Monday, June 13, 2011

भागलेला चांदोबा......

मागे कधीतरी मी चांदोबाचं गाणं फ़ुलोरामध्ये टाकलं होतं..त्यानंतर त्या इवलुश्या आयुष्यात अनेकविध गोष्टी,गाणी, प्राणी, वस्तू येत गेले...पण चांदोबा बहुधा जास्त लक्षात राहिला असं वाटतंय...अगदी आजचीच गोष्ट...

रोज झोपताना सर्वात प्रथम "आजीबलोबल झ्योपायच्यं"चं पालुपद सुरु होतं. जास्त करुन तिलाही दोन्ही नातवांना वेळ द्यायचा असतो आणि मला तिला शारिरिक कष्ट जास्त पडू नये म्हणून धडपडायचं असतं..त्यात चांदोबाचं गाणं जास्त लाडकं..आमच्या घरात मला आणि माझ्या आईला असं मध्येच एखादी गाण्याची लकेर घ्यायची सवय आहे...आरुष आसपास असताना चांदोबाच्या गाण्यातलं एखादं वाक्य सुरु करुन सोडलं तर हमखास त्याच्या बोबड्या आणि मोठ्या आवाजात पुढे नेतो...(घरात दोन-दोन लहान मुलं असताना आम्ही तोंड उघडलं की चांदोबा,इंजिनदादा आणि तत्समच पहिल्यांदी नंबर लावतात हे आता कंसात सांगायला हरकत नाही) त्यात नेमकी त्याच्या खेळण्यात एक प्लास्टिकची माशी मिळाल्यामुळे तर काय सोनेपे सुहागा सारखं प्रात्यक्षिक दाखवायचं असतं...मग सुट्टीच्या दिवसांत किंवा पाळणाघरातून परत आल्यावर ती माशी त्याच्या तावडीत सापडलेल्या खाण्यात पडल्यामुळे राहिलेला एक उपाशी चांदोबा आमच्या घरात कायम फ़िरत असतो. आणि आजीच्या आरुषची पापा खाशील का या ऍडिशनला आपला ऋषांकची पापा खाशील का म्हणून एक एक्स्ट्रॉ डब्बा पण जोडला जातो...’हा गाणार’ म्हणता म्हणता कविता करणारच्या कंक्लुजनला यावं लागतं मला इतकं इंस्टंट काय काय सुरु असतं...या तेलात तळलेलं कंल्कुजन म्हणजे चांदोबा ऑल टाइम फ़ेवरिट...

अरे हो ब्याक टु आजचीच गोष्ट.........

आज मात्र पाळणाघरातली दुपारची झोप न घेतल्यामुळे अर्ध जागेपणी, अर्ध झोपेत आमच्या भाषेत सांगायचं तर रुटीन सुरु होतं...शेवटी आंघोळीनंतर ’जय जय बाप्पा’लाच भोकाड पसरल्यामुळे मीच पुढे झाले आणि बाबाकडून ताब्यात घेऊन स्वारीचं आणखी डोकं चालायच्या आत ’चल झोपायला जाऊया’ म्हणून आत नेलं..

तो तर भानावर नव्हताच पण बहुधा मी पण जे काही काम अर्धवट टाकून आले होते त्याच्याच विचारात असावी, म्हणून कुठलं तरी सुचेल ते गाणं आमच्या आतापर्यंतच्या टिपिकल झोपेसाठी हिट टोनमध्ये सुरु केलं..(या टोनला शब्दात पकडायचं मी सोडतेय...घरोघरी याची आपापल्या पिलांसाठी क्लिक होणारी व्हर्जन्स असणार त्यामुळे भावना नक्की पोचतील...)

’मला नीत पकल’ अर्धवट झोपेतली सुचना क्र.१

’बरं बाबा’..रॉकिंग चेअरमध्ये दोघांची बैठक नीट करुन मी पुन्हा आधीचा टोन सुरु केला...

’चांदोबाचं म्हण" झोपाळलेली सुचना क्र.२

’चांदोबा चांदोबा कुठे रे गेला...." पोराने लगेच गुडुप झोपावं म्हणून किंवा स्वतःच्याच तंद्रीत असल्याने डायरेक्ट शेवटच्या कडव्याने सुरु झालेली आई.

"नाई, आधी भागायचं...." झोपाळलेली (???) सुचना क्र. शेवटची...

आईचा मोठा ऑ.......................एक छोटा पॉज आणि अगदी हापिसातल्या बॉसचं पण कधी इतक्या वेळेवर ऐकलं नसेल त्या तत्परतेने "चांदोबा चांदोबा भागलास का................

