Thursday, June 23, 2011

नॉट विदाउट माय डॉटरच्या निमित्ताने

बरेच दिवसांनी वाचनालयात जायला मिळालं आणि कित्येक महिन्यांपासुन यादीवर असलेलं ’नॉट विदाउट माय डॉटर’ घेता आलं..मागे इराणबद्दल वाचलेलं ’माय होम, माय प्रिझन’च्या बाजुलाच हे असावं हा योगायोगच म्हणायचा. हे पुस्तक इतक्या उशीराने वाचणारी कदाचित मी एकटीच असेन..त्यामुळे खरं तर वेगळं काय लिहिणार मी?

८४-८६ काळात घडलेली ही घटना. एका अमेरिकन बाईने आपल्या इराणी नवर्‍याबरोबर दोन आठवड्यासाठी इराणमध्ये जाणं आणि आपल्या पाच वर्षांच्य मुलीसोबत तिला तिच्या इच्छेविरुद्ध अडकावं लागणं...तिच्या वाट्याला धर्म या नावाखाली लादलेले जाचक नियम..अगदी सरळ शब्दात सांगायचं तर कैदच...या कैदेतून लेकीसकट पळु जायचं धाडस करुन ते यशस्वी करण हा साराच प्रवास एक स्त्री म्हणून वाचताना मनावर अनेक आघात करुन जातो....अशा प्रकारे स्रियांना वागवलं जातं आणि कितीतरी जणी अद्यापही अशाच जगत असतील हे कटु सत्य आणखीच विषण्ण करायला लावतं... या घटनेवर लगेचच म्हणजे ८७ साली लिहिलेलं हे पुस्तक मुळात वाचलंच पाहिजे..वेदनेलाही भाषा असते आणि ती वेदना आपल्यापर्यंत पोहोचु शकते हे मागचे काही दिवस मी या वाचनाद्वारे मागचे काही दिवस अनुभवलंय...

खरं तर माय होम माय प्रिझननंतर इराणबद्दलची पार्श्वभूमी आधीच मनात तयार झाली होती. ही घटना तर त्याच्या आधीच्या दशकातली. फ़रक इतकाच ती तिथे इराणमधली राजकीय पार्श्वभूमी होती तर इथे तिथली सांस्कृतिक. हे पुस्तक मी सुरु केलं आणि शेवट त्या माय-लेकींच्या सुटकेत आहे हे माहित होतं तरी सारखं त्या दडपणात आपणच जगतोय असं झालं होतं. म्हणजे मध्येमध्ये त्या दडपणाने होणारी चिडचिड घरात येऊ लागली आणि मग बेट्टी आणि तिची पाच वर्षांची मुलगी मोहताब यांनी हे कसं सहन केलं असेल असं सारखं मनात येऊ लागलं...

शेवटी ती खदखद मनात राहु नये म्हणून मग रोज थोडं वाचलं की त्यात काय झालं हे आईला सांगायला सुरुवात केली. तिने स्वतः आत्ताच मी मागे आणलेलं ’सोन्याच्या धुराचे ठसके" वाचुन तसंही आखाती देश आणि त्यांची संस्कृती याविषयीच्या आमच्या चर्चा कम आपलं किती बरंय हे बोलुन झालंही होतं...त्यामुळे तशाच प्रकारच्या या संस्कृतीचं कंटिन्युएशन असलेलं हे पुस्तक तिने माझ्यातर्फ़े वाचलंच...रोज मी थोडं वाचुन झालं आणि चिंतातुर चेहर्‍याने बसले की "काय झालं गं तिचं?" आणि मग आमची चर्चा..आता हा आमच्या घरातलाच प्रश्न असल्याप्रमाणे काही दिवसांनी नवराही सामिल झाला. त्याला तसंही वाचन करायचा कंटाळाच आहे..पण ती या सर्वातून कसा मार्ग काढते हे त्यालाही डिटेलमध्ये हवं होतं...मी दुपारच्या चहाला आईबरोबर आणि रात्री मुलं झोपली की नवर्‍याबरोबर असं तीनदा हे सगळं जगतेय...तिच्यासाठी प्रचंड सहानुभुती आणि "त्या" सो कॉल्ड रुढींबद्दलचा तिटकारा पुन्हा पुन्हा अनुभवतेय...

