Monday, March 31, 2014

कशासाठी? स्वतःसाठी….

काही महिन्यापूर्वी ब्लॉगचे फॉलोअर्स अचानक वाढले असं लक्षात आलं. ज्या वेगाने या ब्लॉगवर लिहिलं जातं किंवा जे नेहमीचेच विषय इकडे मांडले जातात त्या मानाने हे खरं मला अपेक्षीत नसतं. एकुण फॉलोअर्स १९० च्या पुढे वगैरे म्हणजे, "अगं बाई, खरंच?" असं काहीसं. साधारण त्याचवेळी, एका ब्लॉगवाचकाची मेल आली, तुझ्या पोस्टचे अपडेट्स मराठीब्लॉग्स डॉट नेटवर दिसत नाहीत. त्या साईटवर तपासून पाहिलं तर त्यांनी माझा ब्लॉग काढून टाकला होता. त्यांच्या काही तांत्रिक अडचणी असतील म्हणून त्यांना मेल करणे, ब्लॉग पुन्हा जोडून पहिले वगैरे करून पाहिलं पण एकदंरीत काही बदललं नाही. आणि त्यांच्याकडून मेलला उत्तर वगैरेदेखील नाही. 
मग विचार करत बसले की खरंच आपण ब्लॉग का लिहितो? व्यक्त व्हायचं साधन म्हणून की आणखी कशासाठी? आणखी काही (वाटलं तरी किंवा नाही वाटलं तरी) आपण काही करू शकणार नाही हे निदान माझ्या सद्यपरिस्थितीत माझं मला माहित आहे. मग ते कुणी वाचलं काय नाही काय मला व्यक्तिश: काय फरक पडतो? काहीच नाही. शिवाय माझ्या व्यक्तिगत आयुष्यातला प्रत्येक प्रसंग काही मी ब्लॉगवर मांडणार नाही. पण जे मला खरंच लिहावंसं वाटतं ते लिहिलं गेलं तर त्यात फक्त वैयक्तिक स्वार्थ आहे. मला स्वतःला माझ्या जुन्या पोस्ट्स वाचायला आवडतात. मला जे डीटेल्स लक्षात राहिले नसते ते ब्लॉग पोस्टच्या निमित्ताने मला पुन्हा आठवतात. आता काय बदललंय हे उगाच लक्षात येतं. 
हा एक मागच्या पाच वर्षांचा किंवा आठवणीबद्दलचं बोलायचं तर मागच्या कित्येक वर्षांचा प्रवास माझा माझ्यासाठी नकळत लिहिला गेला. पुन्हा पुन्हा वाचताना त्याचा प्रवाह मला आवडतो हे लक्षात गेलं.  त्यामुळे अनियमित का होईना इथे लिहित रहावसं वाटणार. लिहिता लिहिता अनेक जणांनी ते वाचलं त्यातल्या काहींनी प्रतिक्रिया दिल्या आणि काहींनी कदाचित खिल्लीही उडवली असेल. त्याने या ब्लॉगिंगला काही फरक पडला नाही किंवा ते आवश्यक आहेच असं नाही. मग मराठीब्लॉग्स डॉट नेटचा लोगो इथे असला काय नसला काय, त्यांनी त्यांच्या साईटवर माझ्या पोस्ट्स टाकल्या काय नाहीत काय काहीच फरक पडत नाही. आज बरोबर पाच वर्षांनी माझ्या ब्लॉगच्या मुखपृष्ठावरून ते चिन्ह काढून टाकताना माझ्यासाठी ब्लॉगिंग किती बदललं  आहे हे लक्षात येतंय. 
थोडसं कडवट वाटणारं वरचं मनोगत आज सुरुवातीला लिहिलं कारण गुढीपाडव्याची सुरुवात कडूनिंबाचा पाला खाऊन होई मग नंतर दुपारच्या जेवणातलं श्रीखंड अधीक गोड लागे. 
वाचक, फॉलोअर्स आणि पोस्ट यांची आकडेमोड करायचं ब्लॉगच वय कधीच सरलंय. पण त्या बद्दलची कृतज्ञता तशीच आहे आणि तशीच राहील. आता इथून पुढे वर्षभर जे लिहिलं जाईल ते वाचकांना नक्की गोड लागेल अशी आशा. 


यंदाची गुढी आपल्यासाठी येणाऱ्या वर्षात काही सुखद बदल घेऊन येवो हीच सदिच्छा. 

12 comments:

  1. मराठीब्लॉग्स.नेट वर हल्ली जाणे होत नाही. मला तरी तुझ्या ब्लॉगच्या अपडेटस ब्लॉग कट्टाचे ट्वीटस् नायतर Google+ मुळे मिळतात. ते हुकले तरी अधून मधून "माझिया मना"ला थेट भेट दिली जातेच. त्यामुळे लिवते रहो, हम वाचेंगे...

    नूतन वर्षाभिनंदन आणि भावी लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा...

    ReplyDelete
    Replies
    1. आभार सिद्धार्थ :)
      लिहायचं तर असतं. बघुया कितपत जमतंय.

