Saturday, October 31, 2009

एवढा मोठा भोपळा...






सध्या सगळीकडे घरांपुढे कोरलेले भोपळे आणि त्यात लावलेल्या मेणबत्या दिसतात. काही ठिकाणी वेगवेगळे रंग आणि आकाराचे भोपळे सुबकरित्या रचुन ठेवलेत..सरता उन्हाळा आणि कापणीचा हंगाम संपल्याच्या आठवणी आहेत. आता भले सगळीच जण शेती करत नाहीत. पण हे ऋतुप्रमाणे घरसजावटीची अमेरिकन पद्धत माझ्या आईलाही खूप आवडते..


त्यानिमित्ताने आपली भोपळयातल्या म्हातारीची गोष्ट आठवली. तसंही लेकाला गाणी म्हणून झोपवायचं जवळ जवळ बंद आहे गेले दोन महिने (आजी आहे ना आता इथे हक्काची) म्हटलं जरा गोष्टतरी सांगुया. लहान मुलांच्या बर्याच गोष्टी ऐकताना पडलेले काही प्रश्न कायमच आहेत मला. जसं म्हातारी एवढ्याशा भोपळ्यात मावुच कशी शकते?? पण काही आठवडे आधी एका फ़ार्ममध्ये गेलो होतो निमित्त होतं सफ़रचंद खुडणी करायचं..(apple picking) तिथे लगे हातो भोपळे, द्राक्ष आणि अर्थातच सफ़रचंद असं सर्व काही वेगवेगळ्या विभागात लावलं होतं आणि ते पाहायला जायला आपल्या बैलगाड्यांसारख्या पण बैलाऐवजी यंत्र अशा गाड्या होत्या. इथे सगळ्यात मोठ्ठा पाचशे  पौंडाचा एवढा मोठा भोपळा पाहुन मात्र आता पुन्हा तो म्हातारी त्यात बसली कशी हा प्रश्न पडणार नाहीये...तुमच्यापैकी कुणाची मुलं लहान असतील किंवा माझ्यासारखे काही अजुन तो प्रश्न मनात ठेऊन असतील तर नक्की यातले फ़ोटो दाखवा. त्यांच शंकानिरसन होऊन जाईल..अरे आणि फ़क्त भोपळेच किती प्रकारचे आणि रंगाचे असावेत??


मान गये..बरेच दिवस ठरवत होते त्यावर लिहिन आज सुदिन उगवलाच आहे तर लगे हातो तेही फ़ोटो टाकुन देते.





भोपळ्याची आठवण आजच यायचं कारण आज इथे अमेरिकतला एक सण "हॅलोविन" साजरा होतोय. त्यानिमित्ताने सगळीकडे कोरलेले भोपळे आणि त्यात ठेवलेल्या मेणबत्या इ. दिसतयं. कधी नव्हे ते आम्हीही मुलाच्या निमित्ताने "ट्रिक ऑर ट्रीट" साठी जाऊन आलो. अरे आपण हे आधीच का नाही केलं असं ती आलेली वेगवेगळ्या चवीची चॉकोलेट्स खाताना वाटतंय.
या सणामागचं नक्की शास्त्र माहित नाही आहे पण जे काही ऐकलंय त्यावरुन मला वाटतं या दिवसात रात्री मोठ्या होत्यात तसं भुताच्या आठवणी जाग्या होत असाव्यात. तर अशा वाईट मृतात्म्यांना पळवुन लावायचं म्हणजे स्वतःच वेगवेगळे शक्यतो भीतीदायक कपडे घालुन संध्याकाळ झाली की फ़िरायचं आणि घरोघरी जाऊन म्हणायचं "ट्रीक ऑर ट्रीट?" म्हणजे आता घाबरवु की तुम्ही मला काही देताय?? मग समोरचा निमुटपणे ट्रीट म्हणजे चॉकोलेट देतो. गावात एखादा भूतबंगलाही उभारला असतो. त्यात जायचं म्हणजे पण मजाच असते.

आजकाल काही काही लोकं चॉकोलेट ऐवजी मुलांच्या खेळायच्या वस्तुही जसं प्ले डो इ. देतात. समजणारी मुले ती इतकी गोळा केलेली चॉकोलेट्स हट्टाने खातात म्हणून असेल. आम्हाला काय ते टेंशन नव्हतं. म्हणजे सुरुवातीला आमच्या बाळाला कळत नव्हतं की हे काय चालु आहे म्हणुन तो असं लोकांकडून काय घ्यायचं म्हणून नुसताच पाहात होता. मग एक-दोन घरं झाल्यावर आम्ही त्याला एक चॉकोलेट खायला दिलं मग मात्र अंदाज आला त्यालाही या ट्रीटचा. त्याच्यापुढच्या घरात तो आपला स्वतःहुन अजुन हात पुढे करतोय. मजा आहे..

