रोज दिवसभरात निदान एक फ़ेरी पाळणाघराकडे असते. कधी मुलांना सोडायला तर कधी परत आणायला. अंतर तसं फ़क्त दोन मैल आहे आणि रस्ता म्हणावा तर रहदारीचा म्हणावा तर शांत.अर्ध्या मैलावर झेरॉक्स कंपनीचा कॅम्पस लागतो त्यामुळे कंपनीच्या वेळाप्रमाणे थोड्या-फ़ार गाड्या असतात. घरातून निघाल्यापासून एकही सिग्नल नाही. फ़क्त एका चौकावर जिथे आम्हाला पाळणाघराकडे जाताना उजवीकडे वळायचं असतं तिथे एक फ़ोर वे स्टॉप साइन. परतीच्या वेळी त्याच स्टॉपवरुन डावीकडचं वळण घेतलं की ३५ च्या लिमिटचा सरळ रस्ता आणि मग मैलभराच्या अंतराने घराचं वळण. हा रस्ता, हा स्टॉप इतका सरावाचा झालाय की मला वाटतं जेव्हा मी ही जागा सोडून दुसरीकडे कुठे जाईन तेव्हा मध्येच हा रस्ता माझ्या स्वप्नात येईल.
मला स्वतःला स्टॉपवर नियमाप्रमाणे चारी चाकं पूर्ण थांबली की मगच निघायची सवय आहे पण इथे या निवांत रस्त्यावर अध्येमध्ये घसरत घसरत थांबल्यासारखं करुन निघणारं कुणीतरी दिसतंच आणि मजा वाटते. तसं जास्तीत जास्त एक मिनिट वाचत असेल पण तरी ते होतंच. त्यापेक्षाही मजा येते ती समोरासमोर येणार्या गाड्याची निव्वळ स्टॉपवर पहिला नंबर थांबण्यासाठीची धडपड. तेवढ्यातल्या तेवढ्यात थोडं तरी जास्त जोरात पेडलवर पाय पडतो ते कळतंच. मग आधी तू का मी मध्ये कुणी चुकीच्या नंबराने पहिले निघालं की सहसा कुणी हॉर्न मारत नाही पण त्या क्षणाचं साक्षिदार होण्यात गम्मत आहे. उगाच एकटं गाणी ऐकत चालवतोय त्यात डोक्यात थोडासा विचारांचा किडा सोबत देतो.
आज नेमकं मुख्य रस्त्यावर आल्यावर स्टॉप नजरेत भरला तसंच नजरेत भरली ती डोक्यावर लाल-निळ्या दिव्यांचा मुकुट घेऊन फ़िरणारी पोलीसाची गाडी. शांतपणे थांबून तो मला जायचं होतं तसं डावीकडे वळला. त्याला जसं मी पाहिलं तसंच माझ्या आधी नंतर येणार्या गाड्यांनंही दुरुन पाहिलं असणार.
पोलिसाची गाडी गेली; पण इतरवेळी सरपटत पुढे येणार्या गाडीवानांना थोड्यावेळासाठी का होईना पण शिस्त लावून गेली. चारी चाकं थांबवून मग निघणारी आज मी एकटीच नव्हते....
image courtsey internet
मध्यरात्री २ ला ड्राईव्ह करतानाही प्रत्येक स्टॉपला प्रामाणिकपणे थांबणारा माझा जुना कलिग आठवला :)
ReplyDeletehehehe aawadala :)
ReplyDeleteहा हा हेरंब...अरे नियम पाळावे बर असतं आणि नाही पाळले तर मोठा फटका पडतो न....:P
ReplyDeleteहाबार्स निशा ..:)
ReplyDeleteSTOP चा बोर्ड पार करण्याआधी स्पीडोमीटरचा काटा शुन्याला टेकला"च" पाहिजे ही लिंडाने दिलेली शिकवण आठवली... :D
ReplyDeleteव्ह्य महाराजा...
ReplyDeleteलिंडाची शिकवण वाचलीय....तिने तुला इतालिअन खायला पण शिकवायचं ठरवलं होत न...:)
lol... i've also noticed this thing :P
ReplyDeleteहाबार्स सौरभ...आणि स्वागत....:)
ReplyDelete