तसंही मर्फीमहाराज मध्ये मध्ये छोट्या फेऱ्या आमच्याकडे मारत असतात...आणि जास्त प्रेम उतू गेल तर मग मोठा दौरा असतो...मागे ती तेवीस तास उसात चक्कर मारली होती तोही त्यांचाच पराक्रम होता...यावेळी मात्र हा अख्खा आठवडा त्याचा मुक्काम माझ्याकडे आहे असं दिसतंय...मर्फी महाराज म्हणजे तेच ते मर्फीचा नियम वाले....
म्हणजे आता या (पर)देशात खर तर इतक्या एकट्या आया(single moms) आहेत की एक आठवडा जर माझा नवरा कुठे कामासाठी बाहेर गेला म्हणून काही माझ्यावर आकाश कोसळत नाही...राहू मी आणि माझा मुलगा असा एक आशादायक विचार त्याला मागच्या रविवारी airport ला सोडताना केला होता...पण अह्म्म्म...म्हणजे मुलगा बाबाला टाटा करेपर्यंत काही बोलला नाही मग मात्र जस आमच्या गाडीने airport सोडलं तसं हा एकदम मागे कार सीटमध्ये हैदोसच घालायला लागला...पहिले त्याला बाबा हवा होता, मग विमान आणि मग चक्क air show ....ऐला कशाला मागे त्याला तो air show दाखवला असं झालं मला..बरं म्हणजे हा गोंधळ तसा थोडा अपेक्षित होता पण बाकी आठवडा चांगला जाईल अशी मला अशा होती....
तसा बऱ्यापैकी ठीकठाक आठवडा कागदावर तरी होता; म्हणजे मंगळवारी मुलाच्या पाळणाघरातर्फे एक pumpkin patch भेट होती म्हणून पालकांनी मुलांना drive करायचा होत...ही तशी दुपारनंतर होती. त्यामुळे ऑफिसच काम आटपून जमू शकणार होतं...आणि येईपर्यंत संध्याकाळ म्हणजे मुलाची पण करमणूक...गुरुवारी मला एक डॉक्टरची appointment होती आणि मग शुक्रवारी तर आमचा बाबा घरी येणार म्हणजे त्या दिवशी फक्त सकाळी लेकरू शाळेत गेलं की झाली duty...किती सोप्पा दृष्टीकोण होता माझा आणि आशावादीही.पण मर्फीबाबांची कृपा होती किंवा त्यांचा आशीर्वाद नेहमीच असतो म्हणा पुढचे दिवस बाबांच्या (कामासाठी गेलेल्या आणि या नव्या पाहुण्या मर्फ़ीबाबांच्याही) कृपेने बरेच काही नवे सिक्वेन्सेस माझी परिक्षा पाहणार होते...
सोमवार तसा पहिला दिवस, नव्याची नवलाई म्हणून बरा गेला. जास्त काही नाही म्हणजे पाळणाघरात सोडतानाची रडारड आणि मुख्य म्हणजे संध्याकाळी निघताना पण लॉबीमध्ये चल मासे पाहायचे आहेत असले छोटे मोठे हट्ट इ.इ. करमणुकी होत्या; पण जेवायच्या वेळी बाबा वेबकॅमवर दिसल्यामुळे जेवण कस आटपलं कळलं नाही....मंगळवारी pumpkin patch भेट म्हणून मी खुश, तर नेमकं मागच्या आठवड्यापासून टेस्टिंगसाठी गेलेल्या एका कामातली कुलगंडी बाहेर काढायला त्या tester ला मंगळवारचाच मुहूर्त मिळाला. बरं ते fix करण्यासाठी ज्या सहकाऱ्याच सहकार्य अपेक्षित होत त्याची बायको गेले कित्येक दिवस आज होईल मग होईल करता करता मंगळवारीच बाळंत झाली. त्यामुळे तो पूर्ण दिवस गायब आणि त्याचा सेल पण बंद.....