आम्ही त्याला एक डायनॉसोरसारखा कपडा आणला होता. तो घालुन आमच्या आसपासच्या काही ओळखीच्या आणि काही अनोळखी घरांमध्ये फ़िरलो. थोड्या वेळाने कंटाळा आल्यावर मात्र घरात आल्यावर त्याचं चॉकोलेटचं मडकं आम्ही लपवुन ठेवलंय. तो झोपला की आम्ही ती हळूहळू खाऊ...किती दुष्ट आई-बाप आहोत ना?? अहो पण याच वर्षी. पुढच्या वर्षी त्याची चॉकोलेट्स ढापायची काही नवीन ट्रीक आम्हालाच शोधावी लागेल.

9 comments:

  1. मी हेल्लोवीन च्या तुझ्या पोस्ट ची वाट पाहतच होते. छान माहिती आहे. शनिवारच्या लोकसत्तात पुरवणीत पण लेख आहे. पिल्लू गोड दिसतंय. एक मोठा भोपळा बघून बसव त्यात. मजेशीर आठवण राहील. दीपावलीत खूप दिवे लावण्याचे हे हि एक प्रयोजन असते कि रात्र मोठी होत असते.शुभ भावना घरापर्यंत याव्यात हा हेतू असतो.

    ReplyDelete
  2. धन्यवाद अनुजाताई. मी खरं तर या वर्षी मुलासाठीच साजरी केली नाहीतर आतापर्यंत फ़क्त आमच्या घरी येणार्यांना चॉकोलेट्स वाटण्यापर्यंतच आमची मजल होती...पण खरं सांगते अशी एकामागुन एक वेगवेगळी चॉकोलेट्स खायला सॉलिड मजा येते...:)

    ReplyDelete
  3. sahi aahe post madam tumhala comment dene parat ekda tras dayak zale hote pan achanak he comment che page aale .........

    are ti nirop wali post khup ch mast aahe sadhya mazi pan company take over zali aahe sagale jan tense aahe navin mgmt job deil ka etc mhanun pan tuza post mule jara relax watat aahe :)

    chalo bye kathi mast ch aahe tuzi mazi pan ek US wali boss hoti Esin tichi ti pan same kathi sarkhich hoti aso .......

    ashwini.

    ReplyDelete
  4. काय म्हणतेस अश्विनी?? ती अनामिकपेक्षा तुझ्या इ-मेल आय डी ने कॉमेन्टायचा प्रयत्न कर. कदाचित अनामिकपणामुळे असं होत असेल. त्या निरोपाच्या पोस्टला तशा बर्याच कॉमेन्टस आहेत. असो..
    भारतात शक्यतो सर्व नीट चालु आहे असं वाटतंय...इथे तसंही मंदीमुळे टेक ओव्हर झालं की काही खरं नसतं...तुझ्या नोकरीसाठी शुभेच्छा. लेक मोठा होतोय फ़ोटोत पाहिलं असशील...

    ReplyDelete
  5. मस्त दिसतोय आरुष....मी कालपरवाच ईशानला हॅलोवीन बद्दल सांगितले आता आज हे फोटो दाखवते...चॉकलेट्स मिळणार म्हटल्यावर त्याला जरा जास्त आवडेल...

    ReplyDelete
  6. तन्वी अगं चॉकोलेट्सचा डोंगर होईल अजुन जास्त घरी गेलं की आम्ही अगदी साताठ घरांमध्येच फ़िरलो आणि तेही हवा जरा बरी होती म्हणून...इशानला आरुषची चॉकोलेटस हवी आहेत का?? :)

    ReplyDelete
  7. मस्तच...:) आरूषची हॆलोवीनशी ओळख झाली. आता कमीतकमी पुढची बारा वर्षे ही धमाल चालणार.गोड दिसतोय. खरेच एका मोठ्या भोपळ्यात बसवून फोटो काढून घे.पुढे-मागे कधी नेमके साधलेच तर स्मोकीज ला जा याचवेळी. म्हणजे रंगही मिळतात व तिथे जबरदस्त मज्जा असते हॆलोवीनची. अग लहान तर लहान आम्हीही खूप धमाल केली.मग आई-बाबा-आजीने चॊकलेटस ढापली ना.....हाहा....

    ReplyDelete
  8. भाग्यश्रीताई स्मोकीज आणि हॅलोविन हे कॉंबिनेशन चांगलं वाटतंय...बघुया तसा योग येतो का...:)
    आम्ही चॉकोलेट्स हळूहळू खायचं म्हणतोय....:)

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.