Monday, April 4, 2011

दोन पूर्ण

२००९ च्या पाडव्याला एक ब्लॉगरुपी छोटी गुढी उभारली होती...आजच्या म्हणजे २०११ च्या पाडव्याला या ब्लॉगला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. 'वाढदिवस लक्षात ठेवणे' याबाबतीत माझ्या स्मरणशक्तीचा पूर्वेतिहास चांगला ठाऊक असल्याने आणि साडे-तीन मुहुर्तावर सुरु केलेलं कुठलंही काम फ़लित देतं अशा दुहेरी विचाराने पाडव्याच्या मुहुर्तावर सुरु केलेला ब्लॉग पुढेही नक्की सुरु राहणार; पण आता वैयक्तिक जबाबदार्‍या वाढल्याने तितकं सातत्य राहिल नाहीए हेही तितकंच खरं आहे...


अगदी निदान आजची पोस्ट आधी प्लान करुन लिहायला हरकत नव्हती पण शेवटच्या क्षणापर्यंत काही ना काही येत राहिलं...शेवटी आता अर्धा दिवस संपल्यानंतर का होईना पण काहीतरी खरडण्याचा प्रयत्न सुरु आहे.

ही पोस्ट लिहायचं मुख्य कारण गेले काही महिने अतिशय कमी पोस्ट्स लिहुनही वाढली गेलेली वाचक आणि फ़ॉलोअर्स यांची संख्या.त्यांचे जर आज मी आभार मानले नाहीत तर त्यापेक्षा आणखी कुठला कृतघ्नपणा नसेल..फ़ॉलोअर्सनी ओलांडलेलं शतक, मधल्या काळात प्रहारमध्ये आलेला माझिया मनाचा उल्लेख हे सारं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे....आपलं सर्वांचं प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष प्रोत्साहन आहे म्हणून कितीवेळा "बरहा" म्यान करायचा विचार केला
तरी तो प्रत्यक्षात आणला जाणार नाही असं सध्यातरी वाटतं...

हा ब्लॉग माझा माझ्याच मनाशी सुरु केलेला एक संवाद, एक नोंदवही, जी काही वर्षांनी वाचली तर माझ्या जुन्या आठवणी मला आठवतील यासाठी केलेला एक प्रयत्न आहे."आठवणी" हे एकमेव टॉनिक आहे ज्यामुळे हा ब्लॉग सुरु आहे आणि मागचे काही महिने जेव्हा मी काही लिहू शकले नाही तेव्हा याची प्रचिती मिळाली.माझ्या पोस्ट्स, त्यातली मलाच दिसणारी मी आणि त्यातल्या प्रतिक्रियांमधुन ब्लॉग मित्र-मैत्रिणींशी केलेला संवाद हे सगळं माझं मीच बरेचदा वाचलं आणि त्यातून मला खूपच आनंद मिळाला..माझा ब्लॉग मी पुन्हा वाचताना जे वाटलं ते शब्दात सांगणं थोडं कठीणच आहे पण हे सारं खरंच अनोखं आहे आणि त्यासाठी आपण आपलाच ब्लॉग वाचला पाहिजे इतकंच म्हणेन..सुरुवातीला सारे "जी"ने उल्लेखणारे संदर्भ "आता काय रे तू?" किंवा "कशी आहेस गं तू?" मध्ये बदलतात, त्यासाठी असणारी ब्लॉगची साक्ष खूप मोलाची आहे.नव्या जुन्या आठवणींना उजाळा देणारा हा ब्लॉग आणि त्याच्याशी संबंधीत सारं येणारी वर्षही असंच सुरु राहू दे इतकंच मागणं..त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न नक्की राहतील.
माझ्या ब्लॉग वाचकांची असलेली मोलाची साथ माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि या सगळ्यांची मी खूप खूप आभारी आहे...





सर्वांना गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.

30 comments:

  1. ब्लॉग वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!

