Saturday, August 1, 2009

झी मराठीचं चुकतंय बुवा

आता नवा मराठी सा रे ग म प जरा निवांत पाहुया म्हणतच होते आणि संध्याकाळी यु ट्युबवर अश्विनचं चॅनल चालु तर काय हे?? या व्हिडीओ मध्ये स्पष्ट लिहिलंच आहे. म्हणे झी नं कुणी DMCL नावाच्या कंपनीला हाताशी धरुन सारेगमप चे सर्व व्हिडिओ काढुन टाकायला लावले आहेत. च्यामारी हे बरं आहे. म्हणजे स्वतः जजेसच्या संगनमताने हवे तसे निक्काल लावायचे. शोच्या टि.आर.पी. साठी हवे ते स्पर्धक काढ घाल, कॉल बॅक करायचे. एस एम एस चा धंदा करायचा आणि काही लोकं त्यातलं चांगलं यु ट्युबवर पाहतात त्यांच्या तोंडचा घास पळवायचा?? काय हे?? आता मध्येच आम्हाला लिटिल चॅम्पसची आठवण झाली, सायलीचा आवाज ऐकायचा असेल तर झी ला फ़ोन करायचा की काय?? आणि जे लोक देशाबाहेर राहतात त्यांना थोडातरी आपल्या भाषेतला जरा कुठला चांगला कार्यक्रम आपल्या सवडीने बघायचा असेल तर काय करायचं त्यांनी??
काळ बदलला आहे याची झीला कल्पना आहे का?? अरे कोण कुठली सुझन बॉयल पण तिच्या ऑडीशनच्या या यु ट्युबला काही कोटी हिट्स आहेत आणि ७५००० च्या वर रेटिंग्ज; तर ब्रिटन गॉट टॅलन्टवाले कुणाच्या पाठी गेले नाहीत. मराठी माणसं कुणी वर जायला लागला की त्याचे पाय खेचतात असं ऐकलं होतं त्याचं हे मुर्त उदा. आहे असं म्हणायला हरकत नाही. खरं तर माझ्या मते झीवाले त्यांचे स्पॉन्सर्स, जाहिराती आणि एस.एम.एस.च्या रुपाने मिळणारा पैसा यातुन भरपुर फ़ायदा मिळवत असणार यात काही वाद नाही. पुन्हा मध्ये मध्ये सी.डी. काढतात त्यांचंही उत्पन्न आहे. मग ही अजुन हाव नक्की कशासाठी?? खरतर कार्यक्रम संपल्यानंतरही खूप दिवस चालणारी चकटफ़ु जाहिरात म्हणजे हे व्हिडीओ असं भरल्या कपासारखं ते का नाही गृहीत धरत?
अश्विनचं हे चॅनल खूप लोकप्रिय आहे म्हणून त्यांनी असं करावं का? त्याचे व्हिडीओ कॉमेन्टस ९९% वेळा परफ़ेक्ट असतात आणि खूपदा त्यात झीची पोल खोललेली असते. आता इतक्यात झालेल्या आजचा आवाजच्या वेळी तर त्याच्या आणि युजर कॉमेन्टस मध्येही आपसात तुंबळ नाही तरी छोटी युद्ध चालु होती. पण मला वाटतं तसही लोकंही काही इतकी दुधखुळी राहिली नाहीत की त्यांना ही झीची चालुगिरी कळत नसावी. आणि यु टुय्बच्या कॉमेन्ट्सद्वारे आपण आपलंही मत मांडु शकत होतो जे इतरवेळी आपण आपल्यात मांडत असु. पण त्याला हे झीवाले घाबरले??
आपण फ़क्त आपल्याला आवडलेली गाणी, काही विस्मृतीत गेलेली गाणी आणि काही पसंत पडलेले आवाज या सर्वासाठी हा कार्यक्रम पाहातो. निदान मी तरी निकालासाठी हे कार्यक्रम पाहण्याचं सोडलय. आणि खरं तर माझ्यासारखे प्रेक्षक जे हा कार्यक्रम सुरु होण्याआधीच भारतात गेलेत त्यांनी तरी यु ट्युबवर जेव्हा पाहिलं तेव्हाच त्यांना पहिल्यांदा या कार्यक्रमाबद्दल कळलं. आमच्याकडे बी.एम.एम. साठी आलेल्या काही कलावंतांनीही खूप कॅज्युअली विचारलं की तुम्ही यु ट्युबवर आमचं हे हे पाहिलं असेल आणि काय झालं त्यात?? शेवटी कलाकार म्हणून त्यांचं लाइव्ह प्रेझेंटेशन पाहायला पैसे मोजुन गेलोच की आम्ही आणि भारतातही जातातच. उलट यु टुबवर आपली जाहिरात होते असाच विचार त्यांनी केलेला वाटला.
केवळ दुसरं कुणी आपले कार्यक्रम दाखवुन त्याबद्दल आपले विचार मांडतय म्हणून जर हा झीचा अट्टाहास असेल तर हे म्हणजे कोंबडं झाकलं म्हणून सुर्योदय न होण्यासारखं आहे. आणि आता पर्यंत सारेगमप ची लोकप्रियता पाहता या कार्यक्रमातुन मिळणार्या पैशाची भीक झीला लागली असेल तर तसंही नक्कीच नाही आहे. मग का हा उगाचच उगारलेला बांबु?? अरे हे इंटरनेटचं युग आहे..आपणही आपली मत थोडी अपग्रेड करुया....

