या टीपेचा पोस्टशी संबंध नाही पण तरी एकामागे एक दोन पोश्टा टाकायचं कारण आधीची लिहून ठेवली होती पण फ़ोटोसाठी थांबली होती आणि मीनलने खो कधीच दिल्याने हिचा पण लगे हातो नंबर लावला...नाहीतर एकंदरीत हा ब्लॉग ज्या आळशीपणे पुढे जातोय त्यावर सध्यातरी काही उपाय दिसत नाहीये.....
मुख्य टीप: स्वअनुवादीत कविता या ब्लॉगवर वाचायचं धैर्य करणार्य़ा समस्त वाचकांसाठी ही टीप पुढे जायच्या आधीच देतेय...हे (सु किंवा दु) भाग्य आपल्यावर ओढवण्याचं कारण या टॅगचा कर्ता करविता आणि मला नाही तर वाचकांना टांगवून ठेवणारी मीनल हीच जबाबदार...
मीनलने खो दिला आणि परीक्षेत सगळा पेपर ऑप्शनला टाकलेल्या भागावर आला तर काय होईल तेच झालंय...म्हंजे खरंच अशी सिच्युएशन उर्फ़ खड्ड्यात मी पडलेय तर मी काय करेन?? अक्षरशः वाट्टेल ते लिहेन...आणि मग शेवटच्या ख्रिसमसचं रुपांतर मागची दिवाळी असं झालं तर हा पेपर मॉडरेटर वगैरे सोडा अगदी चितळे दामले पासून ते वरच्या वर्गाचे चांगले सोळणकर मास्तर आले तरी भोपळ्याचं चित्र घेऊन येईल...आणि काय??? खरं तर ऑप्शनच्या भागवर इतकं नमन पण खूपच आहे म्हणा...पण तरी एक मध्य टीप देतेच कारण नंतरच्या शिव्या कमी व्हाव्यात अशी एक सदिच्छा आहे नाहीतर ते आपल्या हरीतात्यांमधल्या शाइस्तेखानासारखं हवं तर दुसर्या हाताची बोटं कापा पण शिवी नको प्रमाणे हवं तर दोन भोपळे काढा पेपरवर पण हा शाब्दिक भडीमार नको....(उगाच या पोस्टचं मुपि प्रकरण व्हायचं...)
हं तर मध्यटीप : Last Christmas माझं मावसभाषांमधलं खरं तर आवडीचं गाणं आहे...त्यातलं काव्य, संगीत सारं काही आवडतं..पण तरी त्याचा आणि अनुवादाचा तसा काही संबंध नाही हे कळलंय तरी मी पोस्टतेय यामागे निव्वळ त्या कवितेची माझ्यासारख्या होतकरु कवींनी वाट लावु नये हाच आहे...तसंही होतकरु या शब्दाचा बोलीभाषेतला अर्थ "करु करु पण होत काही नाही" असा आहे याची सु.वा. नोंद घेतीलच म्हणा..
शिवाय जॉर्ज मायकल काय माझ्या मागे येणार नाही कारण त्याला अनुवादाचा अनुवाद करुन दाखवला तरी ते कळणार नाही..तो जास्तीत जास्त एक जांभई देईल...त्यामुळे I am actually playing safe...
मूळ गाणं:
LAST CHIRSTMAS
Last Christmas, I gave you my heart
The very next day, you gave it away
This year, to save me from tears
I'll give it to someone special
Once bitten and twice shyed
I keep my distance but you will still catch my eye
Tell me baby
Do you recognize me
Well, it's been a year, it doesn't surprise me
Merry Christmas, I wrapped it up and sent it
with a note saying "I love you", I meant it
Now I know what a fool I've been
But if you kiss me now, I know you'd fool me again
Last Christmas.........
A crowded room and friends with tired eyes
I'm hiding from you and your soul of eyes
My God, I tthought you were someone to rely on
Me, I guess I was a shoulder to cry on
A face on a lover with a fire in his heart
A girl on a cover but you tore her apart
Maybe this year
Maybe this year I'll give it to someone special
Cause last christmas....
And last Christmas
And this year
It won't be anything like, anything like....
आता माझं होतकरू गाणं....
मागची दिवाळी
आठवतं का मागच्या लक्ष्मीपुजनात, देवळात समोरच पूजा करणारी तू आणि देवाला सोडून या देवीत आणखी गुंतलेला मी?