    ReplyDelete
  2. शुभेच्छा तुला आणि तुझ्या ब्लॉग बाळाला!
    :)

    ReplyDelete
  3. ब्लॉग वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!!!
    जसा वेळ मिळेल तश्या पोस्टा टाकत जा...'माझिया मना'ची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो ही सदिच्छा .....!!!!!

    ReplyDelete
  4. अभिनंदन अपर्णा :)

    तुझ्या ब्लॉगवर कसा आलो माहिती आहे, ते या ब्लॉगच्या नावामुळे, माझिया मना!
    वाटलं होतं आपल्या सारखं दुसरं कोणी तरी आहे म्हणजे या जगात जे मनात आलं तेच लिहणारे.
    पण कधी कधी नाव व गुण यात विसंगती आढळते :D ( पुर्वानुभव तगडा आहे ;) ) पण तुझ्या ब्लॉगने निराशा केली नाही हे नक्की, अगदी भरभरून च लिहले पाहिजे असे काही नसते तर मोजकेच पण वाचकाच्या हदयापर्यंत पोहचणारं चार ओळीत ही लिहता येऊ शकते व शुद्ध लिहता येऊ शकते हे तुझ्या ब्लॉगकडे पाहून शिकलो.

    मला आठवतं, जेव्हा मी दिल्लीहून पुण्याला शिफ्ट झालो होतो, २४ नोंव्ह. २००९ च्या आसपास तेव्हाच तुझा एक लेख होता, घर सोडून पहावे.. असा काहीसा अगदी तो माझा लेख होता :D ४ रुमचे घर रिकामं करणे ते पण ज्यात ४-५ वर्ष राहिलो... बाप रे !

    असो, लेखा पेक्षा प्रतिसाद मोठा नको म्हणून आवरतं घेतो :D
    लिहीत रहा.. मागच्या वर्षी ८४ पोस्ट आल्या होत्या, या वर्षी शतक पुर्ण कर हीच ईच्छा..!

    ReplyDelete
  5. गुढी पाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा :)

    ReplyDelete
  6. Are kharach ki, majhyahi blog la 2yrs purn zale (21 march) Majhya lakshatach nahi.

    Anyways.. congrats

    Aniket

    ReplyDelete
  7. दुसर्‍या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!!!

    आणि हो बराह म्यान करण्यासाठी सगळ्या फॉलोवर्सकडून 'ना हरकत' प्रमाणपत्र लागते बरे. हिंदी चित्रपटात ह्याला "जंग की शुरुवात तुमने की है, उसे खतम हम करेंगे" असे म्हणतात.

    ReplyDelete
  8. वा वा वा!! मज्जा मज्जा ! म्हणजे मला दोन दोन बर्थ डे पार्टीज मिळणार !!
    अभिनंदन!! हार्दिक अभिनंदन !!

    ReplyDelete
  9. ए म्यान बिन काही करायचं नाहीये !! बाकी सिद्धार्थ+११११११११११

    दोन वर्षं पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या लिखाणासाठी शुभेच्छा !!

    'वीस पूर्ण'ची पोस्ट वाचायचं भाग्य आम्हाला लाभो या सदिच्छा !! :)

    ReplyDelete
  10. आनंद खूप खूप आभार...तुला उत्तर देताना या ब्लॉगवर अपर्णाजी आणि आनंदजी असे झालेले उल्लेख आणि तुझा "तो" बझ आठवतेय आणि एकटीच हसतेय....

    ReplyDelete
  11. आभारी अनघा....तू ब्लॉगबाळाचा उल्लेख केलास तर उगाच लक्षात आलं ब्लॉगबाळाचे पण कपडे बदलायला हवेत..ही ही.....

    ReplyDelete
  12. देवेंद्र खूप खूप धन्यवाद...सध्या मनात खूप असलं तरी वेळ सगळीकडे वाटला गेलाय म्हणून पोस्टा अशाच अधेमधे टाकेन....आपली बझवरची बॅटिंग जास्त परवडते रे पण पोस्ट म्हटलं की सलग वेळ द्यावा लागतो मला त्यामुळे गाडं अडलंय....

