Wednesday, March 9, 2011

तीन महिने

कसं करतेस गं एकटीने?? सध्या मला विचारला जाणारा नेहमीचा प्रश्न....खरं सांगायचं तर पाण्यात पडलं की पोहावंच लागतं नाही का? अगदी तसच..

पहिले तीन महिने नियमाने बाळाने निदान बावीस तास झोपायचं असतं.. बाहेरच्या थंडीत हिटरने उबदार केलेल्या घरात अंमळ जास्त झोपणार बाळ ही जमेची मुख्य बाजू आणि अंगात कामानिमित्ताने जरा जास्तच मुरलेलं multitasking ही दुसरी...तसा हा प्रगत देश त्यामुळे काही गोष्टी यंत्राने होणार असतात. त्यांचा पुरेपूर फायदा घ्यायचा असतो अशा वेळी..तोच घेतोय...
एक स्वयंचलित पाळणा... "नाच बसंती" म्हटल्याप्रमाणे तो झोके घालतोय, साथीला पद्मजा ताईंचा सुमधुर आवाज "रंग बावरा श्रावण गातोय"... मग एका बाजूने घडाळ्यावर लक्ष ठेवून जमेल तशी खायची तयारी करायची, अधेमध्ये डायपर बदलणे, पिऊ घालणे अशी कामंही सुरु ठेवायची आणि दुसरीकडे स्वत:साठी ब्लूरे वर दुसरी एखादी जगजीत नाही तर शान, सोनू, सुरेश, आशा..... मूड असेल तशी प्लेलिस्ट ऐकता ऐकता कामं मात्र सुरु ठेवायची...एखादा दिवस जास्त शांत वेळ असेल तर एखादा पिक्चर पण टाकू शकले मी अशी एकटी....हे आतमध्ये बाळाचं गाणं आणि बाहेर माझं आणि अविरत सुरु असणारी कामंधामं पाहून मला कधी तरी मी inception जगतेय की काय असही वाटायचं...फक्त इथे किक मारायचं कामं बाळराजाचं....

याच पद्धतीने गरज होती म्हणून चक्क पार्ट टाइम कामं पण करू शकले...काही नाही आता फक्त माझी प्ले लिस्ट थोडा वेळ बंद करून शांतपणे VPNला जोडून घेतलं इतकच...या महिन्यात पूर्ण वेळ करतेय...अर्थात बेटर हाफ ने त्यासाठी खास सुट्टी घेतली कारण दिवसातले चार तास काढण त्यामाने सोप्प होत...उद्या बाळ तीन महिन्यांचा होईल आणि अर्थात त्याच्या हालचाली येत्या काही महिन्यात वाढतील पण जिची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो...माझी आई.... पुन्हा आमच्याकडे असेल...

आज सकाळ सकाळी ती अमेरिकेच्या पूर्व किनार्यावर आल्याचा फोन आला आणि गेले कित्येक दिवस जे मनाला सांभाळल होत ते चटकन डोळ्यातून बाहेर आलं..ती आहे हेच पुरेस आहे नाहीतर न बोलता करू शकते म्हणून करण्यासारख्या खूप गोष्टी करतेच आहे... आता काही तासांनी ती इथे पोहोचेल आणि मग मात्र मी पुन्हा तिच्याकडून लाड करून घेताना गेले तीन महिन्याचा दिवसा येणारा एकटेपणा सहजच विसरेन....

आजची पोस्ट अशा सर्व आयांसाठी ज्या लेकीच्या माहेरासाठी कुठलीही अडचण पुढे न करता फक्त मदतीचा हात देतात.....आज पुन्हा म्हणावसं वाटतंय अवे तो मज्जा नी लाईफ ..

32 comments:

 1. शेवटच्या वाक्यातली अनुभूती मीही घेतली आहे दोनदा. :)

  मस्त कोडकौतुक करवून घे. आरुष आणि रुषांकचेही लाड आहेतच आणि जावई टॉप ऑफ दॅट! मज्जा नी लाईफ! :)

  ReplyDelete
 2. मस्त लिहिलंयस. शेवटचे दोन परिच्छेद एकदम सही.. मस्तच.. मज्जा करा !!

  ReplyDelete
 3. मस्त लिहिलं आहेस अपर्णा. कौतुक करून घ्यायला हक्काचं कुणीतरी आलंय ना आता :)

  ReplyDelete
 4. मज्जा मज्जा कर.. :)
  कोड कौ्तुक करवून घे मस्त!

  ReplyDelete
 5. मस्त,सुंदर,अनुभवाचे बोल चांगले वाटले ,

  ReplyDelete
 6. शेवटचे दोन परीच्छेद आवडले...आता आई आली म्हणजे एकदम दे धमाल असणार... :) :)

  ReplyDelete
 7. श्रीताई अगं अगदी बरोबर ओळखलंस तू जावई, नातवंड आणि मुलगी अर्थात सगळ्यांचे लाडच....

