Saturday, April 30, 2011

गाणी आणि आठवणी ८ - प्यार के मोड पे छोडोगे जो बाहें मेरी

"परिंदा" या चित्रपटाचं नाव घेतलं तरी आपल्यापैकी नव्याणव पुर्णांक नव्याण्णव शतांश लोकांच्या डोक्यात "तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिलके अरमान हुए पुरे दिलके" वाजायला लागलं असेल आणि त्याच्या "मैने किया है रात दिन" पर्यंत तुम्ही पोचलाही असाल..पण त्याऐवजी मी जर " प्यार के मोड पे छोडोगे जो बाहें मेरी" म्हटलं तर काही क्लिक होतंय का? बरं हा व्हिडिओ पहा


 
 
खरं तर प्रत्येक गाण्याला आठवण असायलाच हवी असं नाही. आवडीचं गाणं चटकन आठवल्याशी मतलब आहे. तर झालं असं की बरेच दिवसांनी नवरोबाच्या आय-पॉडवर कब्जा करायची संधी मिळाली होती. साठ जीबीचा खजिना आहे त्याचा आय-पॉड..किती भरलाय माहित नाही पण बर्‍यापैकी फ़ुल्ल आहे एवढं नक्की..त्यात कधीही एखादा फ़ोल्डर निवडला की माहित असुन विस्मृतीत गेलेलं एखादं तरी गाणं मिळतंच..त्यादिवशी असंच रात्री झोप येत नव्हती आणि आशाचा ऐन भरात असलेला मधुर आवाज आणि माय ऑल टाइम फ़ेवरिट वाडकर यांचं "प्यार के मोड पे" सुरु झालं तेव्हा हे गाणं आपल्याला माहित आहे आवडीचं आहे इतकं आठवत होतं पण बाकी काही आगापिछाच आठवेना..रात्री झोप येईपर्यंत बरेचदा हेच गाणं रिपिट मोडमध्ये टाकुन ऐकलं..

त्यातला वाद्यांचा सुरेख वापर आणि चाल हे ऐकुन हे काम आर.डी.शिवाय कुणाचं असूच शकणार नाही हे तर कळत होतं पण चाल लक्षात असलेलं हे गाणं याआधी कुठे ऐकलंय हेच आठवत नव्हतं..मग काय? सकाळ सकाळी गुगलबाबांना साकडं घातलं आणि बगलं तर हे तर आपल्या "परिंदा" मधलं..म्हणजे चित्रपट पाहिले की लक्षात ठेवायचे याबाबतीत माझी बर्‍यापैकी बोंब असली तरी काही काही चित्रपट लक्षात राहतातही तसंच परिंदा म्हणजे (पुन्हा एकदा ऑल टाइम फ़ेवरिट) वाडकर, तुमसे मिलके हे समीकरण माहित आहे पण ती "तुमको ढुंढेगी जमाने में" अशी आळवणी करणारी आशा-वाडकरची जोडीचं पुन्यांदा हे मात्र आपण विसरलो हे लक्षात येऊन आता मात्र घोटलं आणि राहवत नाही म्हणून काही विशेष आठवणीशिवाय शेवटी पोस्टून टाकलं...

आठवण हीच की आठवत नव्हतं....:)

असो... या दोघांनी "तुमको ढुंढेगी जमाने में, निगाहें मेरी" यातलं "मेरी" हे दोघांनी प्रत्येकवेळी वेगळी तान घेऊन इतकं नजाकतीने गायलंय हे एकदा ऐकाच...सुरांची जादू किती मोहमयी असू शकते याचा आणखी या दोन सुरेल गळ्यांमधला आणि त्या अद्वितिय संगीतकाराच्या जादुगिरीचा समसमासंयोग...अहाहा काय बोलायचं, काय लिहायचं..त्यापेक्षा फ़क्त सारखं सारखं ऐकुनच तृप्त होऊया...कसं??

16 comments:

  1. मस्त...
    गाणी आणि आठवणी रंगारंग कार्यक्रमात दर्जेदार गाणी वाजतात :)

    ReplyDelete
  2. सुंदर... परिंदा म्हंटल्यावर 'तुमसे मिलके'च वाजायला लागतं नेहमी डोक्यात हे मात्र खरं.. आजपासून याचीशी आठवण होईल !

    ReplyDelete
  3. "तुमसे मिलके" अर्थातच ऑल टाइम फेवरेट. "प्यार के मोड पे" खरचं ऐकल्याचे आठवले नाही. मस्त आहे. डालो केलं लगेच.

    ReplyDelete
  4. प्रचंड आवडला. अगदी अगदी अगदी मनातलं लिहिलं आहेस

    ReplyDelete
  5. हाबार डॉ. आनंद....कार्यक्रम आवडला...भा.पो..:)

    ReplyDelete
  6. हेरंब "तुमसे मिलके"ने जरा जास्तच डॉमिनेट केलंय हे बरीक खरंच...

    ReplyDelete
  7. सिद्धार्थ आता प्यार के मोड पे ऐकल्यावर आवडलं का? मी ऐकलं होतं पण आता पुन्हा ऐकेपर्यंत जवळजवळ विसरलेच होते की हे परिंदामधलं आहे म्हणून.....अर्थात परत आठवण्याचं श्रेय आमच्या बिग कलेक्टरला....

    ReplyDelete
  8. कृष्णा आभारी....बर्‍याच दिवसांनी ब्लॉगवर येणं केलंत...

    ReplyDelete
  9. मस्त आवडले

    ReplyDelete
  10. तुमसे मिलके" हे ऑल टाइम फेवरेट आहे...खुपदा हेच ऐकतो.. प्यार के मोड पे कधी तरी ऐकल होत पण असच आता नीट ऐकतो.

    ReplyDelete
  11. आभारी महेशकाका...

    ReplyDelete
  12. नक्की ऐक योमु...आशाचा आवाज ऐकताना भान हरपतं....

    ReplyDelete
  13. परिंदाची हळुवार गाणी मस्त आहेत... पण आख्या चित्रपटात आपला नाना भाव खाऊन गेला... :)

    ReplyDelete
  14. रोहन, बर्‍याच दिवसांनी आलास बरं वाटतंय....
    परिंदाची गाणी तर आहेतच पण तुझं बरोबर आहे आपला नाना भाव खाऊन गेलाय...:)

    ReplyDelete
  15. परिंदा म्हंटल्यावर 'तुमसे मिलके'च वाजायला लागतं नेहमी डोक्यात हे मात्र खरं.. आजपासून याचीशी आठवण होईल !

    अगदी अगदी... :)

    ReplyDelete
  16. श्री ताई भा पो...:)
    आता हे पण गाणं एकत्र ऐकुया ....तशाही आपण दोघी सु वा च्या पंख्या आहोत हे ध्येनात आहे माझ्या...

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.