आई-बाबांवर रुसलास का"ला येईस्तो ऐकु येतो तो संथ लयीतला श्वास..

दिवसभर खेळून दमलेला एक छोटुसा थकला-भागला जीव त्याच्यासाठी आता पुर्वीसारखा वेळ देऊ न शकणार्‍या आईच्या खांद्यावर अजीबात न रुसता झोपुन गेलाय..किती छोट्या असतात काही काही वेळा त्यांच्या अपेक्षा नाही??
 
निदान आज झोपतानाची तरी......:)

19 comments:

  1. हा हा हा...

    >> नाई आधी भागायचे...
    सुख:कर्ता दुख:हर्ता सोडून डायरेक्ट घालिन लोटांगण सुरू करतात का कधी? आरुषला माझ्यातर्फे

    "छोटा बच्चा जान के ना कोई आँख दिखाना रे,
    अकल का कच्चा समझके ना हमको समझना रे" हे गाणे शिकव. त्याला गरज लागेल

    टूपी टूपी टप टप :-)

    ReplyDelete
  2. mastach aprna...

    Single asunahi... hi maja mi bhachyabarobar an bhachibarobar anubhawliye.... agadi chandobapasun.. zukzukgadiparyant sagli gani mhantanna malach zopawlay tyanni :)

    ReplyDelete
  3. >> किती छोट्या असतात त्यांच्या अपेक्षा काही काही वेळा नाही?

    :(((( अगदी अगदी खरंय.. आमच्याकडे काल रात्री झोपतानाच किस्सा झाला एक. सांगेन कधीतरी सावकाश.. आत्ता नको :(

    मस्त पोस्ट हे वेगळं सांगत नाही..

    ReplyDelete
  4. खरेच गं. आईबाबाने सतत आपल्याभोवती असावे, बास. सुचना पण किती क्रमवार केल्यात ना... :)

    पोस्ट छानच!

    ReplyDelete
  5. सुंदर पोस्ट.. मनाला भावलं...

    ReplyDelete
  6. हा हा हा सिद्धार्थ.. तुझा निरोप देते आरुषला..पण हिंदीत नाही मराठीतून...हिंदी हमारे घर की कोड भाषा है...

    ReplyDelete
  7. प्रसाद ब्लॉगवर स्वागत...आमच्याकडे बाबा असा झोपून जातो आणि पोरग बाहेर येत रात्री अकरा साडे आकराला...

    ReplyDelete
  8. हेरंब हो रे....तुझा किस्सा टाक न ब्लॉगवर...तुझ्या शैलीत वाचयला मजा येते...

    ReplyDelete
  9. हो गं श्रीताई...पण आजकाल काम प्रचंड वाढल्यामुळे साध ते ही नीट करता येत नाही आणि मग मन खातं असं झालय.....

    ReplyDelete
  10. आनंद, घरात सध्या आरुषची टकळी सुरु असते त्यातली ही मला इतकं हसवून गेली म्हणून त्याला झोपवल्या झोपवल्या लगेच लिहून टाकलं...उगाच विसरायला नको हा दिवस...:)

    ReplyDelete
  11. मस्त! आवडली पोस्ट!

    ReplyDelete
  12. kharach forgiving asataat mula aNee tyamuLehee prachanDa guilty vaTata , moThe emaNAsa dookh dhartaat , pilla lagech visarataat bicharee.. aThavanee tajya kelyas baryach..

    ReplyDelete
  13. आभारी निशा..आरुषच्या काही गमती तुला 'चकए चष्टगो' मध्ये वाचयला मिळतील....:)

    ReplyDelete
  14. आभारी 'अखिलदीप' आणि ब्लॉगवर स्वागत..

    ReplyDelete
  15. खरंय स्मिता..ही पिल इतकी निरागस असतात त्यामुळे मग आपल्या ओरडून वागण्याचं नंतर आपल्यालाच वाईट वाटतं...

    ReplyDelete
  16. सुंदर पोस्ट ....
    >>किती छोट्या असतात काही काही वेळा त्यांच्या अपेक्षा नाही??
    खरच...

    ReplyDelete
  17. सुंदर पोस्ट ....
    >>किती छोट्या असतात काही काही वेळा त्यांच्या अपेक्षा नाही??
    खरच...

    ReplyDelete
  18. खरंय देवेन...बऱ्याच दिवसांनी दवबिंदू चमकतोय...हाबार:)

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.