  तुला पुन्हा ती अनुभूती येवो इतकंच मी माझ्यातर्फ़े मागणं मागेन...

  ReplyDelete
 8. हाबार हेरंब...खरं सांगु का लिहायचे दोनच परिच्छेद होते..पण नमनाला घडाभर नाहीतर वाटीभर तरी तेल घालावंच लागतं नं मला...

  ReplyDelete
 9. गौरी तुला कस्सं अगदी मनातलं कळतं बघ....:)

  ReplyDelete
 10. महेंद्रकाका कौतुक अगदी आल्या आल्या सुरु झालंय...आई आली मी माहेरी गेले असंच समजते...परदेशात राहिलं की माहेरपण आईला बोलावुनच करायचं कारण तिथे गेलं की तसा निवांतपणा मिळणं कठीणच....

  ReplyDelete
 11. महेशकाका, अनुभव अगदी जास्त नाही पण तरी थोडा-फ़ार आहे असं म्हणायला हरकत नाही....

  ReplyDelete
 12. योगेश हेरंबसाठी लिहिलंय बघ....आणि धम्माल म्हणशील तर अगदी आजी-नातवाचा संवाद आणि तिच्या बॅगमधला आमचा खाऊ सगळी मजा सुरु आहे नुस्ती...

  ReplyDelete
 13. ऋषांकला त्याची आजी पहिल्यांदाच भेटली असेल ना आता...मज्जा करा ...

  ReplyDelete
 14. हो रे देवेंद्र...आज्जीसाठी नातवंड म्हणजे दुधावरची साय अस आई त्याच्यासाठी पण म्हणत असते...

  ReplyDelete
 15. खूपच आवडलं पोस्ट! इथे सगळे एकटीने मॅनेज करतो तेंव्हा अंगात "संचारलेलं" असतं की काय, पण आईच्या नुसत्या नावानेच किती निर्धास्त होऊन जातो आपण!

  ReplyDelete
 16. खूपच आवडलं पोस्ट! सगळं एकटीने मॅनेज करतांना अंगात "देवी" संचारली असली, तरी आईच्या नुसत्या नावानेच किती निर्धास्त वाटायला लागतं!
  बाळाचे तर होतीलच, पण तुम्ही दोघीही एकमेकींचे लाड करा :)

  ReplyDelete
 17. प्राजक्ता, ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी खूप खूप आभारी...सगळं एकटीने सांभाळताना खरंच संचारतं बाकी आपण फ़क्त त्याला म्हणताना म्हणायचं हे ही प्रतिक्रिया वाचताना लक्षात आलं.....खरंय तुझं आईच्या नुस्त्या नावानंच निश्चिंत होतो आपण...

  ReplyDelete
 18. विशाखा तुझंही स्वागत आणि खास लिहिल्याबद्दल आभार. मला एक सांग तू आणि वरच्या प्रतिक्रियेतली प्राजक्ता जुळ्या बहिणी आहात का? तुमच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या वेळी एकाच प्रकारच्या कशा काय आल्या हा मला योगायोगच वाटला. कारण मी पब्लिश करायच्या आधीच तुमची काही वाक्य सारखी होती..असो...
  तू म्हणतेस तसं आहे इथेही. तिचे मी आणि माझे ती लाड करणं तर होणारच....:)

  ReplyDelete
 19. आज माँ के पास माँ है... हायै!!!

  ReplyDelete
 20. >>आज माँ के पास माँ है.....

  लोल सिद्धार्थ.....

  ReplyDelete
 21. खुप मस्त लिहिलं आहेस अपर्णा....
  सही आहेस तु आणि तुझ multitasking .... आता आराम आणि मज्जा ही कर खुप ..... :) :)

  ReplyDelete
 22. आयला मी ही पोस्ट वाचलीच नव्हती !! आता तू चॅट्वर बोलताना बोललीस म्हणून !! आणि कैच्याकै मी बझ्झ्वर ही पोस्ट लाईक केली होती!! :)
  आजकाल ना माझं असं होतयं बघ !!
  चला आई आली ना मजा मजा !!
  सिद्धु लोल्झ !!! :):):)
  मी काय बोलु अजुन ??
  तुझे सब है पता, है ना माँ !!! :)::):)

  ReplyDelete
 23. ज्यो आलीस का एकदाची ब्लॉगवर...:)
  स्वागत आणि आभारी...आराम, मज्जा, काम सगळ एकदम सुरु आहे....

