Monday, June 22, 2009

फ़ुलोरा... एक होती कोकिळा

मागं लिहिल्याप्रमाणे पुन्हा एकदा फ़ुलोरामधुन अजुन एक कविता...उर्फ़ नवबालकविता. सारेगम लिटिल चॅम्प्स नंतर काही अतिउत्साही पालकांनी जर आपल्याही मुलाने गाणी गावीत म्हणून आग्रह चालु केला असेल तर त्यावर उतारा चांगला आहे.आजकाल गाण्यांचा स्टॉक कमी पडतोय आमच्या चिरंजीवांना त्यामुळे सर्व प्रकारच्या कविता वापरुन पाहातोय. या कवितेच्या कवयित्री आहेत सुनीता नागपूरकर.

एक होती कोकिळा
गोड तिचा गळा
पण गायचा करी कंटाळा
खेळाचा लागला तिला लळा ॥
आईला पंसंत पडेना चाळा
म्हणून शिक्षा केली तिला
उंच शेंड्यावर उभी केली
पंखावर चरारुन डाग दिला ॥
मग लागली भोकाड पसरुन रडायला
रडता-रडता म्हणते कशी आईला
लतादिदीच्या घालणार असशील क्लासला
तरच शिकेन मी गायला ॥

4 comments:

 1. . mI tumhala kahi mail karato kavita.

  ReplyDelete
 2. pan ha udyog band kara asa mhanayache ka ?? hee hee...jokes apart..khar tar malach tyach tyach ganyacha kantala aalay asa watatay....

  ReplyDelete
 3. छान आहे ही कविता. वाचली नव्हती याआधी कधी. पण वाचताना एक स्मितरेषा उमटली चेहर्‍यावर... :-)

  ReplyDelete
 4. संकेत मी पण ही कविता त्यावेळी पहिल्यांदीच वाचली होती...

  ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.