जशी मला वाचनाची तशी त्याला चित्रपटांची आवड त्यामुळे माझं पुस्तक अर्धं वाचुन होईस्तो आमच्या इन्स्टंट क्यु मध्ये "नॉट विदाउट माय डॉटर" आला. पण माझं पुस्तक पूर्ण झाल्याशिवाय त्याला तो पाहायचा नव्हता..तिचं दुःख,वेदना,तडफ़ड सारं काही सहन करायची माझीही सहनशक्ती संपली होती..त्यामुळे शेवटी ती निर्धाराने मुलीसह घर सोडून अमाल (Amahl) कडे येते, त्यानंतरचं ते पुढे अमेरिकेतल्या तिच्या खडतर प्रवासांचं वर्णन मात्र थांबुन वाचायला मला धीर नव्हता..त्या रात्री दोन-अडीच वाजेपर्यंत जागुन मी सुटकेचा निश्वास टाकला...हे सगळं दुसर्‍या दिवशी आईला जमेल तितक्या थोडक्यात सांगितलं आणि मग नवर्‍याला मात्र चित्रपटच पाहायला म्हटलं..

खरं तर हे सगळं पुन्हा उकरुन उद्विग्न व्हायची इच्छा नव्हती पण तरी हा चित्रपटही मी पाहिला. निव्वळ यासाठी की या पुस्तकातलं कितपत त्यात उतरलंय ते तपासायला..ज्यांना या सत्यकथेत खरंच रस आहे त्यांच्यासाठी चित्रपट म्हणजे हिमनगाच्या वरच्या टोकापेक्षा कमी भाग आणि वेदना पोहोचणं वगैरे फ़ार कमी दृश्यात झालंय असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. चित्रपटातली बेट्टी फ़क्त सारखी संभ्रमात असल्याचा चेहरा असलेली वाटते तर खर्‍या आणि पुस्तकातल्या बेट्टीच्या स्वभावाला बरेच कंगोरे आहेत. ती नवर्‍याशी प्रसंगी खोटं नाटक करुन स्वतःला सुटकेचे प्रयत्न करण्यासाठीचा वेळ देते. आपण मुलीला फ़ार लवकर मोठं व्हायला लावतोय का किंवा नाहीच जमलं परत जायला तर कशाला तिला वेडी आशा दाखवा म्हणून आईचं तिचं वेगळं रुप...नंतर नंतर तिची परमेश्वरावर बसणारी तिची श्रद्धा आणि तिच्या प्रार्थनांना आलेलं फ़ळ किंवा तसा योगायोग हे सारं चित्रपटात कळणं कठीणच.....हे सगळं खूप लवकर होतंय आणि काही ठिकाणी काही प्रसंगात ती हे असं का वागते याचं थोडं स्पष्टीकरण जे पुस्तकात मिळतं, चित्रपटात मिळत नाही. चित्रपटाच्य तळटीपेत लिहिण्याप्रमाणे पुस्तकाबर हुकुम चित्रपट नाही हे पुस्तक ताजं वाचलेलं असल्याने जाणवतंच....

एक स्त्री म्हणून हे सारं वाचलं की आपल्याला त्या मानाने बरंच काही मिळतंय असं सारखं वाटत राहातं ...म्हणजे जिथे कमी लेखलं गेलंय आणि जातंय ते नेहमीच जाणवणार पण या 'अशा' देशांमधली भरडली जाणारी स्त्री पाहिली की आपण फ़ारंच बरे आहोत हे लक्षात येतं...म्हणजे पेला अर्धा भरल्यासारखं वगैरे....

माझ्यासारखं कुणी एखादं हे पुस्तक वाचायचं राहिलं असेल आणि त्यांच्यासाठी ९१ मध्ये आलेला चित्रपट हा पर्याय असेल तर त्यांनी पुस्तकच वाचावं फ़क्त हे सांगण्यासाठीचा हा पोस्टप्रपंच....

25 comments:

  1. अपर्णा,
    खरंच हे पुस्तक म्हणजे अंगावर काटा आणणारे आहे. सुरुवातीच्या मसाज च्या प्रसंगापासूनच बेटी यात अडकु नये असे वाटत असते, आणि पूर्ण पुस्तक भर आपण तिच्याच सोबत असतो. खूप सुंदर पुस्तक आहे, बरंच पूर्वी वाचलं होतं, पुन्हा वाचायची होत हिम्मत नाही !