च्यामारी आता client ला सरळ तर सांगू शकत नाही की तो नाही आहे म्हणून जास्त प्रगती नाही आणि मला मुलाला घेऊन बाहेर जायचं आहे....बाप रे मिटिंगमध्ये इतकी सांभाळासांभाळी करताना तारांबळ उडाली...कसं तरी करून एक दुसरीच चूक शोधली (if you can’t convince, confuse catergory वाली) आणि आणखी कुणाच्या तरी माथी मारून pumpkin patch भेटीसाठी एकदाची बाहेर पडले....काय सुंदर दिवस होता! तशी आता थंडी सुरु झालीय तरी सूर्यदेव प्रसन्न झाल्यामुळे जाकीटपण घालायला नको. मस्त मजा करताना पण मनात कामाचे विचार होतेच....तिथे पण सगळं झाल्यावर मुलाला परत घरीच यायचं नव्हतं, मग पुन्हा त्याला कसंबस चुचकारून (पक्षी: चॉकलेटची लाच देऊन..) आणलं आणि संध्याकाळी(पण) बाबाला वेळ नव्हता (तो म्हणतो की त्याला तिथे एक जास्तीच सेशन होत....) तरी थोडा वेळ वेबवर दाखवला आणि लवकर मुलाला झोपवून पुन्हा ऑफिसचं काम करणार होते पण कारट कसलं झोपतंय...शेवटी नाद सोडून झोपून गेले आणि पुन्हा बुधवारी काम, घर अशी मारामारी करत बसले...
बरेच दिवस मी ज्या प्रोडक्टवर काम करते त्यातल्या एका प्रश्नासाठी मूळ कंपनीला कळवलं होतं, त्यांच्या जर्मनीमधल्या एका इंजिनियरला गुरुवारी सक्काळसक्काळी मला फोन करायला सवड झाली आणि त्याला ते रिमोटली दाखवून माझं मशीन त्याच्या ताब्यात दिलं....तोच तो मुलगी झालेला सहकारी थोडा वेळ काम करण्यासाठी आला. त्यामुळे त्याच्याशी कामाच्या चर्चा करताना आणखी एक दोन वेगळ्या गुंत्यात गुंतले...त्या जर्मनबाबाला मग सरळ कटवलं, कारण माझं मशीन माझ्या माउसवर परत नाचवायचं होत.....मंगळवारची गुंत (श्शी कसला शब्द आहे नं?? छोटे केस असल्यामुळे फारसा प्रयोग होत नाही माझ्याकडे...) तशीच होती.....ते नवे गुंते सोडवताना माझ्या डॉक्टर appointment ची reminder आली....उप्स आता काय??पण अर्थात ते मी जाणारच होते...आणि तिथे मला तसंही पावणे चारला पोहोचायचं होतं म्हणजे client कडचा इस्ट कोस्ट मधला दिवस संपला होता...त्यामुळे हे गुंता प्रकरण मी आल्यावर पाहिलं तरी चाललं असतं...
डॉक्टरकडे मला डोक्यावरून पाणी म्हणजे एक तास लागला आणि प्रवास साधारण विसेक मिनिटे diriving तरी मी आरामात सवापाचच्या आसपास घरी आले असते आणि मुलाचं पाळणाघर सहा वाजेपर्यंत चालू असतं म्हणजे त्याला येता येताही उचलता आलं असतं...तरी सकाळी काय मनात आलं तर मी त्याच्या बाईंना सांगून ठेवलं होतं की संध्याकाळी जर उशीर झाला तर बघ म्हणून...आणि बाबा घरी नसल्याचं तिला तसंही माहित होतंच...पण उशीर व्हायची शक्यता कागदावर तरी कमीच वाटत होती...
डॉक कडे जवळ जवळ वेळेवर पोहोचले आणि चक्क वेळेवर आतही गेले. पण नर्सबाई vitals घेऊन गेल्या तरी मुख्य डॉचा पत्ताच नाही....पाणी मागवून ते संपवलं ...त्या छोट्या खोलीत ठेवलेली स्पॅनिष सोडून सगळी मासिकं चालून झाली तरी ही बया काही उगवेना....बरं आल्यावर मुख्य काम पाचेक मिनटात झालं होतं तरी आमच्या गप्पा सुरूच...गप्पा म्हणजे प्रश्नोतरांचा तास..इतर वेळी मला अशी वैद्यकीय माहिती ऐकायला फार आवडते...(अरे मागच्या पोस्टमध्ये झाल की सांगून ते डागदर व्हायचं) पण आज जरा कसंतरी होत होतं. पण तरी घड्याळात अजून पाच वाजले नव्हते. त्यामुळे आपण त्या वीस मिनटाच्या मोजणीत बसत होतो....शेवटी एकदाची तिथून ५.१० ला सुटका झाली आणि मग मात्र मी धन्नो (आमची कुमारी कॅमरी) ला "चल धन्नो" म्हणून दामटले...