शेवटी दिवाळीच्या मुहुर्तावर विचारलंच तुला थेट
अन हाय! लगेच भाऊबीजेचं ताट घेऊन घेतलीस तू माझी भेट
या वर्षी मात्र, या वर्षी मात्र आहे मी सावध
शोधतोय वेगळ्याच टाइपचं सावज
या आधीही खाल्लीय एकदा चप्पल अन दोनदा वाटली लाज
ठेवलं मीही अंतर... पण तू मात्र नजरेचं गारुड करुन करुन टाकलंस मला खाक
सांग मला, सांग मला ओळख तरी देशील का?
अर्थात वरीस झालं म्हणा या घटनेला पाठी लागलेल्या प्रत्येक पोराचा हिशेब तू तरी ठेवशील का?
शूभ दिपावली म्हणता म्हणता "प्रेम करतो तुझ्यावर" असं चिट्ठीत म्हटलं तरी वेडी हाक माझी तू ऐकशील का?
अगं मला कितीही मनापासून वाटलं तरी तुला गं का तसं वाटेल??
आणि आता, आणि आता पप्पी जरी दिलीस तरी चटका मला बसेल....
कारण?? अगं कारण मागच्या दिवाळीच्या मुहुर्तावर विचारलंच तुला थेट

एक गर्दीमय खोली आणि त्यात (थोडीशी जास्त झाल्याने) थकल्या डोळ्यांचे मित्र
त्यातचं तुलाही पाहताना लपतोय मी तुझ्या त्या नजरेपासून...
आताही जाणवतंय किती विश्वास होता माझा तुझ्यावर तेव्हा
आधाराचा खांदा मीच का असं वाटण्याचे दिवस होते तेव्हा
प्रेमिकेचा चेहरा अन हृदयातली जणू काही आग
मनमासिकाचं कव्हर जणू... पण फ़ाडून ते स्वतःच, गेलीस स्वतःच्या तालात
पण काही नाही...पण काही नाही... मीही म्हणतो, आम्हा मुलांच आयुष्यच असं असतं
या दिवाळीला तू नाही म्हटलंस तर ....दुसर्या दिवाळीपर्यंत दुसर्या कुणाचा तरी नंबर नक्की असतो...
म्हणूनच म्हणतो म्हणूनच म्हणतो...

जर ही कविता(??) वाचून इथवर पोचला असालचं (एकदाचे) तर ही तळटीप: ही कविता लिहीताना मजा आली आणि अचानक वरदाबाईंच्या तालमीची आठवण झाली...पु.ल.म्हणतात त्याप्रमाणे त्या पेटीवर न सापडणार्या पट्टीच्या गायिका होत्या त्याप्रमाणे माहितीतल्या दोनेक छंदात मीही मुक्तपणे बागडून घेतलेय...शिवाय कवितेच्या पोस्टवर पण फ़क्त सुप्रसिद्ध लेखकांच्या उपमा सुचतात हाही संदर्भ बोलका आहेच म्हणा..जाता जाता, बाय द वे कवितेत कंस असतो का?? की कंसातली ही पहिली (आणि कदाचित अखेरची) कविता??पुन्हा हा मोका तुमच्या आमच्या अणि अर्थातच या ब्लॉगच्या वाट्याला न येवो हीच सदिच्छा...
आणि निव्वळ निदान पुरुषवर्ग ही कविता वाचेल या आशेने मी वटवटराव हेरंब आणि चुरा पाव प्रसाद यांना
’खो’तेय....

लय भारी... तू कविता मस्तच निवडलीस.
ReplyDelete" अन हाय! लगेच भाऊबीजेचं ताट घेऊन घेतलीस तू माझी भेट... " हा हा....
" मनमासिकाचं कव्हर "... उपमा आवडली.
जबर्या....
ReplyDelete>>या आधीही खाल्लीय एकदा चप्पल अन दोनदा वाटली लाज......
अशक्य भारी....च्यामारी एकदम धरुन फ़ट्याक...
अगं श्रीताई...मी कविता निवडलीय हीच मोठी खबर आहे पण तुझ्या शब्दांनी धीर आलाय....तरी माझ्या एका आवडत्या गाण्याची वाट मीच लावलीय हेही खरंय...तू कधी लिहितेस आता?? मला वाटतं तू केव्हाची आहेस खो मध्ये....