      Delete
  2. तुलाही नवीन वर्षाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा!! जय ब्लॉगिंग!!! :)

    ReplyDelete
    Replies
    1. आभार्स गं. आणि तुलाही खूप साऱ्या शुभेच्छा :)

      Delete
  3. Hi Aparna,
    I am a regular reader of your blog.. I liked it so much..just one question where do u get this gudhi?i am staying in USA too and every year missed so much on gudhi padva

    ReplyDelete
    Replies
    1. अदिती, सर्वप्रथम ब्लॉगवर स्वागत आणि आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप आभार.
      वरच्या फोटोमधली गुढी माझ्या बहिणीने मुंबईमध्ये घेतली होती. मला वाटतं त्याला टेबलटॉप गुढी म्हणतात आणि ती तुला मायदेशात पाडव्याच्या आसपास मिळेल.

      Delete
  4. काही महिन्यांपूर्वी मराठीब्लॉग्ज.नेट ही वेबसाईट बंद पडली होती आणि ती चालू झाल्यावर मलाही त्यातल्या यादीत माझा ब्लॉग दिसला नाही. जुन्या ब्लॉग्जपैकी बरेचसे ब्लॉग्ज त्यांच्या यादीत दिसत नव्हते. नंतर त्या वेबसाईटवर अशी सूचना दिली गेली होती, की ब्लॉगलेखकांनी त्यांचे ब्लॉग पुन्हा त्या वेबसाईटवर जोडून घ्यावेत. त्याप्रमाणे मी ब्लॉग जोडून पाहिला, पण तरीही त्यांच्या यादीत ब्लॉग दिसत नव्हता. मग त्यांना तीनदा मेल पाठवले, पण एकाही मेलला उत्तर आलं नाही. मग मी वैतागून माझ्या ब्लॉगवरचा त्यांचा लोगो काढून टाकला आणि माझ्या ब्लॉगवर काही दिवसांकरता सूचना लिहून ठेवली, की मराठीब्लॉग्ज.नेटच्या यादीत आता माझा ब्लॉग दिसणार नाही. इतरांनाही असे कडवट अनुभव आले असतील, पण त्यावर चर्चा झालेली दिसली नाही. असो.
    नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! :)

    ReplyDelete
    Replies
    1. डीडी, मला खरं म्हणजे माहित पण नव्हतं की मराठीब्लॉग्स डॉट नेट बंद वगैरे पडली होती. असो आता इतकं काही वाटत पण नाही आहे. आणि खरं इतरवेळी जी लोकं त्या साईटवरून येत त्यांनी आता ब्लॉग फॉलो करायला सुरुवात केली आहे म्हणजे पाहिलं तर माझं काहीच नुकसान नाहीये. आता technology बदलली आहे त्यामुळे माझ्या फेबुपेजवरून आणि गुगलप्लस वरून येणारी लोकं जास्त आहेत. फक्त मला त्या साईटने अशा प्रकारे मेल्सन उत्तर न देणं वगैरे थोडं विचित्र वाटलं पण असो.
      या पोस्टच्या निमित्ताने माझं जनरल knowledge वाढतंय असं दिसतयं.

      Delete
  5. अगं, तू मराठी ब्लॉग नेटचं फारच मनाला लावून घेतलेलं दिसतंयस. डी डी ने म्हटल्याप्रमाणे त्यांच्या काही समस्यांमुळे बर्‍याचजणांच्या फाईल्स उडाल्या तिथून(माझाही ब्लॉग). पत्राला उत्तर नाहीच पण नंतर अचानक पुन्हा माझा ब्लॉग पुन्हा समाविष्ट झालेला दिसला. अर्थात नवीन पोस्टी दिसत नाहीत पण ब्लॉगच्या यादीत ’मोसम’ चं नाव आहे. त्यावर क्लिक केलं की जुन्या नोंदी दाखवतं. याचाच अर्थ वर्ष सहा महिन्यांनी ते लोक पहात असावेत. त्यामुळे लोगो ठेऊन पहा काही महिने नाहीतर तू म्हटल्याप्रमाणे फ़ेसबुक, गुगलमुळे वाचकांपर्यत पोचता आहेतच सगळे लेखक :-).

    ReplyDelete
    Replies
    1. मोहना, सर्वप्रथम आभार.
      अगं मी काही मनाला लावून घेत नाही ग. तेही virtual जगातलं फक्त मी ब्लॉग सुरु केला तेव्हा या साईटचं प्रस्थ इतकं होतं त्यामुळे त्यांनी असं unprofessional वागावं हे थोडं विचित्र वाटलं इतकचं. मला आता पुन्हा तो लोगो टाका वगैरे इतका कंटाळा आला आहे न. जाऊदेत :)
      या पोस्टच्या निमित्ताने लोकं वाचताहेत हे लक्षात आलं आणि तसंही ते टिचक्यावरून कळतच :)

      पुन्हा एकदा शुभेच्छा.

      Delete
  6. नक्कीच गोड लागेल … बाकी वर्षभराचं प्लान कसे करतात लोक देव जाणो :D

    ReplyDelete
    Replies
    1. आभार्स प्रसाद. अरे माझं काम पण सध्या हेच आहे म्हणून मी असा वर्षभराचा विचार केला असावा. पोस्ट लिहिल्यात असं कुठे म्हटलं मी?

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.