बाहेर पडल्यावर मुख्य रस्त्यावरून पहिले लोकल हायवे क्र. २१७ आणि मग interstate ५ हा माझा रस्ता होता. पण हाय....२१७ वर जायलाच ही गर्दी....मी आधीच्या सिग्नललाच पाहिलं आणि सरळ उजवीकडच्या लेन मधून कट मारून ramp वर जायची दुसरी लेन होती तिथे झेप घेतली. म्हणजे निदान दहा तरी गाड्यांना मी चकवलं आणि तेही कुठलाही नियम न मोडता...या आनंदात पुढे पाहिलं तर खरा ramp सिग्नल तुफान भरलेला होता...एक एक गाडी सिग्नल दोनतीन वेळा हिरवा झाल्यानंतरच पुढे जात होती...माझी घालमेल सुरु झाली आणि सारख घड्याळाकडे लक्ष....कारण ही अमेरिकेतली पाळणाघर मुलांना घरी नेण्यास उशीर झाला तर विशिष्ट वेळानंतर तुमची वाट न पाहता ते प्रकरण पोलिसांकडे देऊ शकतात...(किंवा देतात...) त्यामुळे कसंबसं एकदा २१७ वर आले आणि त्या मुंगीच्या पावलाने सरकणाऱ्या गाड्यांना चकवून एक लेन बदलून सर्वात बाहेरच्या लेनला गाडी आणली...ही रांग त्यातल्या त्यात पुढे तरी सरकत होती...हे करताना समोरची ऑडी जवळ जवळ चिकटणारच होती माझ्या गाडीला पण संभाळलं....या लेन मध्ये यायचा इतरही काही गाड्यांचा प्रयत्न सुरु होता पण अगदी बम्पर तो बम्पर असल्यामुळे सर्वांचीच डाळ शिजत नव्हती...माझी शिजली पण कसा काय माहित एक मोठा ट्रकोबा (उर्फ ट्रकर) माझ्यापासून दोन गाड्या सोडून घुसलाच आणि झालं इतका वेळ निदान आमची पावलं कासवाच्या गतीने पुढे चालली होती त्यांची एकदम गोगलगायच झाली.. ५५ MPH च्या लिमिटला आपण २० वर म्हणजे अपमान घोर अपमान.....या ट्रकोबाला इथे कुणी यायला सांगितलं होत??
आता मात्र पाच पंचवीस व्हायला आले आणि हे ट्राफिक किती वेळ असाच असेल काही काळत नव्हत म्हणून मी शेवटी पटापट फोनाफोनी करायला सुरुवात केली....एकदम लक्षात आल की या सप्टेंबरपासून मुलाचा वर्ग बदलला आहे आणि त्याचा नवा नम्बरच सेलमध्ये नाहीये...श्या...काय निर्लज्ज आई आहे मी.....मग बाबा, आपलं नवऱ्याला फोन लावला. त्याच म्हणणं बहुतेक पोचशील पण तरी शेजारणीला विचारून ठेव...मजा म्हणजे त्याने दिलेला नंबरही दुसऱ्याच वर्गाचा होता(म्हणजे तोही माझ्यासारखाच). पण तिथल्या बाईने मला बरोबर क्रमांकही दिला आणि मग एकदाची त्या बाईना तशी कल्पना दिली...ती काय हो, आभार, बरं झालं फ़ोन केला इ.इ. पोपटपंची वाक्य बोलली...शेजारीण मात्र त्याला तिथे आणायला तयार होती. पण तरी तिला म्हटलं एकदा I5 वर पोहोचले की वेळेचा जास्त अंदाज येईल मग परत फोन करते...
