Sunday, August 25, 2013

सुन्न

सात महिन्यांपूर्वी जेव्हा निर्भयाची बातमी चर्चेत आली,तेव्हा सगळ्यात पहिली प्रतिक्रिया म्हणजे स्वतःच्या अगतिक शरीराची लाज वाटणं. तरी एक वेडी आशा म्हणजे निदान आरोपींना जबरी शिक्षा होईल असं वाटलं होतं पण तसंही झालं नाही. रोज़ "तशा" ताज्या बातम्या येताहेतच. ही मुंबईतली बातमी वाचून पहिल्यांदाच स्वतःच्या भारतीय असण्याची शरम वाटतेय. 
आज इतक्या तत्परतेने आरोपींना पकडल्याबद्दल पोलिसांचं अभिनंदन करावं तितकंच पुढे अंत बघू पाहणार्या न्याय-व्यवस्थेचं काय करायचं हाही प्रश्न आहेच. शिवाय मधल्यामध्ये इथून पुढे या घटनेशी संबंधीत शिंकलेल्या माशीलाही "ब्रेकिंग न्यूज़" म्हणून लोकांच्या समोर सारखं झळकवत आपापल्या चॅनलच्या तुंबड्या भरणार्यांनाही विसरून चालणार नाही. 
मागच्या महिन्यात कामाच्या जागी भेटलेला एक चेक नागरिक आणि त्याच्याशी झालेला सं(की नुसताच)वाद आठवतोय. 
"So what are you really proud of in current India? Is it because it has a rapist Capitol?"
याचं काही महिन्यांपूर्वीच एका दाक्षिणात्याशी विवाह झाला आहे आणि महाशय दिडेक आठवडा भारतात जाऊन आलेत यांचा ईथे उल्लेख व्हायला हवा.

त्याचा तो rapist Capitol चा उल्लेख झोंबून मी त्याच्याशी "it happens in all countries and may be the media highlights it only when a major case is solved by the cops. India is culturally so different I am not sure about Delhi but in Mumbai in my last visit, I travelled by public transport at night time and reached safely from one part of the town to other" हे आणि असं बरंच काही सांगून बाजू सावरायचा प्रयत्न केला होता.

कदाचीत माझ्या मुंबईबद्दल मला जरा जास्त विश्वास होता. कदाचीत मी बॅलाॅर्ड पिअरला ज्या गर्दुल्ल्यांच्या आजुबाजूनेे जावं लागे तो भाग तरीही "सेफ़ झोन" असावा किंवा त्यावेळी रस्त्यावर चालणारे इतर लोक फारच काळजीवाहू असावेत   किंवा तेव्हा सातला निघायची वेळ आता चार किंवा पाचवर आली असेल किंवा काय?
खरं सांगायचं तर इथून पुढे कुठल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली किंवा नाही तरी हे असं आमच्या मुंबईत दिवसाढवळ्या घडू शकतं हा एकच धक्का मला सुन्न करायला पुरेसा आहे. आज या देशाची नागरिक असण्याची शरम वाटतेय.3 comments:

 1. Being a man, I am doing my best to
  1. Empathise and understand the anguish of women,
  2. To keep the regressive attitudes away from at least myself, as a personal protest and
  3. To change my mindset so that I look at sexual assault as just a crime against a hapless, unsupecting victim, without qualifying it in terms of culture, morality or anything else.

  I know it is not enough. But trust me, most men feel as violated as women when such reprehensible incidents occur.

  Have faith. Things will change.

  ReplyDelete
 2. अपर्णा, मी मुंबईतच रहाते आणि मला अभिमान आहे भारताची मी नागरिक असण्याचा. पुन्हा जन्म घेण्याआधी मला विचारलं गेलंच तर मी माझा देश म्हणून भारताचेच नाव घेईन दुसरे कुठलेही नाही. हे नक्की.
  आता जे घडले त्याबद्दल. हे घडायला नकोच होते. स्त्री म्हणून मला बसलेला हादरा आता ह्यापुढे माझ्या प्रत्येक श्वासाबरोबर राहील. हे इतके भयंकर आहे. मात्र जे घडले तसे जगात कुठेच होत नाही…फक्त भारतातच घडू शकते व घडले असे मी म्हटले तर हे जगाबद्दल मी अंधारात आहे असे म्हणावे लागेल. आणि त्यामुळे खरे तर ह्या देशातच कशाला ह्या पृथ्वीवर जन्म घेतल्याबद्दल शरम बाळगावी लागेल.

  आज एक नागरिक म्हणून मी अधिक सतर्क राहीन. माझ्या आसपास काही चुकीचे घडताना दिसले तर मी त्या विरुद्ध आवाज उठवेन. मतदानाचे माझे कर्तव्य मी पार पाडेन. हा देश अधिक माणूस व्हावा ह्यासाठी मला जेजे शक्य असेन ते ते मी मरेस्तोवर करीत राहीन. हे मी स्वत:ला दिलेले वाचन आहे.

  ReplyDelete
  Replies
  1. ही सद्यंत लिंक पाहातेय्...आशा आहे की हे चित्रही बदलेल.

   आपल्या आवर्जून लिहिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.

   Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.