6 comments:

  1. अपर्णा, तुमचं म्हणणं तसं बरोबरच आहे. झी मराठीनं असं काही करावं असं मला वैयक्तीकरित्या पटत नाहीये. मुळात, तसं करावं याचं कोणतंही रास्त कारण मला सापडत नाहीये.

    आपण आपल्याला आवडलेली गोष्ट इतरांना दाखवायला म्हणुन यु-ट्युब वगैरेंमार्फत शेअर करतो. त्यावर झी नं गदा आणु नये हीच अपेक्षा!

    ReplyDelete
  2. It is not as if you have a God-given right to watch for free any and every program which you like. I have myself enjoyed watching some of the programs which you have referred to on Shri Ashwin Honkan's YouTube channel. But if any TV channel does not want their program placed on YouTube, it is their prerogative.


    > शेवटी कलाकार म्हणून त्यांचं लाइव्ह प्रेझेंटेशन पाहायला पैसे मोजुन गेलोच की आम्ही आणि भारतातही जातातच.
    >-------------

    That you attend programs by artists in India by spending your hard-earned money when they visit US is also not any reason why some of their deeds on TV should be made available to you for free.

    If the channel is less than honest in deciding their contests, you are free to condemn the practice, free to avoid watching the program, and the participants (most of whom are just second-rate singers anyway) were free not to take part. Same applies to 'the channel doing SMS-धन्दा'. It isn't as if Zee TV's practices have not been discussed in the public domain for last 5-10 years. Take it or leave it.

    Somehow people have come to believe that they are entitled to watch everything for free from their internet connection, including programs which they profess to dislike. Just because Zee TV (or Pu La Deshpande) makes lot of money, it does not follow that they should allow their events to be shown on YouTube (or that it is okay to place scans of Pu La Deshpande's pages on the internet).

    Some events have very wide significance. For example, PM's speech on 15th August falls in this category. For such events, care is taken that they are shown on the most easily accessible channel. It is arguable that the govt should place the video in the public domain, or allow kind souls like Shri Honkan to do the good deed. I don't think that logic applies to a 'cooked' contest like आजचा आवाज़. By all means, try to get Ashwin's YouTube Channel accepted as the TV channel's official partner. But Zee TV is entirely within their rights to decide whichever way they want, and they do not owe any explanation to anybody.

    ReplyDelete
  3. Youtube var sagale programs thevale tar producers na donhi veleche jevan pan youtube varach karave lagel. Recipes baghun ;)

    You can defend free world only upto a point.

    ReplyDelete
  4. गेले काही दिवस मी annonymous साठी मराठी शब्द शोधत असताना अचानक वाटलं यांना 'नामानिराळं' म्हटलं तर. म्हणजे बघा यांनी स्वतः यु ट्युबवर सारेगमपच नाही तर अजुनही बरेच काही पाहिले आहे पण तरी अचानक झीचा पुळका आला आहे. मला वाटतं तारकांचं युद्ध सोडल्यास सर्व सारेगमप यु ट्युबवर आहेत तरी लोकांनी झीवर ही हे कार्यक्रम पाहिले आहेत. म्हणजे तसा झीला फ़ार फ़रक पडला आहे असं नाही. पडला तर तो विरुध्द दिशेने कदाचित पडला असेल. मी माझं एक मत मांडलं पण ज्यांना विरोध करायचा आहे त्यांना नामानिराळं का राहावं लागतंय हा प्रश्न म्हणजे झीला आताच अचानक सारेगमप वर तलवार का उगारावी लागतेय यासारखाच आहे. असो.
    मला जितकं लाइव्ह पाहाता येतं तेही पाहिलं गेलंय आणि इथे सगळे कलाकार किंवा कार्यंक्रम फ़ुकट मिळावेत असं कुठेही म्हटलं गेलं नाही. जसं केबल फ़्री नसतं तसं इंटरनेटही फ़्री नसतं पण वर्तमानपत्रे जशी इंटरनेटवर उपलब्ध असतात तशी सोय करुन जरा काळाबरोबर त्यांनी राहिलं तर काही हरकत नसावी. मला वाटतं साइट्सवर जाहिराती इ. करुन कितपत उपलब्ध करता येईल असंही पाहावं इतकंच.
    प्रभास आपल्या प्रतिक्रियेबद्दलही धन्यवाद.

    ReplyDelete
  5. खरंच मी ही खुप मिस करतोय लिटील चॅम्पस चे विडीओस, यू टयूब वर होते तेव्हा कित्येक वेळा मजा लुटली त्याची. तुझा लेख छान वाटला.

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.