Wednesday, April 1, 2009

बोला वो तुमी बोला

"ट्रेडर ज्योज" खरी कॅलीफ़ोर्नियातली एक चेन. ताजी फ़ळं, भाज्या आणि त्याच्या organic varieties बरोबर काही वेगळीच फ़्रोजन डेजर्ट्स, मासे इ. इ. विकणारं दुकान. तिथे कॅलीफ़ोर्नियात जरा मोठी दुकानं आहेत यांची पण आमच्या इथे छोटी म्हणजे साधारण चारेक आइल्सवाली...वातावरण एकदम घरगुती आणि कधीकधी निवांत...बरं वाटतं बदल म्हणून...

त्या दिवशी दोनच कॅशियर चालु होते. शॉपिंग कार्टवर शांतपणे बसुन राहण्याची कला आमच्या बाळराजांना जमली नाहीये. त्यामुळे त्यातल्या त्यात कमी गर्दीच्या रांगेत आम्ही उभे. आमच्या आधीच्या माणसाचे चेक आउट करताना हा कॅशियर सारखं काही ना काही बोलत होता आणि समोरच्यालाही बोलतं करायचा प्रयत्न करत होता. मला त्याची खूप गंमत वाटली. मी ऐकत होते आणि एका बाजुला विचारही चालू होते. खरं तर तो जे काही बोलत होता त्याला तसा काही अर्थ नव्हता आणि ते त्यालाही माहित होते. पण तरी त्याला काही सांगायचे होते...

आमचा नंबर आला तेव्हा अपेक्षेप्रमाणे त्याने आमच्या बाळाची चौकशी केली आणि त्याच वेळी समोरच्या काउंटरला एक पंक कॅटेगरीमधला आणि एकदम फ़ंकी (याला मराठीत काय बरं म्हणावं?) गॉगल घातलेल्या तरुणाने मागे पाहिले..झालं हे साहेब सुटलेच एकदम "wow!! thats a great pair of glasses..Now have you seen these types before??" अशा प्रकारे तो तिथे असणा-या प्रत्येकाशी एकाच वेळी बोलल्यासारखं चालु झालं. मी त्याला म्हटलं तू एखाद्या रेडिओवर जॉकी म्हणून काम केले पाहिजे..त्यानेही ते खेळकरपणे घेतले आणि म्हणाला माझ्याकडे चेक आउट करणा-या प्रत्येकाशी मी बोलतो. I tell everyone you need to talk....

मी बाहेर पडता पडता माझ्या नवऱ्याला(अर्थातच मराठीत) म्हणाले चला या देशात एकाला तरी संवाद साधण्याचे महत्व कळले. दिसल्या माणसाला नुसतंच हाय हाउ आर यु म्हणण्यापलीकडे हा कॅशियर काही सांगु पाहातोय....किती आपल्या आपल्यात राहतो नाही आपण कधी कधी??

अशीही माणसं भेटावी. ते आपल्या विशेष खोलात जाणार नाहीत पण आपल्याला संपुर्ण एकटंही पडू देणार नाहीत.. आता पुढ्च्या वेळी याच दुकानात मी चेक आउट कांउटरला कोणाला शोधणार कळंलं की नाही???

2 comments:

  1. संवाद साधण्याची कला प्रत्येकालाच असते असे नाही. माझ्यासारखे लोकं फारच इंट्रोव्हर्ट असतात. रिअल लाइफ मधे कुठे कधी अनोळखी माणसाशी जनरल गप्पा मारायच्या म्हंटलं तर मी मुखदुर्बळासारखा नुसता बसुन असतो,संभाषण सुरु करण्याची कला माझ्यामधे नाही पण ते सुरु ठेवण्याची आहे. एका मॅनेजमेंट वर्क्शऑप मधे तेवढं बाकी छान शिकवलं होतं की संभाषण सुरु कसं ठेवायचं ते..
    बाकी पोस्ट नेहेमी प्रमाणेच उत्तम.. येउ देत अजुन...

    ReplyDelete
  2. हो पटतय....काही काही लोकं अशाप्रकारे बोलायला लागतात की वाटतं जन्मजन्मांतरीची ओळख असावी ...

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.