म्हणजे शुक्रवारी चारला ड्राइव्हला सुरुवात करु म्हणत साडे-तीन पर्यंत कसं-बसं ऑफ़िसचं काम आटपलं आणि मग तहानलाडू, भूकलाडू, बाकी सामान बॅगामध्ये कोंबायचं..लिस्ट-बिस्ट कुठली? जे काही डोक्यात असेल ते घेऊन एकदाचं पाच पर्यंत निघालं म्हणजे यकदम टायमावर समजायचं; असाच हाही लॉंग विकेंड आमच्या अशाच आयत्या वेळच्या प्लानिंग(???) प्रमाणे सॅन-युआन बेटांवर जाण्यासाठी शुक्रवारी रात्री निघालो.
आधी ठरवलं होतं की त्या चारपैकी एका बेटावर राहायचं आणि मग तिथे भटकंती, व्हेल वॉचिंग इ. करुया पण....म्हणजे अर्थातच बुधवारी विचारलं तर शुक्रवार-शनिवार रात्रीची हॉटेल जवळजवळ बुक्डचं होती आणि जी होती त्यांचे भाव अक्षरशः गगनाला भिडले होते...म्हणजे त्याच पैशात आम्ही (अर्थातच वेळेत ठरवलं असतं तर) छानपैकी कॅलिला पण जाऊ शकलो असतो..
मग त्यातल्या त्यात बरा पर्याय म्हणजे अल्याड राहायचं आणि सकाळी फ़ेरीने बेटावर जाऊन भटकंती करायची. हेही वाईट नव्हतं म्हणा...तसंही फ़ेरीमध्ये आपली गाडी घेऊन जाता येतं आणि ती साधारण तासभराची आहे....पुर्वी फ़ेरी बुकिंगची सोय होती पण आता ती सरकारतर्फ़े चालवली जाते आणि first come first serve तत्वावर..तेही आमच्या पथ्यावरच होतं म्हणा नाहीतर ते बुकिंग नसतं मिळालं तरी सगळंच मुसळ केरात.
मजल दरमजल करत तो पाचेक तासाचा रस्ता काटून हॉटेल मुक्कामी शुक्रवारी रात्री साडे-दहा, पावणे अकराच्या आसपास पोहोचलो. नशिबाने पोरगं गाडीतच झोपलं होतं. पण दुसर्या दिवशी एक्झ्यॅक्टली काय करायचं ते नीट ठरवलं नसल्याने आधी हॉटेललाच नेट लावुन थोडा अभ्यास केला आणि चार पैकी त्यातल्या त्यात प्रगत फ़्रायडे हार्बरला जायचं ठरवलं.ती फ़ेरी होती एकदम सहाच्या दरम्यान नाहीतर नऊ आणि मग तडक साडे-अकराची. म्हणजे नवाची पकडली तर पूर्ण दिवस फ़िरता येईल असा विचार करुन एकदाची पाठ टेकली.
आदल्या दिवशीचा काम आणि प्रवासाचा शीण असल्यामुळे अर्थातच साताच्या गजराला अगदी लगेच उठणं झालं नाही आणि मुख्य एका दोन वर्षांच्या मुलाची आन्हिक उरकेपर्यंत अर्थातच जवळ जवळ आठ चाळीस झालेच.(पोरं असली की ब्लेमिंग सेशनला काही प्रॉब्लेमच येत नाही, नाही?? नवरा-बायकोमधले वाद कमी करण्याचा दुवा जणू) "जाऊदे गं, अजुन डायरेक्शन नाही पाहिले आपण नंतरचीच पकडूया" या नवरोबाच्या म्हणण्याकडे जास्त लक्ष न देता त्याला म्हटलं रिसेप्शनिस्टकडून चार ओळी खरडून घे...ट्राय करुया..नशीबाने तसं फ़ेरीचं अंतर हॉटेलपासून जवळ होतं पण तरी तिथेही रांग असू शकते आणि तेही लॉंग विकेंड असल्यामुळे अम्मळ जास्तही असेल असला काही विचार करायला आम्हाला वेळ नव्हताच...