इथे ट्रकोबामुळे आमच्यापेक्षा दुसऱ्या रांगा पुढे पुढे जात होत्या. म्हणून ऑडीची पाठ सोडून मी परत उजवीकडे घुसले....तर इथे एक लेन समाप्त होत होती त्यामुळे उजवीकडच्या मंडळींचं यांना आपले म्हणा सुरु झालं होतं पर्यायाने तो ट्र्कोबाची लेन पुन्हा आपली पुढे आणि मी मागेच....कसंतरी पुन्हा डावं उजव करत हायवे ५ गाठला आणि घड्याळात पाहिलं ५:५० म्हणजे साधारण पोहोचू शकणार होते. कारण इथे सगळ्या लेन झपाझप जात होत्या....मग पुन्हा एकदा शेजारणीला कळवलं...मागच्या फेब्रुवारीत जेव्हा ही नवीन गाडी घेतली तेव्हा मी कशाला उगाच V6 वर पैसे घालवतोयस असं नवऱ्याला सांगत होते. पण आज ५ नंबरच्या हायवेवर अगदी तुफान पळवत शेवटी एकदाची आमची exit गाठली.तरी नशीब मी आधी जुनी कुमारी घेणार होते; पण नवऱ्याने कालच सांगितलं होत की हीच ने, शिवाय कार सीट यातच आहे त्यामुळे...असो...तर एकदाची V6 पॉवर कामाला आली आणि ६ ला एक मिनिट कमी असताना पाळणाघरात पोहोचले....हुश्श...
आल्यावर परत जेवण, मुलाची अंघोळ इतकी दमले की बास...त्यातून बाबा आज हॉटेलवर परत आला नव्हता...काय करतोयस विचारायचं त्राण माझ्यातही नव्हतं..जाऊदे उद्या परत येतोय म्हणून बाप लेकाना फोनवरच बोलू दिलं आणि मुलाला वेबकॅम हवाच होता म्हणून चक्क कॅमेऱ्याच software सुरु करून तो स्वत:ला त्यात पाहत आणि हसत बसाल तितक्या वेळात त्याला खाऊ घातलं, थोडं फार इतर मनोरंजन केलं आणि एकदाचा गुरुवार संपवला....त्यातल्या त्यात एक म्हणजे मी निघताना client कडची power थोड्या वेळासाठी गेली होती त्यामुळे मला काही तिथल्या सिस्टीमना कनेक्ट करून काम करायला हव होत ते कनेक्शन सुरु नव्हतं आणि ती लोक घरी गेल्यामुळे मला दुसऱ्याच दिवशी सगळं सुरु करता आल असता...
असो ...आज शेवटचा (आय मीन single mom duty चा शेवटचा) दिवस....आज सकाळी जरा लवकर काम सुरु केलंय.काल रात्री त्या पॉवर प्रकरणांमुळे काही सिस्टिम्स नव्हत्या..एका मिटिंगच्या आधी थोडे update बनवायचे होते....मुलगाही उशिरा उठला. त्याला सोडून एकदाची कामाची गाडी थोडी फार रुळावर आणली.....आता फक्त संध्याकाळी airport ला जायचं आहे आणि नेमकं पाउस संध्याकाळी सांगताहेत...बघूया, आमचा बाबा आला की मर्फीबाबा मुक्काम हलवतात का?? अर्थातच त्यांचा दुसरा फ़ेरा आमच्यावर येईपर्यंत तरी.....तुर्तास ही पाचा दिवसांची कहाणी साडे-चारव्या दिवशी संपवते....
आज कोजागिरीच्या चांदण्या रात्री तुम्ही ही पोस्ट वाचत असल्यास शुभेच्छा....फ़िर मिलेंगे....
मर्फीबाबा एका बालिकेवर भलतेच म्हणजे एकदम कैच्याकैच प्रसन्न आहेत तर !! ;)
ReplyDeleteअसो.. कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा !! मी पळतो मसाला दुध प्यायला.. टाटा...
आधुनिक हिरकणी झालीस मग तू :)
ReplyDeleteआधुनिक हिरकणी झालीस मग तू :)
ReplyDeleteहो रे हेरंब मी मर्फ़ीबाबांची जरा जास्तच लाडाची आहे असं वाटतंय..आणि इतक्या लाडाने मी हैराण....
