Sunday, January 1, 2012

दो "टि"वाने....

एक टिवाना...नहीं...एक टिवाना और एक टिवानी भी.....दो टिवाने शहर में...दिन के कोई भी वक्त में......टी का बहाना ढुंढते है.....
यप्प...आलं का लक्षात..."टी"...हो तेच ते चाय....चहा..च्या....ची पोस्ट म्हंजे आलं, टी...टिवाने हेच येणार नमनाला.....
खरं तर मी आणि चहा हे जसं विळ्या-भोपळ्याचं नाही तरी चंगु-मंगुचंही नातं नव्हतं..मला संपूर्ण दिवसात चहा-कॉफ़ी काहीही नाही घेतलं तरी चालतं..लग्नानंतर मी फ़क्त विकेंडला नवरा घरी असला की चहा (तो सहसा त्यानेच केलेला) नाहीतर कधीकधी कॉफ़ी आणि इतर दिवशी सकाळी दूध-सिरिय़ल घेतलं की झालं असं असे किंवा आता असायचं असं भूतकाळात म्हणायला हवं...म्हणजे थंडीच्या प्रदेशात राहायला लागल्यापासून मला गरम काहीतरी हवं म्हणून ऑफ़िसमध्ये कलिग्जबरोबर कॉफ़ीची सवय लागली. त्यात कुठच्याही डाउनटाउनमध्ये नेहमीचे स्टारबक्स, डंकिन डोनट्स सोडूनही बरीच स्थानिक छोटी छोटी कॉफ़ीशॉप्स असतात. माझा फ़िलीच्या ऑफ़िसातला कलिग जरा दर्दी होता म्हणून कॉफ़ीचे ते स्थानिक अड्डे आणि त्यांचे वेगवेगळे मोका, लाटे, अमेरिकानो असे विविध प्रकार ट्राय करताना मला थोडी फ़ार कॉफ़ीची सवय लागली आणि मग ऑफ़िस संपलं तरी घरी पण कॉफ़ीमेकर आणून सोय करुन ठेवली...हो हो येतेय चहावर पण येतेय पण मुदलात काय आय मीन मुद्दलच बदललंय पण नंतर मग तो कॉफ़ीमेकर साफ़ करायच्या कंटाळ्याने मी पूर्वपदावरही आले. आता पुन्हा मी फ़क्त विकेंडला नवरा घरी असला की त्याने चहा केला तर चहा किंवा मूड असेल तर कॉफ़ी असं सुरू झालं. मला वाटतं माझ्यासाठी आधी रोज कॉफ़ी प्यायला कंपनी असायची हे त्या कॉफ़ीप्रेमामागचं कारण असेल. त्यामुळे घरी राहिल्यावर मग खास चहा-कॉफ़ी हवीच असं काही नव्हतं..
पण ...(येस...गाडी इज कमिंग बॅक टू टी) मग (अर्थातच) ओरेगावात आलो आणि थंडीला सततच्या पावसाची जोड मिळाली. सतत म्हणजे इतका सतत की आठवडाभर सूर्यदर्शन नाही, टेंपरेचर शुन्याच्या आसपास थोडक्यात एकदम बकवास वेदर...मग यावर उतारा म्हणून सकाळी दहाच्या आसपास एक मस्त चहा घेऊन बसायची सवय लागली. लागली म्हणजे काय एकदम लागलीच...आणि मुख्य म्हणजे माझ्या नवर्‍याला चहाची प्रचंड आवड आहे...तो एकावेळी मोठा मग संपला की त्यात अजून चहा घेऊन निवांत पीत बसतो. त्याच्याच आईच्या शब्दात सांगायचं तर "टमरेल भरून चहा लागतो तुला" आणि इथल्या मगाची साइज पाहता मी पण त्यातलीच...त्यामुळे इकडच्या पावसाळी हवेत त्याच्यातल्या चहाबाजाने डोकं वर नाही काढलं तर नवलच...आणि त्याला जोड मला लागलेल्या चहाच्या सवयीची....