  ReplyDelete
 24. दीपक, आजकाल तुझं कसं होतंय माहिते का? मी ही पोस्ट बझ केलीच नव्हती तुला सांगत होते ते यानंतरच्या आरुषच्या पोस्टबद्द्ल...आता काय बोलु आणखी तुझी ही कमेन्ट वाचुन एकटीच खिदळतेय....
  मुझे क्या पता है...तू आणि सिद्धु मालवणकर शोभताय.....:)

  ReplyDelete
 25. Great hats off to you Aparna
  You had managed preganacy with small Arush without anyone's help - Its really tough
  Kharach modern hirakani aahes

  Great pan aata aai aahe tuzi tar changala aahe
  I am always waiting for your posts
  Keep writing

  I tried posting this comment many times but was not able to do it before :(

  ReplyDelete
 26. आभारी निशा...हिरकणी वगैरे नाही काही जस मी म्हटल की पाण्यात पडल की पोहावं लागतं तसंच...आपल्या पिढीत अशा किती पटीने ग्रेट (आणि खऱ्या) हिरकण्या आहेत त्यांना सलाम..

  ReplyDelete
 27. Very True - Pan tya kharya hirkanyanmadhe tuza number nakkich aahe -
  You are managing home,kids + your job + etaka sundar lihites :) Great keep it up
  You are an inspiration !

  ReplyDelete
 28. ते तसं वाटलं तरी माझ्या बेटर हाफची साथ हेही तितकच महत्वाच आहे...मी या पोस्टमध्ये थोडा उल्लेख केला आहे पण त्याच्यासाठी खास पोस्ट मागे लिहिली होती...पुन्हा एकदा आभार तुझे...

  ReplyDelete
 29. Aparna~~Aga Divasaachi Sur.waat Jhaali Ti Kaabuli.waalaachyaa Goshtine....Aaj Radu~baai Divas Asalyaa.saarakha Watataya.Kitti Sahaj Radavataa Ga Tumhi !Pillaachaa Janma Jhaalaa Aani Ekade Navyaane Swatahaachhi Soneri Baal.ppan Navyaane Suroo Jhaalaa.... Asa Swa.madhana Navyaane Phulataanaachi Anubhuti Shabdaan.maddhe Kashi Saangaayachi....To Ivalaasaa Niraagas Jeev Kevhadyaa Vishwaasaane Aapalyaa Kushit Shiroon Shaant.pane Needraa.devichyaa Aashrayaalaa Jaato....Jhopalyaavar Tyaachyaakade Pahava Tar Maddhech Itka Sweet Hasata....Waataayacha Bahutek Dev Bolat Asaavaa Pillaashi....!Lahaan Mulaan.kadana kitti Shikaayalaa Milata.... Mukhya Mhanaje Kshamaa.shilataa !Swatahaa.madhalyaa Baalaalaa Jap!~~Chhakuli (praachikulkarni@yahoo.com )

  ReplyDelete
  Replies
  1. प्राची, ब्लॉगवर स्वागत...
   किती हळव्या शब्दात तुम्हीही तुमचा अनुभव लिहिला आहे.....:)
   बाळ मोठा होतोय...कालच त्याचे केस कापून आणले म्हणून आता खरं तर मोठाच दिसतोय....
   पण एक खरंय लहान मूल आपल्याला स्वतःमधलं मूल जपायला आणखी मदत करतो..मला त्यांच्याबरोबर त्यांच्या वयाचं होऊन खेळताना खरंच मजा येते......
   तुम्हाला कदाचित "चकए चष्टगो" या लेबलमधले असेच आणखी काही अनुभव वाचायला आवडेल.....जरूर वाचा...

   प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार....

   Delete
 30. Sakhi~Share Karaayalaa Khoop Kaahi Aahe.Tevhadaa tujhaa E-mail Id. Kalavalaas,Tar Aanakhi Chaagalaa!Itka Aaras.paani~Garbha.reshami.Neetal Asaavaa,Thodakyaat Kaay, Tar Deshasthi Asaava-Haatacha Raakhalyaashivaay Manapaasan Velich Daad Dili, Ki Aanand Vaadhato,Srujanaalaa Dhumaare Phutatach Raahataat! Thodasa Gujju.kavatik....Aye Bhagawaan Mane Ek Vardaan Aapide-Tu Jyaan Vasise,Tyaan Mane Sthaan Aapide....Vo Bhi Agar Mushkil Lagataa Hai , To Bhayyaa Kum Se Kum Juhoo Chaupaatimaa 50 Karod.no Bunglow Aapide....! Bahu Sarroo !Aani,He Aaho-Jaho 2 Mulaan.madhala Antar Kaa Vaadhavataya.... (praachikulkarni@yahoo.com)

  ReplyDelete
  Replies
  1. प्राची, पुन्हा एकदा आभार...

   तू मला aparna.blogspot@gmail.com या पत्त्यावर कधीही संपर्क करू शकतेस....:)

   Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.