    ReplyDelete
  2. वाचायचं आहे गं हे पुस्तक. मागे तन्वीताई ने सांगितलं होत ह्या बद्दल. नक्की मिळवतो.
    ब्लॉगचं नवीन रुपडं मस्त आहे. :)

    ReplyDelete
  3. Mi vachlay he pustak 'not without my daughter' he naav pan kiti sarth aahe ya pustkala.
    Finally she manage to make it and that too with her daughter...

    ReplyDelete
  4. hoy mi vachalay he pustak aani kharach vachatana apanahi tiche aayushya javalun pahato , sarkahi utakantha lagun rahate pudhe kay hoyil yachi,ani tithale Iranmadhale vatavaran baghun angavar katach yeto, te bathroom madhe zural ani tichi ti mothi nannand 6 mahinyanatar snan karate ani chakkar yevun padate vagere. are bapare

    ReplyDelete
  5. मी आहे तुझ्याबरोबर. मी नाही वाचलंय अजून. इथल्या लायब्ररीत मिळतच नाहीये.. आता विकतच घेऊन टाकतो.

    कसली गुंतून गेली होतीस तू बेटीमध्ये.. !! जाणवतंय ते पोस्टमधून..

    ReplyDelete
  6. होय मी वाचलंय ते पुस्तक, खरच इरानमधले आयुष्य किती भयंकर होते त्याचे फार छान वर्णन आहे त्यामध्ये आणि ते पुस्तक वाचताना आपण पण तिचे आयुष्य जवळून पाहतो आणि पुढे काय होईल याची उत्कंठा सतत लागून राहते.

    ReplyDelete
  7. होय मी वाचलंय ते पुस्तक, खरच इरानमधले आयुष्य किती भयंकर होते त्याचे फार छान वर्णन आहे त्यामध्ये आणि ते पुस्तक वाचताना आपण पण तिचे आयुष्य जवळून पाहतो आणि पुढे काय होईल याची उत्कंठा सतत लागून राहते.

    ReplyDelete
  8. Yes, just last week I read that book and watched movie too. It's a 'cannot-keep-down' book. I read it in Marathi though. just in 2 days and half night. :) What a fabulous translation Leena Sohoni has done! Hats off to her. Movie is very plain as compared to the book.

    In the history of mankind, women have suffered a lot in all cultures and societies. Have can we forget 'burning of widows' in Indian culture, not very lo0ng ago. India has become notorious for female foeticides. In some countries, women cannot drive and vote. Even in 21st century, in some places, women are living pathetic life. Recently CNN did a documentary on sex slavery.

    The history teaches us that the society that has respected women will only prosper. Amen.

    ReplyDelete
  9. मी हे पुस्तकही वाचलय आणि सिनेमाही पाहिलाय. पुस्तक वाचल्याशिवाय सिनेमा पाहूच नये असेच मीही म्हणेन.

    किती भयावह परिस्थितीतून आयुष्यात मार्ग काढावा लागतो हे वाचूनच थरकाप होतो. मानले बेटीला. आणि एकदा का हे पुस्तक हाती घेतले की अक्षरश: गुंतून जातो आपण तिच्या संघर्षात.

    तुझेही तेच झालेय... परिक्षण आवडले. :)

    ReplyDelete
  10. अगं, सांगायच राहूनच गेलं की ब्लॉगचे नवीन रुप छान आहे. :)

    ReplyDelete
  11. aparna tya 'tashya' deshanmadhe bayakanna miLaNaree treatment pahilee kee kharach apala ardha pela Ok vaTayala lagato. evadhyat egyptian uprising cover karaNarya journalist ( Lara Logan? ) la kashee vagaNuk milalee hotee vachala asasheel na? angavar kaTa yeto akshrash:

    ReplyDelete
  12. काका अगदी मनातलं लिहिलंत तुम्ही..सुरुवातीपासूनच ती यात अडकू नये असं वाटत राहतं..पुन्हा हे पुस्तक वाचायची माझी पण हिम्मत होणार नाही...