त्यातच भर पडावी अशी योजना असावी म्हणून असेल, आता सियाटलला एका ख्र्सिसमसच्या दिवशी कुणी जेवण देता का जेवण असं आम्ही एखादं रेस्टॉरन्ट शोधत एका मॉलच्या प्रत्येक माळ्यावर फ़िरत असताना एका बंद दुकानाच्या काचेमागे असलेल्या खूप सुंदर किटल्या दिसल्या आणि रेस्टॉरन्ट विसरून आम्ही दोघं तिथे थांबलो. बाहेरून किमती दिसत नव्हत्या आणि दुकान तर बंद होतं...मी वर नाव पाहिलं..."टिवाना"....मला एकदम हसू आलं...दुसर्‍या दिवशी येऊन पाहू असा विचार केला होता पण दुसर्‍या दिवशी सियाटल दर्शनाच्या कार्यक्रमात पुन्हा त्याच मॉलमध्ये जाणं शक्य नव्हतं. मग आपल्या इथे यांचं दुकान आहे का बघून खरं तर तेही विसरलो.

पण नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला भटकायला बाहेर पडलो आणि दोन-चार दुकानात भटकल्यावर चल निघुया केलं आणि एक्झिट शोधतोय तितक्यात डाव्या कोपर्‍यावर तीच लाल किटली आणि "टिवाना"चा बोर्ड. शिवाय दारातच त्यांचे दोन स्पेशल टी सॅंपल घेऊन एक जपानी मुलगीही स्वागताला होती.
हे म्हणजे नवर्‍याच्या भाषेत "जिसको ढुंढा गली गली" असो...तर आता आहेच आपल्या गल्लीत म्हणून वळलो आणि आमच्या लाडकीची १०० डॉलरची किंमत पाहून लगेच आत गेलो..आता इथे गैरसमज नको...असे शंभर डॉलरचे बोर्ड जिथे जिथे असतात तिथे नेहमी आत जावं म्हणजे आपल्याला हव्या त्या किंमतीचं काही न काही आपल्याला परवडेल त्या भावात सेल नाव्याच्या बारमाही फ़ळीवर हमखास मिळतं...

त्याप्रमाणे आम्ही "तू नहीं तो और सही" म्हणून आम्हाला हवी ती एक किटली आणि कपाचा सेट घेतला.. तो दारात ट्राय केलेला चहाही इंटरेस्टिंग होता.मग तो किटलीला एकटं वाटू नये म्हणून तो स्पेशालिटी चहा आणि त्या चहाला आता आपण कुठे आलो बरं असं वाटू नये म्हणून एक बॉक्स अशी भरगच्च खरेदी करून बाहेर पडलो....आणखी थोडा वेळ थांबलो असतो तर कोस्टर, आणखी दुसरे कुठले कुठले चहा आणि बरंच काहीपण घेतलं असतं इतकं सुंदर दुकान होतं.आणखी काही सुंदर सुंदर किटलीचे सेट्स पण पाहायचे होते....कदाचित आमच्या पोरांना आमच्या खिशाची काळजी पडली असावी त्यामुळे योग्य वेळी आणि योग्य अंतराने वरचे सा लावून त्यांनी आम्हाला आवरतं घ्यायला लावलं.
तसे आधीचे कप,किटली इ. प्रपंच आहे, त्यात हे नवं अपत्य...पण काय करणार आता टिवाने झालोच आहोत तर रोज "हा प्याला..टिवानाचा" असं संदीप खरेच्या सूरात सूर मिसळून म्हणायला काय हरकत आहे?


टीप - आता एक चहाची किटली घेतल्यावरही वर्षाच्या पहिल्या दिवशी ही बया पोस्ट टाकणार असेल असं जर कुणाला वाटलं असेल तर त्यांच्यासाठी मला एक स्पष्टीकरण देणं भाग आहे ते म्हणजे, काही नाही मी आज सकाळ सकाळी सिद्धुच्या ब्लॉगवर चहाचा मसालेदार फ़ोटो पाहिला त्यामुळे चहा चढला आणि मग हे टंकलंच...सिद्ध्या सब निषेध के हकदार अब तुम हो....

काही फ़ोटो टिवानाच्या साइटवरून साभार...