    ReplyDelete
  13. राजे पहिल्याप्रथम आवर्जुन इतकं सारं मनातलं लिहिल्याबद्दल लय आभार....:)
    बाकी आम्ही घर बदललं तेव्हाच तुम्हीपण आवराआवरी करत होता हा योगायोग माहित नव्हता...आता लक्षात राहील..आणि ते ८४ च्या वेळची बात वेगळी..आता अगदी २०११ मध्ये पाहिलं तर शब्दशः १,२,१ असं सुरु आहे ...शतकं कुठचं गाठतोय...पण खास लिहिल्याबद्द्ल पुन्हा एकदा आभार.....

    ReplyDelete
  14. विक्रम आभार आणि पुन्हा एकदा शुभेच्छा....

    ReplyDelete
  15. कुठलाही ब्लॉगर आपल्या स्वतःचा वाढदिवस विसरतो म्हणजे... कमॉन अनिकेत....आता आठवलंच आहे तर कर की साजरा... हाय काय आणि नाय काय.....आमच्या आहेतच Belated शुभेच्छा...:)

    Anyways Thanks.....

    ReplyDelete
  16. हाबार सिद्धोबा...आज काय एकदम कोयता घेऊनशान आलास....नाय रे पुरती म्यान न्हाय केली अजून पण तळ्यात मळ्यात सुरु असतं मध्येमध्ये.....

    ReplyDelete
  17. दीपक पार्टी तर मी देईन रे....(निदान माझ्या वाढदिवसाची तरी)..पण तू ते चॉकोलेट कुठलं आवडतं सांगितलं नाहीस ते?? का डाएट सुरु आहे ??

    ReplyDelete
  18. हेरंबा, तू मला लिहिलेली कमेन्ट मी पण आणखी काही महिन्यांनी तुझ्या ब्लॉगवर टाकणारे....तुझिया मनात काय सुरु आहे त्याचा थोडा थोडा अंदाज घेऊन लिहिलंय अर्थात...तसं काही नसलं तर बरंच आहे पण सध्याला तुझ्याच शब्दात सांगायचं तर "हाबार्स"....

    ReplyDelete
  19. अपर्णा,
    ब्लॉगच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.
    लिखते रहो ...

    ReplyDelete
  20. सचिन आभार...लिखते राहीन. फक्त वेळ किती, कसा, कधी काढता येईल हे पाहते आहे सध्या....तुम वाचते रहो...

    ReplyDelete
  21. आपल्या ब्लोगला शुभेच्छा,अभिनंदन,

    ReplyDelete
  22. अपर्णा,
    खुप खुप अभिनंदन ग. असंच लिहत रहा...
    किती पार्ट्या उधार आहेत तुझ्यावर माहित आहे ना? ;-)

    अनेक अनेक शुभेच्छा

    ReplyDelete
  23. खूप खूप अभिनंदन... :-)
    आणि हो...अज्जिबात थांबवू नकोस blogging...
    We all love ur Blog... ;-)

    ReplyDelete
  24. अपर्णा, हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा! सॉरी, थोडा लेट झालाय खरा. पण तू समजून घेशील अशी आशा आहे :)

    ReplyDelete
  25. महेशकाका, खूप खूप आभार.आपलं प्रोत्साहन आहे त्यामुळे खरच बरं वाटतं...

    ReplyDelete
  26. सुहास पार्टीसाठी आपण कवा बी तयार असतो रे...फक्त भेट कधी होणार तिथेच मोठी गोची आहे.प्रतिक्रियेबद्दल हाबार..

    ReplyDelete
  27. मैथिली बऱ्याच दिवसांनी तू (आणि मी पण...:P) दिसतेस ....परीक्षा चांगली गेली असणारच... आता सुट्टीमध्ये सगळे ब्लॉग वाचतेस वाटतं....कमेंटसाठी आभारी.we love your blog too...:)

    ReplyDelete
  28. कांचन लेट काय ग...तू वाचलस यातच आलं...तसाही मलाही उत्तर द्यायला अंमल उशीरच झालाय...अशीच भेट देत रहा... आभारी...

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.