तसं मी घरुनच पूर्ण काम करायचा घोशा लावला होता; फ़क्त १ टक्का परिस्थितीत त्यांना मला प्रत्यक्ष भेटावं लागणार होतं आणि (अर्थातच मी ती एक टक्कावाली असल्यानं) तसं झालंही. त्याप्रमाणे पोर्टलॅंडहून पश्चिमेकडे म्हणजे न्युयॉर्क किंवा कनेक्टिकट अशा पर्यायाने मला जायचं होतं. एकतर ही वारी बरीच आयत्यावेळी असल्याने खूप सारी (चांगली पर्यायाची) विमानं बुक तरी होती किंवा त्यांचे भाव भारताच्या तिकीटापेक्षा जास्त दिसत होते.मग तुका म्हणे त्यातल्या त्यात म्हणून एअरपोर्ट ट्रॅफ़िकमधुन सुटका व्हावी म्हणून मी स्वतःच नवीन यॉर्कातले दोन्ही विमानतळ वगळले आणि हार्टफ़र्डची तिकीटं काढली. जाताना रात्रीचं म्हणजे रेड-आयचा एकच पर्याय होता पण परत येताना कुठे उडी मारुन यायचं ते थोडं माझ्यावर होतं. माझ्या जुन्या गावचा म्हणजे फ़िलाडेल्फ़ियाचाही पर्याय त्यात होता पण मला उगाच भावुक व्हायला होईल का असा विचार करुन मी जसं आलं तसंच (म्हणजे लहानपणी आई-बाबा शाळेला जाताना कडेकडेने जा अशा काही सुचना देतात थोडासा तसाच मध्यमवर्गीय विचार करुन) शार्लेटच्या पर्यायावर टिचकी मारली.

कामाबद्द्ल तर काय बोलायची सोय नाही.दिवसभर जर मिटिंग एके मिटिंग केलं तर खरं काम पुन्हा हॉटेलवर आल्यावर करायचं हे बहुधा अंडरस्टुड होतं. त्यात माझं नशीब म्हणजे ज्याच्या जागी मी गेले होते तो हे काम सोडून दोन आठवड्यापुर्वीच गेला होता त्यामुळे कसला आगापिछा न कळता लागलेल्या (किंवा दुसर्याने लावलेल्या) आगीवर पाणी शिंपडण्याचं काम माझं..काय बोलणार..पण खरं तर त्यासाठीच आपण असतो. म्हणजे नाहीतर कोण एवढे लाड करणार नाही का? असो..
शेवटी (एकदाचा) परतीचा दिवस उडाला आणि उगाच उशीर नको म्हणून ११:४५ ची कॅब केली. फ़क्त ते मला घ्यायला यायच्या ऐवजी मला त्यांच्या पिक-अपच्या ठिकाणी जायचं होतं. माझा एक सहकारी मला सोडणार होता. पण तो वेगळ्या मिटिंगमध्ये, मी कोणा वेगळ्याबरोबर काम करतेय या भानगडीत निघतानाच उशीर झाला; तरी फ़ोनवरुन कॅबला थांबायला सांगितल्यामुळे निदान तिथे काही गफ़लत झाली नाही. आणि यावेळी चक्क नेहमीच्या वेळेपेक्षा गाडी दहा-मिन्टं लवकरच पोहोचली. सेक्युरिटीलाही काही रांग नव्हती. आता फ़क्त तासभरात विमानात चढलं की झालं. मग शार्लेटचा हॉल्टतर तासभराचा होता. म्हणजे गेटपाशी पोहोचेपर्यंतच बोर्डिंगची वेळ झाली असेल आणि मग तिथुन पाचेक तासात पोर्टलॅंड साधा सोपा हिशेब. कुठेही शिंकणार्या माशीचा शिरकाव नाही, असा विचार करत मी दुपारच्या जेवणाची सोय केली. खरंच विमानतळावरचं जेवण जास्तीत जास्त ठिकाणी इतकं टुकार असतं नं..हा विमानतळही नावापुरता इंटरनॅशनल बाकी सगळा थंडा कारभार होता. त्यातल्या त्यात एक मेक्सिकन पर्याय होता तिथुन एक बरीटो उचलुन मी शांतपणे पोटपुजा केली.
बोर्डींगही वेळेवर सुरु झालं.बाजुच्या सहप्रवाशीणीबरोबर हाय-हॅलो झालं. कप्तानाने उगाच आपल्या आगमनाची नांदी दिली..थोडा एकतर्फ़ी संवाद केला, हवाईसुंदरी एक्सिट रो इ. सुचना द्यायला उभी राहिली आणि कप्तानाच्या आवाजाने तिला थांबावं लागलं..ही एकाच नाही तर पुढे शिंकणार्या हजारो माशांची नांदी होती. कप्तानाच्या मते शार्लेटला जोरदार पाऊस, वीज इ. मुळे आपल्याला टेक-ऑफ़साठी थोडा वेळ थांबावं लागणार आहे. पुन्हा पंधरा मिनिटांनी पुन्हा तेच. साधारण अर्धा तासांनी शार्लेटचा पाऊस थांबायची बातमी आली. पण टेक-ऑफ़चा सिग्नल मिळणार तितक्यात आमच्याकडे वरुणराजांनी बरसायला सुरुवात केली. निघताना चांगला गॉगल घालावा लागेल इतकं ऊन असणार्या ठिकाणी हा अंधारुन आलं आणि माझ्यासारख्यांची दयामाया न करता ढग बरसू लागले.आम्ही अर्थातच विमानातच बंदिस्त झालो. थोड्या वेळाने आम्हाला आणखी दिड तास उडायची संधी नसल्याने बाहेर पडायची परवानगी मिळाली.