आने दो भई... |
शेवटचं वळण घेऊन तिकिटाच्या खिडकीत आम्ही गेलो तेव्हा मी गाडीतल्या घड्याळात पाहिलं तर नऊला अक्षरशः एक मिनिट बाकी होतं.तिथे चारेक वेगवेगळ्या फ़ेरींसाठी अनेक रांगां होत्या आणि त्यातल्या बर्यापैकी गच्च दिसत होत्या. त्यातली एक रांग तिने आम्हाला सांगितली ज्यात आम्ही त्यात तिसरे बिसरे असू आणि त्यांची अनाउन्समेन्ट ऐकायला आली "final call for Friday Harbour" हळूच काचेतून मागे पाहिलं तर आमच्या मागे कुण्णीच नव्हतं आणि त्यांचा माणूस राहिलेल्या गाड्यांना मार्गदर्शन करत आम्हाला थोडा वेळ थांबवुन आत सोडलं.आत शिरल्यावर लक्षात आलं की त्या साधारण शंभरेक गाड्यांची कपॅसिटी असणार्या फ़ेरीमधली आमची शेवटची गाडी होती..थोडं मागे घेऊन त्याने आमच्या गाडीला मागे सपोर्ट लावले आणि आमचं घोडं गंगेत आपलं ते बोटीत न्हालं....
समोरच्या रांगेत उभी आमची धन्नो...आणि आमचा नंबर शेवटचा...धप्पाक... |
या ट्रिपमध्ये एकंदरितच बर्याच वेळा आम्ही असे लकी ठरलो पण त्याबद्द्ल फ़िर कभी....सध्या गाडीचा आणि बोट सुटल्यावर खेचल्या जाणार्या पाण्याच्या फ़ोटोकडे पाहात तो lucky dog क्षण एवढंच पुरे.
हुश्श...एकदाची ट्रीप सुरु झाली ब्वा.. |
ह्म्म्म.. एकदम लकी होतात तर..
ReplyDeleteरच्याक, अमेरिकन स्लँग म्हणून ठीक आहे पण 'लकी डॉग' शब्द किंचित खटकलाच !
हेरंब लोंग विकेंड होता....म्हणजे काय नशीब असेल बघ....माझ खर सांगू का लक्षच नव्हत इतक मी निघाल्यापासून मिनिटे मोजत होते.....
ReplyDeleteअरे तसंही कोकणातली माणस प्रेमाने किती शिव्या देत असतात माहितेय न....हे थोडफार तसच.......:) रच्याक, त्याने फक्त घाईत आलेली आमची गाडी पाहिली होती....(आम्हाला काही निरखले नव्हते...:))
आल्बोर्ग पोर्ट म्हणजे आत्ता मी जिथे आहे तिथून दररोज 'स्विडन - स्टोकहोम' आणि 'नॉर्वे - ओस्लो'साठी फेरी निघतात. काल शनिवारी तर खच्चून ३००-४०० गाड्या उतरल्या आणि चढल्या इथे... :) जरा वेळ मिळाला तर जाऊन येईनम्हणतो... :D
ReplyDeleteरोहन नक्की जाऊन ये आणि कळव...तुला बंदर म्हणजे काय किस झाड की पत्ती...:)
ReplyDeleteवाह लकी..विकांत सार्थक झाला :)
ReplyDeleteआभारी सुहास...
ReplyDeleteमज्जा केली तर. बाकी फोटो येऊ दे.
ReplyDeleteहे लय भारी आहे!
ReplyDeleteएकदमच लकी!
रच्याक, तुझ्या ब्लॉग अपडेट्स माझ्या ब्लॉगर रीडिंग लिस्टमध्ये का येत नाहीत? मी फॉलो पण करतोय!:(
सिद्धार्थ खूप मजा केली...आणि सगळी ट्रीप अशीच आयत्यावेळची घुसाघुशी....:) नंतर मग व्हेल पण पाहिले...एकदम पैसा वसूल....:)
ReplyDeleteबाबा, लक त्यादिवशी तर जरा जास्तच मेहरबान होत.....:) आणि तुला का दिसत नाही बर updates ??? ब्लॉगर मध्ये मध्ये गंडत की काय?? बघते काही माहिती मिळाली तर...
ReplyDeleteहा हा धन्नो.. मजा केल्येय मस्त
ReplyDeleteमस्त जागा आहे....आणि अशी घाई घाईमध्ये ट्रीप केली की मग काय मज्जाच मजा...
ReplyDelete