14 comments:

  1. च्यामारी (परतफेड :D) अपर्णा,
    तुम लोगा तो कॉफी टिवाने हो गये हो... सलीम फेकू ने देखा तो बोलेगा 'इतने बडे बडे कपा थे यारों, अंग्रेजा चार चाया भी चार अलग अलग कपा में पिते'

    आणि निषेधाचा मानकरी मी... हे बरे आहे गो, मी एका कपाचा फोटो टाकला तर त्यावर सह'किटली' 'कप'परिवार नवीन पोस्ट घेऊन आलीस. वर्षाच्या पहिल्याच दिवशी घसघशीत मार्क मिळवलेस. यंदा तू स्कोअर करणार तर...

    ReplyDelete
  2. व्वा अपर्णा, तुमचा ब्लॉग मी अधूनमधून वाचत असते. हे टिवाने फारच आवडले.

    ReplyDelete
  3. या ’ टिवानी ’प्रकरणात मीही सामील आहेच. :) कधीही कुठेही मात्र कसाही नाही... वाफाळता-फ्रेशफ्रेश करणारा... :)

    मी काय म्हणतेय अपर्णा, तो खासा चहा तुला ठेवून तो सेट जरा दे की धाडून मला... :P

    चला पुन्हा एक चहा मारावाच... ;)

    पोस्ट... वाह! टिवाना !

    ReplyDelete
  4. हे वर्ष एकदम वाफाळतं, गरमागरम, कडकडीत आणि जायकेदार जाणार आहे तर. दोन दिवसांत चहाच्या दोन दोन पोस्ट्स :)).. चाय बरेच टीवाने आहेत तर :)

    ReplyDelete
  5. इस्मैलभाई सलीम है किधर कु....मैने सुने आप लोगा ने भी चाय का प्रोग्राम बनाया है...
    अरे वर्षाच्या पहिल्या दिवशी घसघशीत मार्क मिळवायचे आणि मग झोप काढायच्या असं दिसतंय या वर्षी...तसही ही पोस्ट निव्वळ तुझ्या त्या पोस्टीमुळे सुचली आहे..आता डोस्क पुन्हा बंद आहे तेव्हा लिही न काही तरी...फक्त तुझी पोस्ट मागच्या वर्षात असल्यामुळे झाले तर होतील माझे मार्क जास्त नाही तर आनंदी आनंद आहे...

    ReplyDelete
  6. प्रीती ब्लॉगवर सहर्ष स्वागत. नवीन वर्षातला पहिला नवीन वाचक आणि फॉलोअर म्हणूनही...:)
    टीवानाच दुकान पण मस्त आहे म्हणून बहुतेक पोस्ट चांगली जमली...पुन्हा भेटूच...

    ReplyDelete
  7. श्री ताई तुला टीवाने प्रकरण आवडलं न मग इथे ये की सेट काय चहाची पण मजा लुटुया...

    ReplyDelete
  8. हेरंब, तू कॉफीवाना आहेस माहित आहे मला...पण मला बघ कॉफी चहा सगळ चालतं आणि काही नसल तरी..
    पण सध्या तरी ओरेगावाने चहाचा चस्का लावलाय हे मात्र खर...:)

    ReplyDelete
  9. 2012 madhe tuze bharapur lekh vachayla miludet

    ReplyDelete
  10. निशा, नक्की प्रयत्न करेन...तू आवर्जून लिहिल्याबद्दल खूप खूप आभार आणि तुलाही २०१२ साठी शुभेच्छा.....

    ReplyDelete
  11. एकदम छान post आहे ही... आवडली!

    ~ रुही

    ReplyDelete
  12. रुही आभारी....नव्या जर्सीत पडलेल्या थंडीत चहा तर हवाच न....:)

    ReplyDelete
  13. चहा प्रेमी मी पण आहे ग....आणि इतक्या सुंदर चहा च्या किटल्या पाहून आताच लगेचच एक कप चहा हो जाये...म्हणून मी निघाले आहे स्वयंपाक घरात....वाजले आहेत दुपारचे पावणे चार आणि तुझी पोस्ट अगदी योग्य वेळेला वाचली ग अपर्णा..मस्तच लिहिली आहेस.....

    ReplyDelete
  14. श्रिया, आणखी एक "टिवानी" मिळाली म्हणायचं....झाला का चहा?? आताच जेवलोय आम्ही पण...आता तुझी कमेन्ट पाहून आजचा चहा लवकर होणार....:)

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.