एवढ्या वेळात वेळेचं गणितही काही कळत नव्हतं. बाहेर पडावं की न पडावं या विचारात मी तशीच बसून राहिले. नवर्याला कल्पना दिली.तोही बिचारा आठवडाभर मी नाही म्हणून मुलाला एकटं सांभाळून कंटाळला होता त्यात ही भर.शेवटी वीसेक मिनिटांनी माझी पेटली की जर मला ते फ़िलाडेल्फ़ियाचं कनेक्शन दिलं तर निदान माझी कनेक्टिंग फ़्लाइट मला मिळू शकेल. म्हणून मी बाहेर गेले आणि काउंटरच्या भल्या मोठ्या रांगेत उभे राहिले तोच आमच्याच फ़्लाइटला सिन्गल मिळाला आणि पुन्हा एकदा पळापळ.मीही त्या लोकलाटेबरोबर आत गेले. आणि पावणे-तीन ऐवजी साधारण साडे-चारच्या दरम्यान आम्ही उडालो.

तरीच गेल्या आठवड्यापासून तू गायब हायेस... पोचलीस ना नीट घरी... लवकर लिही गं बाई.. मला अस वाटतंय तू अजून तिकडे विमानतळावरच आहेस आणि तिकडून लाइव्ह ब्लॉगिंग करते आहेस... :)
ReplyDeleteविमानात अडकून राहणं हे म्हणजे कैदेत राहण्यासारखच. जागेवरून उठायचं नाही. मागून पाणी सुद्धा मिळणार नाही. मी एकदा न्यू जर्सी मध्ये सहा तास विमानात अडकलो होतो. बर्फ पडत असल्याने विमान सुटत नव्हते. जेव्हा उडायची परवानगी मिळाली, तेव्हा विमान टेक ऑफ घ्यायला धावपट्टीवर पुढे गेले आणि पायलट म्हणतो की त्याचे कामाचे तास भरले आणि त्याला आता उडायला परवानगी नाही. तेव्हा परत विमान रद्द झाले आहे. एवढ्या वेळात कदाचित मी गाडी ने नौर्थ कॅरोलिना ला पोचलो असतो.
ReplyDeleteदौडा दौडा भागा भागा सा...!!!
ReplyDeleteइंतज़ार कब तक हम करेंगे भला...!!!
आज मौसम बेइमान है बडा...!!!
कुछ तो बाकी है....???
:)
सगळ्या १ टक्क्यावाल्यांना मर्फीचे नियम लागू होतात म्हणे ;)
ReplyDeleteहा हा रोहन कसलं लाइव्ह ब्लॉगिंग..पण खरंच त्या प्रवासात इतका वेळ होता की ऑफ़िसच्या लॅपटॉपवर बरहा असतं तर बरं झालं असतं असं वाटलं होतं...बर्याच पोश्टा निदान टायपून ठेवता आल्या असत्या....पोहोचलेय मी नीट भाग दोन टाकलाय तेव्हा पाहशीलच तू...
ReplyDeleteहा हा रोहन कसलं लाइव्ह ब्लॉगिंग..पण खरंच त्या प्रवासात इतका वेळ होता की ऑफ़िसच्या लॅपटॉपवर बरहा असतं तर बरं झालं असतं असं वाटलं होतं...बर्याच पोश्टा निदान टायपून ठेवता आल्या असत्या....पोहोचलेय मी नीट भाग दोन टाकलाय तेव्हा पाहशीलच तू...
ReplyDeleteनिरंजन, न्यु-जर्सी आणि थंडीत विमानात अडकणं सॉलिड कॉम्बो आहे...फ़क्त आम्हाला उठायला परवानगी होती. मी मध्ये जाऊन एकदा पाणी पण घेऊन आले पण घोळ तो घोळच.
ReplyDeleteदेवा इंतजार खतम..भाग दोन टाकला आहे...दौडत ते होतो मन फ़क्त आमचं भागत (आणि शरीर दमत) होतं असं आता वाटतंय...:)
ReplyDeleteहेरंब मर्फ़ीला मी मुद्दामच मध्ये पाडला नाही...त्याचं तंत्र आणखी वेगळं..पण जाऊदे हे आहे तेच थोडकं झालंय...:)
ReplyDeleteम्हणजे शेवटी घरून काम हे फक्त कागदावरच राहीलं म्हणायचं की.... तेही प्रथमच आरुषला सोडून जायचं... :(
ReplyDeleteअगं, शेवटी पोचलीस कधी???
अगं मी पोहोचलेय पण तूच मध्ये गायब झालीस...:) कागदावर बर्याच गोष्टी असतात गं आणि प्रत्यक्षात वेगळं...:)
ReplyDeleteआयला..
ReplyDeleteडेडलीच अनुभव! :)
व्हय व्हय बाबा....यकदम वैतागवाडी...
ReplyDelete