ReplyDelete@योगेश, कस्सचं कस्सचं...:)
ReplyDeleteभन्नाट आहे ग...खूप सही...!!! अत्ता ह्या पुढे टाकत जा असे अनुवाद वरचेवर...कोणी खो देण्याची वाट न बघता... :)
ReplyDeleteहा हा मैथिली खूप खूप आभार पण मुलांच्या बाबतीत कसं "एक किंवा दोन बस्स..." तसंच हे असल्या अनुवादाच्या बाबतीत "एकच बस्स्स्स्स्स्स्स्स्स." काय??? पण कधीतरी दळण दळायला तुझी ही कॉंप्लिमेन्ट लक्षात ठेवेन बरं...:)....मग काय आता या दिवाळीला ही कविता तुझ्या ग्रुप मध्ये फ़ॉर्वड वगैरे करतेस काय...:)
ReplyDeleteThanks Ashatai...:)
ReplyDeleteहा हा हा.. हा खराखुरा भावानुवाद आहे आणि तो पण एकदम देसी इष्टाईल च्या मारी धरून फटाक..
ReplyDeleteभाऊबीजेचं ताट !!!!!!!!!!!!!!!
हा हा हा .... अशक्य हसलो..
अगं, छान झालाय की अनुवाद, उगाच एवढे आढेवेढे घेतलेस!
ReplyDelete>ख्रिसमस आणि मागची दिवाळी,
>हाय! लगेच भाऊबीजेच ताट घेऊन घेतलीस तू माझी भेट
आवडले.
BTW कवितेतसुध्दा कंस असतो.
चला, माझा खो मार्गी लागला. :)
अग त्या साठी तुला ह्या कवितेचा पुन्हा एकदा अनुवाद करावा लागेल, गुजरातीत. Most of my friends are Gujjus...करशील न? ;)
ReplyDeleteपहिलं म्हणजे, ख्रिसमसची दिवाळी ही आयडियाच भारी...
ReplyDeleteत्यात >>>या आधीही खाल्लीय एकदा चप्पल अन दोनदा वाटली लाज......
हे अशक्य भारी!
'शोधतोय वेगळ्या टाईपच सावज' हा 'वेगळ्या टाईप'चा वापर आवडला
ReplyDeleteबाकी फूल टवका कविता आहे :)
मला कमेन्टायला उशीर होतोय त्याबद्द्ल क्षमस्व मंडळी...माझा प्रांत नसलेल्या विषयावर माझं बरंच कौतुक झालंय त्याबद्दल धन्यवाद...:)
ReplyDeleteहेरंब त्यांचा ख्रिसमस तशी आपली दिवाळी त्यावरुन सुचलं आणि मग थोडं स्वातंत्र्य घेतलं झालं.तुला हसवलं म्हणजे काहीतरी आहे असं वाटतंय नाहीतर इतर वेळी आपण आम्हाला हसवायचं कंत्राट घाऊक घेतलंय म्हणा...:)
ReplyDeleteमीनल, अगं काही नाही फ़क्त वेळ जुळून आली हे लिहिताना असं वाटलं..नाहीतर त्याआधीचा आठवडा वेड लागल्यागत गेला. लिहेन त्याबद्दलही (अर्थात वेळ मिळाला की) पण मी खो शक्यतो परत पुढे देते म्हणून ही पोस्ट लगेच टाकली. फ़क्त यावेळी विषय वर म्हटल्यापमाणे औट ऑफ़ सिलॅबस होता नं म्हणून दडपण....
ReplyDeleteमैथिली "मने गुज्जु आवडेश" पण तूच कर नं तुझ्या स्टाइल ने भाषांतर...नाहीतर हाच खो तुला समज आणि दे पोस्टून.....
ReplyDeleteबाबा, अरे हेरंबला म्हटलं तसंच झालंय बाकी काही नाही...आणि ते चप्पलचं आपल्या इथल्या मुलींना पटकन आठवतं ना रे....:) मीही त्यातलीच...
ReplyDeleteप्रसाद, "टवका" हा हा मस्त शब्द आहे....आपणही आहात खो मध्ये तेव्हा या आता पळायला लागा....:)
ReplyDelete