ReplyDelete"आधुनिक हिरकणी" लक्षातच आलं नव्हतं माझ्या सचिन...अर्थात हिरकणीला तरी कुठे माहित होतं गड उतरताना आपण काय इतिहास रचतोय............:)
ReplyDeleteनिभावून नेलेस ना... :) उत्तम... तब्येतीची काळजी घे... :)
ReplyDeleteहो रे रोहन....कसंबसं नेलं निभावून....तसे तुम्ही सारे online supporters सुद्धा होताच की....
ReplyDeleteमर्फीबाबांचं अडमडणं गृहीत धरण्यात अडचण असेल असे दिसत नाही
ReplyDeleteअगदी शरयू....आता फक्त मैत्री न व्हावी हीच काय ती अपेक्षा....:)
ReplyDeleteहोत अस कधी कधी ;)
ReplyDeleteमर्फीबाबा की जय हो!
ReplyDeleteमर्फीबाबांचं व्रत-बित ठेव आता :P
हा हा हा...बाबा, व्रताची कल्पना चांगली आहे पण त्याचा मुहुर्त केव्हाचा असावा याविषयी बर्याच शंका आहेत...की सरळ पारणंच फ़ेडावं म्हणते मी...म्हणजे मर्फ़ीबाबा कुठेतरी लांब मुक्कामाला जातील..
ReplyDeleteखरंय विक्रम आमच्याफ़क्त ते कधीकधी आजकाल बर्याचदा मध्ये आलंय...)
ReplyDeleteअपर्णा, आठवडाभर लढवलीस ना तू खिंड? आता जरा आराम करून घे. हा मर्फीबाबा आला म्हणजे अगदी वेळ बघून आणि सवड काढून येतो बघ. पुन्हा कधी दत्त म्हणून उभा राहिल सांगता येत नाही.
ReplyDeleteपोस्ट वाचून मी इथे हुश्श केलं तर कर्त्यी-करवीतीने क्या क्या पापड बेले होयेंगे. बाकी ते ट्रॅफिकमधलं वर्णन म्हणजे शेवटची जोडी आणि २५ चेंडुत ५० धावा हव्यात वैगरे स्टाइल मध्ये.
ReplyDeleteआधुनिक हिरकण.. हाहा अगदी बरोबर सपा ;)
ReplyDeleteमर्फिबाबावर हिरकणीच असच प्रेम असू द्या
ReplyDeleteगौरी खरय तुझ...फक्त ते एकदा अनंत काळाची माता झालो की विश्रांती म्हणजे काय रे भाऊ हा एक मोठाच प्रश्न असतो नाही???
ReplyDeleteसिद्धार्थ पापड बेलले म्हणजे काय न बेलून कुणाला सांगते?? बाकी अश्या one day सगळीकडच्या आया (आणि काही बाप पण...) खेळत असतील...नशीब आटाटेकावर का होईना पण सामना खिशात घातला...:)
ReplyDeleteआनंद आणि महेशकाका आपल्या शुभेच्छा असुदेत....:)
ReplyDeleteHi Aparna
ReplyDeleteTuza blog mi hallich vachayla lagale
far chan aahe - almost saglya post vachun hot aalyat
tasa Mahendra kakancha (barech jan tyana kaka mhantat mhanun mi pan mhatalay) blog pan vachatey aajkaal
Mi australia la asate 2 varsh zali (came here with hubby after 6 months of my marriage) so can relate to many things in your posts
निशा सर्वप्रथम ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेबद्दल आभारी...
ReplyDeleteमला वाटत आपल्या पिढीतल्या परदेशी राहणाऱ्या सगळ्यांना माझे बरेचसे अनुभव त्यांचेही वाटतील..तुला जे भावलय ते जाणून घ्यायला आवडेल....नक्की वाच आणि जमेल तशी प्रतिक्रिया दिलीस तर थोडा फार संवादही होत राहील....:)
बापरे!
ReplyDeleteसचिन म्हणतो तसं, हिरकणीच झालीस तू..
मीनल माझं सोड ...आज तू मोठाच दौरा काढलायस ब्लॉगवर ....:) बर वाटलं ....तुझ्यासाठीच ते फराळ ताट अजून ठेवलय....:D
ReplyDelete