मागे नाशिकचा दौरा झाला तेव्हा काही कारणास्तव "गारगोटी"ला भेट द्यायचं राहून गेलं. त्यानंतर एका सहकाऱ्याने एका लोकल "गारगोटी"बद्दल माहिती दिली. म्हटलं नाशिक नाही तर इकडे तरी जाऊया. या स्थळाबद्दलची माहिती
इकडे आहेच.
मला इकडे जावसं वाटलं याचं खरं कारण माझा मोठा मुलगा सध्या कुठेही खेळताना सापडलेले दगडधोंडे घेऊन येतो आणि मग asteroid आहे म्हणून आम्हाला फुशारकी मारून दाखवतो. त्याला हा संग्रह पाहायला आवडेल असं मला वाटलं.
मुख्य मजला पहिला की तळघर पाहायला विसरू नका असं तिथल्या माणसाने आम्हाला सांगितलं होतं. त्याप्रमाणे तळघरात गेलो आणि उतरताना डावीकडे वळलो आणि मी मंत्रमुग्धच झाले. हे दालन चक्क फक्त लाकडांचं म्हणजे ज्याला इंग्रजीत petrified wood म्हणतात त्याचं होतं. आता गुगलवर तुम्हाला या प्रकाराबद्दल माहिती मिळेलच. हा प्रपंच फक्त तिथे काढलेल्या काही फोटोसाठी. एन्ज्व्याय :)
 |
विविध प्रकारच्या वृक्षांच्या लाकडांचे नमुने |
 |
जतन केलेली वनसंपदा
|
 |
सव्वादोनशे मिलियन वर्षांपूर्वीचं खोड
|
 |
खोडांचे आणखी नमुने |
 |
फुलपाखरू छान किती दिसते
|
 |
सुचीपर्णी वृक्षांची सुकलेली फळे आणि काही भग्न खोडे |