    ReplyDelete
  13. सुहास, हे पुस्तक नक्की वाच...काही व्यथा वाचून तरी अनुभवाव्या नाही का?
    ब्लॉगचं नवीन रुपडं म्हणशील तर हा फोटो इथल्या एका सिनिक ड्राइव्हला घेतला आहे...कोलंबिया नदीची gorge ...आणि बाकी रंगसंगती अतिभडक होऊ नये म्हणून श्री ताई आणि हेरंबने सावरलय..त्यांचे आभार...:)

    ReplyDelete
  14. निशा, खरच पुस्तकाचं नाव "Not without my daughter" यथार्थ आहे...प्रतिक्रियेबद्दल आभारी...

    ReplyDelete
  15. @jayaballoli, ब्लॉगवर स्वागत आणि मराठी आणि इंग्रजी दोन्ही प्रतीक्रीयाबद्दल खूप खूप आभारी...ती बाथरूममधली झुरळ आणि मोठी नणंद मलापण जाम लक्षात राहिली..आणि त्यांचं ते बाथरूममध्ये रोज प्रार्थना कारण...भयाण आहे हा देश आणि तिथल्या सो कॉल्ड रूढी....दिवसेंदिवस आंघोळ न करणं..याक...

    ReplyDelete
  16. हेरंब आपलं लाईक माइंडस प्रकरण आवरा होत चाललंय...विकत घ्यायची गरज नाहीये तशी कारण एकदा वाचलस की पुन्हा वाचायचा धीर नाही होणार.. पण वाच नक्की...

    ReplyDelete
  17. hi Blogman welcome to the blog and thank you for your comments. Thanks also for the information about the details of Marathi version of this book.My mom would like to read it in Marathi so I will surely pass the information to her.
    About respecting women, unfortunately no society had done it 100% I would say. Somehow this is a man dominating world and every woman has to overcome hurdles in her own fields and we all can agree upon that. Although we cannot generalize for sure woman is always treated one level below the man whom she is associated with.
    We can only ignore a few things which are not that bothersome and move on...I am sure lot of women and a few men would agree to it.
    Thanks for visiting the blog..

    ReplyDelete
  18. श्रीताई आभार..तू पण चित्रपट पाहिला असशील असं मला वाटलं होतच...या संघर्षात खूप गुंतायला होतं हे मात्र शंभर टक्के..

    ब्लॉगच्या रुपाबद्दलच आपलं त्या दिवशीच संभाषण आठवून हसत होते आता....

    ReplyDelete
  19. स्मिता अगदी पटतय तुझ बघ...आपण खरच बऱ्याच बऱ्या...

    ReplyDelete
  20. मी पाच सहा वर्षांपूर्वी अनुवादित पुस्तक वाचलं होतं, त्यानंतर पुन्हा नाही वाचलं

    ReplyDelete
  21. प्रसाद भा पो...आभारी रे...

    ReplyDelete
  22. आभारी सोनाली..रिव्ह्यु म्हणून लिहित नव्हते पण हा वाचन अनुभव लिहून ठेवावासा वाटला इतकंच..तू नक्की वाच पुस्तक..

    ReplyDelete
  23. अपर्णा, मी देखील ७ वर्षांपूर्वी अनुवादीत पुस्तक वाचले होते. तोपर्यंत या आखाती देशांबद्दल फार काही वाचलेले नव्हते. त्यामुळे वाचून खूपच हादरले होते. त्यानंतर शैझिया, परवाना, ब्रेड विनर, काबूल ब्युटीस्कूल यांसारख्या अनेक पुस्तकांमधून तिथल्या समाजव्यवस्थेचे चित्रण समजत गेले. असंच एक पुस्तक ’बर्न्ड अलाईव्ह’ अफगाणिस्तानातल्या सोऊद या मुलीचं..मिळलं तर नक्की वाच. माझ्या ब्लॉगवर मी लिहिलंय त्याबद्दल. http://bit.ly/oEFa8s

    ReplyDelete
  24. श्रेयाताई ब्लॉगवर हार्दिक स्वागत...:)

    आपण सुचवलेले पुस्तक वाचायचा नक्की प्रयत्न करेन...सध्या हा एक संघर्ष वाचून आलेला मूड बदलायला वेळ लागेल...आता काही हलकं फुलकं वाचावं म्हणते...
    any suggestions??

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.