Saturday, December 31, 2011

काठावर पास...

हे वर्ष सुरु झालं होत तेच मुळी सुट्टीने....हो म्हणजे कामावर आणि ब्लॉगवर एकदम सुट्टी...पण काम तरी लवकर सुरु करावं लागलं...मग जशी आई आली तस त्या निमित्ताने ब्लॉगची सुट्टी पण थोडी फार संपवली....तरी कुठेतरी सारं काही शांत नव्हतं ....अर्थात ते तसं कधी असतं म्हणा पण तरी संदेश लिहिलं आणि त्यावरच्या प्रतिक्रिया इ.इ. पाहून फार मजा आली (मला वाटत विषय निघाला आहे म्हणून ही पोस्ट मार्केट करायचं श्रेय मी हेरंबला (त्याच्या लाडक्या कंसात) द्यायला हवं) ....त्याच्या बझवरचे लाईक आणि निरोप पाहून ओह आय मिस दिस वगैरे सारखं....

मग लगेच घेतलीच लेखणी आणि मग काही बाही सुचत गेलं....गाण्यांच्या आठवणी होत्याच पण मागचा ब्लॉग मेळावा होता त्यांना शुभेच्छा द्यायलाच हव्या होत्या...आई असल्यामुळे बरेच दिवस राहिलेलं नॉट विदाउट माय डॉटर वाचलं आणि त्याबद्दल लगेच लिहिलं गेलं....या वर्षी आमच्या भागात काही म्हणता उन्हाळा येत नव्हतं त्यामुळे जुलैला तो (एकदाचा) आल्यावर मग थोडं फिरण झालं आणि ब्लॉग पुन्हा राहिला पण मायदेशात त्यातही माझ्या मुंबईमध्ये झालेल्या हल्ल्याचं दर्द बाहेर आलंच...ऑगस्टमध्ये मैत्रीदिनाच्या निमित्ताने काही विचार बाहेर आले पण त्यावर उतारा म्हणून आईचा वाढदिवस साजरा करावा म्हणून मी ट्राय केलेल्या (सध्या ब्लॉगवरून गायब असलेल्या) श्रीतैच्या एका रेसिपीने धमाल उडवली...आणि एक गोष्ट तर मी ब्लॉगवाचकांना सांगितलीच नाही....जुलै संपता संपता बाबापण आले...मग काय फुल टु धमाल...त्यांच्याबरोबर पुन्हा मग भटकंती..मी इथे पाहिलेल्या काही जागा मला गरम हवामान असेपर्यंत दाखवायच्या होत्या त्यातून माझा माउंट हूड आणि इथे इतर बर्फाच्छादित पर्वत इ. बद्दलचा गोल गोल झालेला भूगोल मग ब्लॉगवर आला...बाबा आल्यामुळे जरा जास्त चुटूचुटू बोलायला लागलेल्या आरुषने पण मग त्याची एक जमाडी गम्मत सांगितली....

या वर्षात उदास व्ह्यायचे बरेच प्रसंग आले, जपानसारख्या घटना झाल्या...गझल पोरकी झाली....हे सगळं ब्लॉगवर मुद्दाम नाही लिहिलं ते आपसूक आलं....माझा स्वतःचा एक अगोड प्रवासही ब्लॉगवर मांडला...आणि बघितल तर एक आकडा टुकटुक करतोय "३१".

आता या कॅलेंडर इयरमधला सर्वात शेवटचा महिना सुरु झाला आणि राजेने माझ्या दोन पूर्णवर टाकलेली कमेंट कम आशीर्वाद आठवला....तो म्हणाला होता की या वर्षी शंभर पोस्टा लिही...हम्म...मग असंच सुचलं की शंभर तर अजून कधीच केल्या नाहीत मग निदान काठावर पास होऊया....तसंही मुंबई विद्यापीठाने ४० मोजायची सवय लावली होतीच आणि तीच सवय ब्लॉगवर कामाला आली..शेवटच्या क्षणाला काही तरी करून चाळीस होताहेत कळलं की आमचं हुश्श असायचं तसच ....आणि उगाच कशाला ते विन्जीनियारिंगचे दिवस आठवा म्हणून मी आपलं शाळेत पास-नापास, पास-नापास खेळतात न तसं एकदाचे माझे ३५ झाले म्हणजे "काठावर पास" म्हणून सर्वांना २०१२ साठी सुयश चिंतिते......

फिर मिलेंगे.......

8 comments:

 1. काय गो, नविन वर्षाच्या सुरुवातीलाच रिजल्टची आठवण करून दिलीस, ते पण मुंबई विद्यापीठाचे. त्यात ह्या विषयातदेखील आम्ही सालाबादप्रमाणे वर्षाच्या शेवटच्या दिवशी कशीबशी दुहेरी धावसंख्या ओलांडली आणि पुन्हा एकदा नापास झालो. असो, यंदा (दरवर्षीसारखा) मन लावून अभ्यास करेन आणि तुमच्यापेक्षा जास्त मार्काने पास होईन... :D

  नापास विद्यार्थ्यांकडून नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा...

  ReplyDelete
 2. चांगल लिहिण महत्त्वाच. उगीच भारंभार लिहिल पण ते काहीतरीच असलं,तर काय उपयोग? त्यामुळे आकड्यांचा विचार न करता जेव्हा वाटेल तेव्हा लिहाव हे उत्तम ... जितक जास्त लिहिशील तू या नव्या वर्षात, तितक जास्त चांगल वाचायला मिळेल अशी खात्री आहे.

  ReplyDelete
 3. सिद्दार्थ, अरे मी कुठे नवीन वर्षाला लिहिलं? बघ नीट.. ३१ डिसेंबरचा हिशोब आहे....तू नव्या वर्षाला वाचलंस मग मी काय करू....आणि काय रे ती कथा सुरू केलीय ती वेळेवर संपवली असतीस तर अशी दुहेरी धावसंख्या इतक्या लेट ओलांडायची वेळ आली नसती..असो आता इतकी मोठी टिप दिलीय तर लगेच अभ्यासाला आपलं ती पोस्ट लिहायला लाग बरं....:D

  ReplyDelete
 4. सविता, खरं सांगायचं तर प्रत्येक पोस्ट जेव्हा वाटलं, वेळ आली तेव्हाच लिहिली गेलीय...त्याप्रमाणे फ़क्त योगायोगाने ३५ झाले....
  आता पुढच्या वर्षीचं माहित नाही आणि त्याचं काही लक्ष्यही ठेवलं नाही...तुम्हाला लिहिलेलं वाचायला आवडतंय म्हटल्याबद्दल जरा कॉलर टाइट करून घेते...:) आभार...

  ReplyDelete
 5. शुभेच्छा !शुभेच्छा !!शुभेच्छा !!!

  तू लिहित राहा आम्ही आहोतच... :)

  भाराभार चिंध्या धड ना एक पेक्षा... वैसेभी आकडेमें क्या रखा हैं... :D:D

  ReplyDelete
 6. मी तर ब्लॉगर्स विद्यापीठाला पासींग मार्क्स २० वर आणून ठेवायला सांगणार आहे आता. तरच पास होईन मी नाहीतर :(

  ReplyDelete
 7. श्रीताई हाबार्स...अग भाराभर काय..आलीस की चौकार मारतेस न पण....:)

  ReplyDelete
 8. हेरंब तुझ्या वीस दो सौ के बराबर आहेत...त्यामुळे पासिंग फिसिंगची काळजी आम्हाला ...तुम्ही पदवीधारक आहात भाऊ...:)

  ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.