Wednesday, June 9, 2010

मार्गे हायवे गोमांतक...

काही जागा अशा असतात की तिथे आपल्याला जायचं असतं; अगदी मनापासुन पण तरी प्रत्यक्ष जायचा मुहुर्त उजाडण्यासाठी कुणीतरी तिथे न्यावं लागतं...माझं आणि हायवे गोमांतकचं तसंच झालं. तसं ते माझ्या लिस्टवर जवळजवळ १९९५ पासुन आहे असं मी म्हटलं तर कुणीही हसेल पण तेव्हा मी आणि माझी शिवाजी पार्कमधली मैत्रीण खादाडी करायला जायचो तेव्हा तेव्हा एकदा हायवे गोमांतकला जाऊया म्हणायचो आणि तिची दुचाकी नेहमी एस.व्ही.रोड वगैरे अशी वेस्टात असल्याने नेहमीच नंतर जाऊया करुन राहिलं...पण शेवटी मुंबईच्या ब्लॉगर मेळाव्यानंतर बहुधा नशीबात तिथे जाणं(किंवा रोहनने तिथे घेऊन जाणं) लिहिलंच होतं त्याप्रमाणे गेलो...

झालं असं की मराठी ब्लॉगर्सचा मेळावा पार पाडल्यानंतर रोहन,शमिका,महेंद्रकाका आणि मी एकत्रच जाणार होतो आणि निघेनिघेस्तोवर रात्रीचे नऊ वाजले असावेत. त्यामुळे रात्रीच्या जेवणासाठी सगळी तयार होतो आणि नाहीतरी शिवाजी पार्कच्या इथे रोहनने गाडी ठेवली असल्याने तिथपर्यंत जायचे तर रस्त्यात गोमांतकमध्येच काही हादडुया असा विचार होता पण (नेहमीप्रमाणे) गोमांतकच्या बाहेरची रांग पाहुन तो विचार सोडला मग वाटलं की पार्काच्या इथे फ़्रॅंकी घ्यावी आणि गाडीतच जाता जाता खावी पण प्यायला पाणी,सरबतं घेतल्यावर फ़्रॅंकीही न घेता निघालो..रोहनच्या मनात अर्थातच हुकलेलं गोमांतक असावं त्यामुळे "जाऊया नं खायला" एवढं बोलुन शिताफ़ीने त्याने बांद्र्याच्या हायवे गोमांतकला गाडी लावली तेव्हा मानलं त्याला. एक म्हणजे इतकं पर्फ़ेक्ट लोकेशनसाठी आणि दुसरं त्या हायवेवरुन क्रॉस करण्याच्या सिग्नलला ज्या प्रकारे त्याने गाडी उजवीकडून मग मध्यभागी आणि मोठं डावं वळण घेऊन मागच्या गल्लीत घुसवली त्यासाठी...
अर्थातही इथेही रांग होती पण चार माणसांत वीस मिन्टं कशीही जातात. आमचा नंबर आल्यावर एक डीश अगदी मस्ट होती ती म्हणजे बोंबिल फ़्राय. शमिकाला कित्येक दिवस खायचे होते त्यामुळे पहिले आले ते खरपुस तळलेले चविष्ट ओले बोंबिल...त्यातलं तेल पाहायचं नाही...आमच्या थाळ्या यायच्या आत ते फ़स्तही झाले होते..त्यानंतर मग प्रत्येकाने आपापल्या आवडीप्रमाणे मत्स्याहाराचेच प्रकार मागवले. मला खरं सुरमईवर जीव आला होता पण ती ड्राय चांगली लागते म्हणून मग पापलेटचं कालवण मागवलं. मालवणी रेस्तरॉंमधली कालवणं तिरफ़ळ आणि नारळाच्या दुधाचं लेणं लेवुनच येतात हे वेगळं सांगायला नकोच. इथली चव आणि दादरच्या गोमांतकची चव मला साधारण सारखीच लागली. तांदळाची भाकरी, भात आणि सोलकढी आणखी काय हवं ताटात?? मला आठवतं एकदा जेवण आलं आणि सगळे इतके बिझी झाले की सगळ्या ताटांचे फ़ोटोपण काढले नाहीत.

