Wednesday, October 14, 2009

दिपावलीच्या शुभेच्छा..

दिवाळी सण मोठा
नाही आनंदा तोटा

या दिपावलीच्या निमित्ताने इथे आलेल्या प्रत्येक पाहुण्याला दिपावलीच्या अनेक अनेक शुभेच्छा... फ़राळाचं एक अप्रतिम ताट मायाजालावर मिळालंय तेही ठेवलंय. गोड मानुन घ्या आणि असाच लोभ राहु द्या.


आपल्या येण्याने, प्रतिक्रिया देण्याने अजुन काही लिहावंसं वाटतं म्हणून आज जास्त काही लिहित नाही....फ़क्त एकच प्रेमाची विनंती... आवाज आणि प्रदुषण करणारे फ़टाके फ़ोडताना जरा थोडा आपल्या पर्यावरणाचा विचार करा. दिवाळीतल्या रांगोळीतल्या रंगासारखे थोडे रंग काही फ़ुलझाडे अंगणात लावुन साजरे करता आले तर नक्कीच फ़ायदा होईल पर्यावरणाला आणि आपल्या चित्तवृत्तीला प्रसन्न करण्यासाठी...

11 comments:

  1. अपर्णा तुम्हा सगळ्यांना दिपावलीच्या अनंत शुभेच्छा!!!:)

    ReplyDelete
  2. Hi Aparna!!
    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
    Hope this festival of light brings more inspiration to your writing! Nice message about the fireworks. :)
    I am sorry I am not writing in Marathi because I am terribly scared of typos. And I can't ask Gayatri to proofread my comments on other people's blogs!! :)
    Cheers
    Saee

    ReplyDelete
  3. रवा लाडू नाहीत का ??? ही.. ही.. माझे सर्वात आवडते आहेत ते. तुम्हा सर्वांना दिपावलीच्या तेजोमय शुभेच्छा ... !

    ReplyDelete
  4. भाग्यश्रीताई, अनुजाताई, सई आणि रोहन धन्यवाद...
    सई, तुला माझं फ़टाक्यांबद्द्लचं मत आवडल त्याबद्द्ल विशेष आभार. आपल्या आसपासच्या लोकांना तू त्याबद्द्ल नक्की सांगशील अशी आशा आहे.
    रोहन, बघ तुला सरदेसाईंच्या ब्लॉगवर कदाचित मिळेल रवा लाडु. मला बेसन लाडु जास्त आवडतात. नशीबाने इथल्या ताटात तेच आहेत...:)

    ReplyDelete
  5. aprna,
    where are u?khup diwas post nahi.busy?

    ReplyDelete
  6. hey hi,

    Chan aahe farala che tu sagal ghari keles ka?

    Kashi zali diwali?

    Bye,
    Ashwini

    ReplyDelete
  7. Kashi jhali madam diwali????
    Are tujhya post mala velich ka disat nahit.....blogvishwa var yetat na...phir hum hi khuch gadbad kar rahe hai!!!!
    Aso pharal kakunni kelyache lihile nahi labad!!!!Jam tempting distay pan sagal.......

    ReplyDelete
  8. अरे बाबांनो (का बायांनो) मी लिहिलंय ना इतक सपष्ट की मायाजालावरचं ताट आहे म्हणून...या वर्षी आई असली तरी तिला त्रास नको म्हणून आम्ही फ़क्त करंज्या आणि शंकरपाळे आईने आणि मी मला येणारा एकमेव दिवाळी फ़राळ "चिवडा" बनवला. चकलीचा साचा आणायचं मी केले अनेक वर्ष टाळलंय. कुठे भाजणी करणार नाही तरी?? बाकी दिवाळी शांततेत आणि बाकी काही घरगुती गडबडीत गेली.

    @अश्विनी प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद.तुझी दिवाळी कशी गेली?? छोटुकलीला सजवायला गम्म्त येत असेल ना?? नाहीतर आमच्याकडे आहे फ़क्त झब्बा पायजम्याचे भाऊबंद...

    @तन्वी, मला वाटतं मी पोस्ट टाकते तेव्हा आपण निद्रादेवीची आराधना करत असणार आणि तोस्तर बाकीच्या पोस्टच्या मागं आमची पिटुकली पोस्ट ब्लॉगविश्वात लपुन जात असेल....

    @अनुजाताई, सध्या खरंच गडबड चालु आहे. पाहते कदाचित त्यावरच लिहिन....

    ReplyDelete
  9. hahha ag farala cha tata kade aadhi laksh jate aani "mayajal" etc overlooked hote :)

    ho mast maja keli pillu ne mhanje mich tila sakal sandhakal navin dress ghatle :)

    diwali lagech sampali aata ofc suru zale aahe boring :(

    bye
    ashwini

    ReplyDelete
  10. अश्विनी तू पण एकदम सही आहेस..पण चला त्यानिमित्ताने शुभेच्छांची देवाण-घेवाण झाली. आणि हो सजवण्यावरुन आठवलं आम्ही मागच्या वेळी येताना एक-दोन छान एथनिक कपडे आणले होते आरुषला आणि आता दिवाळीला ते गळ्यात उतरलेच नाहीत. मग जो एक साधा झाला त्यावरच भागवलं. नाहीतरी मुलांना काय???

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.