Saturday, April 9, 2011

धु धु धुक्यातला....

ओरेगावात थंडीतला पाऊस धुकं घेऊन येतो...त्याची कल्पना मागच्या वर्षी जेव्हा नव्याने इथे आलो तेव्हाच आली होती..मागच्या एका पोस्टमध्ये डिमेंटरवालं धुकं असा त्याचा उल्लेखही झालाय...

 पुन्हा तसेच दिवस असतानाच्या एका दिवसातलं कॅमेर्‍यात पकडलेलं हे धुकं....त्या दिवसाची आठवण अगदी ताजी करुन देतं...सवयीने काही गोष्टी आवडल्या जातात त्या अशा असं हे फ़ोटो काही महिन्यांनी पुन्हा पाहताना मला वाटतं...

नेहमीसारखं काही लिहित बसून उगाळण्यापेक्षा फ़क्त फ़ोटोच बोलतील ही अपेक्षा.....यंज्वाय....

सकाळी उजाडलंय का तेही कळत नाही

आज रविकिरणांना मज्जाव
हायवेवर धुक्यात हरवलेली वाहने
कुठे गेली सरावाने दिसणारी ती लाडकी झाडी??
कुठेतरी हरवत जाणारं हे वळण आज जरा वेगळंच दिसतंय..
अहाहा...नजरेत साठवावं असंच

15 comments:

  1. मस्त.. कधीतरी हे ही मोहवून जातं

    ReplyDelete
  2. आठवणी ही धुक्यासारख्या असतात!
    कधी गडद, समोरचं अस्तित्वही न जाणवू देणार्‍या,
    तर कधी विरळ स्वःताच्या अस्तित्वाला ही भुरळ घालणार्‍या !! :)

    ReplyDelete
  3. सही !!

    रच्याक, एकदम मतकरींची 'धुकं धुकं धुकं..' कथा आठवली.. जबरी आहे एकदम.. वाचली आहेस का?

    ReplyDelete
  4. फोटो पाहून भर दुपारी जरा गार गार वाटले.

    ReplyDelete
  5. Photo sundarach aahet - Pan dhukyachi aani thandichi khari majja unhane polun taknarya unhalyanantar jast yete -
    Ethe tar winter ch etaka prolonged asato ki mag tya dhukyacha aani gloomy weather cha kantala yeto - tyat paus pan agadi thanditach yenar - Nako nako vatta kadhi kadhi - Lakkha uan asalela summer jast aawdaato mala

    ReplyDelete
  6. अपर्णा, बर्फाळ प्रदेशातले फोटो आम्हा उष्णकटीबंधीय प्रदेशातील लोकांना फारच सुखावतात :)

    ReplyDelete
  7. एकदम गारेगार.....

    ReplyDelete
  8. खरंय न आनंद..बदल म्हणून हेही मनाला विरंगुळा देऊन जातं...

    ReplyDelete
  9. दीपक आठवणी खरच धुक्यासारख्याच असतात.म्हणून तर हे फोटो मला पोस्ट करावेसे वाटले..नंतर माझ्या आठवणी मीच काढत बसेन त्याची साक्ष हे फोटो.......:)

    ReplyDelete
  10. हाबार हेरंब..मतकरींची कथा नाही वाचली रे.....तूच कधीतरी थोडक्यात सांग मला फोनवर आता पुस्तक कधी मिळेल माहित नाही...

    ReplyDelete
  11. सिद्धार्थ बंगळूरू पण तापलं की काय??

    ReplyDelete
  12. निशा, सुरुवातीला जितका इथल्या थंडी आणि पाउस प्रकारचा कंटाळा यायचा तसा तो अजूनही येतोच पण आता त्याचाही लुत्फ घ्यायला हवा म्हणून हे फोटो..

    ReplyDelete
  13. श्रीराज, ब्लॉगवर स्वागत...आम्ही पण मुळातले उष्णकटिबंधवालेच.....काही वर्षापासून थंडीचाही कडक अनुभवतोय इतकच....बाकी गवत नेहमी दुसऱ्याबाजूने जास्त हिरवं दिसतं हे अनुभवतेय....:)

    ReplyDelete
  14. सुहास, "लेलो, लेलो गारवा झेलो". ...आपल लेलो....:)

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.