशी लक्षात आलं की जिप्सीचं चायनीज छान आहे आणि मुख्य त्यांचं (किंवा त्यादिवशीच्या आमच्या वाढपीचं) अगत्य भारी आहे. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही खाण्याचे पर्यायही आहेत. माझ्या नवर्याने मेन्यु पाहून अर्थातच मी भारतात आल्यावर तरी कुठलेच वार पाळणार नाही असं जाहिर केलं पण मी मात्र गुरुवार पाळला. एकदम केव्हातरी लेकाला डायव्हर्जन थिअरम (हम्म इस बात पे थोडा डिटेल डालना चाहिए पण आज फ़क्त खा खा होतेय सो...फ़िस कभी) म्हणून फ़ोटो काढताना लक्षात आलं त्यावेळी काढलेले फ़ोटो आहेत त्यावरुन आठवतेय की आम्ही काय काय खाल्लं होतं..सुपाचे तर फ़ोटोही दिसत नाहीत.
पण खरं सांगु का जसं आवडत्या व्यक्तीच्या फ़क्त आठवणीवर जगणं कठीण आहे, तसंच आवडत्या खादाडीच्या फ़क्त आठवणींवर जगणंही खूप कठीण आहे..सध्या प्रत्यक्ष अनुभवतेय. त्यामुळे या चटकदार पोस्टचा शेवट वेगळ्या अर्थाने जीवाला चटका लावतोय...