Wednesday, July 9, 2014

लाकडाचं सौंदर्यदालन

मागे नाशिकचा दौरा झाला तेव्हा काही कारणास्तव "गारगोटी"ला भेट द्यायचं राहून गेलं. त्यानंतर एका सहकाऱ्याने एका लोकल "गारगोटी"बद्दल माहिती दिली. म्हटलं नाशिक नाही तर इकडे तरी जाऊया. या स्थळाबद्दलची माहिती इकडे आहेच.
मला इकडे जावसं वाटलं याचं खरं कारण माझा मोठा मुलगा सध्या कुठेही खेळताना सापडलेले दगडधोंडे घेऊन येतो आणि मग asteroid आहे म्हणून आम्हाला फुशारकी मारून दाखवतो. त्याला हा संग्रह पाहायला आवडेल असं मला वाटलं.
मुख्य मजला पहिला की तळघर पाहायला विसरू नका असं तिथल्या माणसाने आम्हाला सांगितलं होतं. त्याप्रमाणे तळघरात गेलो आणि उतरताना डावीकडे वळलो आणि मी मंत्रमुग्धच झाले. हे दालन चक्क फक्त लाकडांचं म्हणजे ज्याला इंग्रजीत petrified wood म्हणतात त्याचं होतं. आता गुगलवर तुम्हाला या प्रकाराबद्दल माहिती मिळेलच. हा प्रपंच फक्त तिथे काढलेल्या काही फोटोसाठी. एन्ज्व्याय :)
विविध प्रकारच्या वृक्षांच्या लाकडांचे नमुने 
जतन केलेली वनसंपदा

सव्वादोनशे मिलियन वर्षांपूर्वीचं खोड
खोडांचे आणखी नमुने







फुलपाखरू छान किती दिसते
सुचीपर्णी वृक्षांची सुकलेली फळे आणि काही भग्न खोडे




4 comments:

  1. Interesting post and yes, blog's new DP is cool. Really nice place...

    ReplyDelete
    Replies
    1. आभार सिद्धार्थ. नेहमीची मिनरल्स वगैरे पाहिल्यावर लाकडाचा खजिना वेगळा वाटला म्हणून खास पोस्ट टाकली रे.

      ते वरचं चित्र एका animal safari ला गेलो होतो त्याच्या आतमध्ये काढलं आहे. ही पण एक मस्त जागा होती मुख्य बच्चेकंपनीसाठी :)

      Delete
  2. Replies
    1. अगदी खरं पल्लवी. आभार :)

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.