Saturday, April 18, 2009

राहिले ना मी माझी

काही योगायोग कसे असतात की केवळ तो अनुभव म्हणून नोंद ठेवावीशी वाटते. शनिवारची सकाळ आरामात उजाडण्याचे दिवस आता कधीच संपले आहेत. बाळराजे ऊठले की आईचे मन आपसुक कामाला लागते. तशीच काहीशी ही आणखी एक सकाळ. पण खाली फ़ोनचा व्हॉइसमेल नवा संदेश असल्याचं सक्काळ सकाळी सांगु लागला की भारतातुन कुणी फ़ोन करत होता का याच शंका. व्हॉइसमेल ऐकायला सुरुवात केली आणि फ़क्त इकडचा तिकडचा आवाज येतोय. काही मराठी आवाज नक्की येतोय. अगदी अस्पष्ट का होईना पण आईचा आणि मावशीचा काही संवाद चालु असेल असा काहीसा गोंधळातुन जाणवणारा स्वर.

आई सध्या शेगावला गेली आहे. परत मुंबईत यायची तारीख खरं तर मी विसरलेय.पण म्हटलं बघुया तिनेच केला होता का ते? मोबाईलवर लावला फ़ोन. आई इतकी तिच्या राज्यात होती की तिला काहीहि कल्पना नाही आपल्या फ़ोनवरुन असा इंटरनॅशनल कॉलबिल झालाय. आम्ही थोड्याफ़ार नेहमीच्या चौकशा झाल्यावर मी तिथे कसं वाटतय विचारतेय तोच अगदी अचानक आई मला म्हणतेय अगं इथं आल्यापासुन मी बाकी सर्व गोष्टी पुर्ण विसरले आहे. कुणाचा फ़ोन आलाच तर तेवढंच काय ते..सर्वकाही विसरुन जाण्याची आईची अवस्था माझ्यासाठीतरी पहिल्यांदाच. नेहमी मुलं, नातवंड, काही ना काही घरगुती गुंते नेहमीच पाठी लागलेले....खरं सांगते इतकं बरं वाटलं की तिला अजुन डिस्टर्ब करावंसं वाटलच नाही. थोडा वेळ मला इथे तिची ती मानसिकता अनुभवावीशी वाटली..

आणि थोड्या वेळाने नवीन सा रे ग म प पाहण्यासाठी यु ट्युबवर सर्च करताना पुष्कर लेलेचं "लक्ष्मी वल्लभा" चालु झालं...काही वेगळंच वाटत होतं...गाणं संपल्यावर तोही तसंच काही म्हणाला की जसं पंडितजी म्हणालं की "न परि हरवले ते गवसले" ......पुढे थोडा वेळ फ़क्त शांततेचा आवाज ऐकत बसल्यासारखं....


मी स्वत: दोन्ही प्रसंगांमध्ये बघ्याच्या भुमिकेत आहे. पण दोन प्रसंगामधे जे अंतर्मुख करण्याचं सामर्थ्य आहे त्यामध्ये राहिले ना मी माझीची जाणिव का सारखी होतेय माहित नाही.........हा दिवस किंवा कदाचित पुढ्चा आठवडा काही विशेष घेऊन येतोय का पाहायचं....

5 comments:

  1. antarmukh karnarach aahe!

    ReplyDelete
  2. खरय असते अशी अवस्था..तिला उन्मनी असे म्हणतात..आमच्या रोह्याच्या घराजवळच्या हनुमान मंदिरात, थेउरला चिंतामणी मंदिरात याचा प्रत्यय नेहेमी येतो...

    तन्वी देवडे

    ReplyDelete
  3. उन्मनी ...फ़ार छान शब्द आहे गं. धन्यवाद. तुझा अजुन एक शब्द पुढ्च्या ब्लॉगम्ध्ये वापरेन बहुतेक...

    ReplyDelete
  4. खुपच छान.
    आपली आई काही तरी एन्जॉय करत्ये हेच खुप सुखावह असते.

    ReplyDelete
  5. हो ते तर आहेच सोनाली...आणि आपल्या आया इतर वेळी नेहमीच कामात असतात..त्यांनी स्वतःसाठी कधी वेळ काढला का असा मला नेहमीच प्रश्न पडतो...:)

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.