आधीच भरपेट वडे-कटलेट (संदर्भ: ब्लॉगर मेळावा) खाऊन पोटं काही रिकामी नव्हती त्यामुळे कुठलंही गोड मागवायच्या भानगडीत पडलो नाही पण इतरवेळी खरवस मागवायला हरकत नाही...माझं आणि मालवणी जागांचं काहीतरी गमक आहे त्यामुळे इथे नेहमी मासेच खाल्ले जातात त्यामुळे इथल्या शाकाहारी मेन्युकडे फ़ार लक्ष जात नाही पण तरी अगदी मराठमोळे शाकाहारी पदार्थ जसं कोथिंबीर वडी, डाळींबी उसळ वगैरे इथेही असते त्यामुळे मालवणी खायचं तर हायवे गोमांतकलाही एकदा नक्की जायला हवं...आणि इतर महागड्या जागांपेक्षा इथले दर नक्कीच रिझनेबल असतात असा माझा अनुभव आहे.
जितका आनंद मेळाव्यात सगळ्यांना भेटून झाला त्यापेक्षा थोडा जास्त रात्रीच्या जेवणाने झाला असं त्यादिवशी वाटल...शेवटी खरंय की माणसाला खुश करण्याचा मार्ग त्याच्या पोटातुन जातो...आणि त्यातही माझ्या पोटातुन मासे गेले की मी जरा कांकणभर जास्तच खुश होते....मग केव्हा जाताय खुश व्हायला हायवे गोमांतकला???

31 comments:

 1. मज्जा आली ना.. आणि ती गाडी वळवली नसती तर गेलो असतो पुढच्या सिग्नलला... हेहे... :)

  ReplyDelete
 2. रोहन, तुझी या पोस्टवर पहिली कमेन्ट पाहुन धन्यु....:) अरे ती गाडी तू ज्या प्रकारे वळवलीस (की फ़िरवलीस?) ते माझ्या नेहमी लक्षात राहिल बघ...आणि मजा तर आलीच रे...आता बार्बेक्यु नेशनचा प्लान पण तुलाच करावा लागेल बघ....:)

  ReplyDelete
 3. त्या बाजूला जायचे इतकेच मला माहीत होते तेंव्हा...... हेहे...

  आणि हो तो प्लान राहिला आहे आपला.. तेंव्हा तू आलीस की पहिला हल्लाबोल BBQ...

  ReplyDelete
 4. तुमचा दोघींचा फोटो आहे गोमंतकचा मेल मधे टाकतो. डकवा इथे तो पण इथे.. आत्ता मेल करतोय.

  ReplyDelete
 5. चला.. निषेधापासून वाचलीस .. ;)

  खरं सांगायचं तर ब्लॉगर मेळावा हुकल्याबद्दल आणि त्यानंतर तुम्हा सगळ्यांबरोबर गप्पा टाकायची सुवर्णसंधी मिसल्याबद्दल माझाच णीशेद !!!!! :(

  ReplyDelete
 6. अपर्णा,
  गोमांतकात गेलात म्हणून जास्त दुःख नाही झाले, पुढच्यावेळी तिथुनच जवळच्या आमेय मध्ये जावू मस्त मराठी पदार्थ मिळतात. ही दोन्ही हॉटेल्स माझ्या ऑफिसपासून खूप जवळ आहेत.
  सोनाली केळकर

  ReplyDelete
 7. निषेध!!!!
  अगं, त्या गोमंतक ला तू गोमांतक का लिहिलेस सगळीकडे ?

  ReplyDelete
 8. वा! तोंडाला पाणी सुटले. हायवे गोमंतक माझेही आवडते रेस्तोरांत आहे. पुढच्या मुंबईच्या ट्रीप मध्ये जरूर जाणार!

  ReplyDelete
 9. महेंद्रकाका धन्यवाद..पुन्हा एडिट केली तर टाकेन...

  ReplyDelete
 10. हेरंब अरे भेटशील सर्वांना..कुणास ठाऊक कदाचित पुढचं संमेलनच तू आयोजित करशील...मग तेव्हा निषेधाचा बोर्ड मला लावावा लागु नये म्हणजे झालं...:)

  ReplyDelete
 11. सोनाली, अमेयाचं नाव पाहिलंय पण गेले नाही अजुन...पुढच्या वेळी नक्की....(आत्ताच आलेय तितक्यात पुढच्या ट्रिपमध्ये काय कायचं प्लानिंग सुरु झालंय..

  ReplyDelete
 12. आनंद हम्म्म....मला वाटतं बोलताना आम्ही नेहमी "मा" म्हणायचो म्हणून तसं झालं असावं...पण आता जाऊन रिपेअर करायचा जाम कं आलाय.....चालवुन घ्या वाइच...

  ReplyDelete
 13. सुकामेवा, ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार...नक्की जायलाच हवं असं ठिकाण आहे...

  ReplyDelete
 14. हायवे गोमंतकपेक्षा गोवा पोर्तुगीजा या स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग व टी. एच्. कटारिया मार्ग यांच्या वळणावर (कटारिया मार्गावर जरा पुढे) असलेल्या ठिकाणी जास्त विविधता आहे.

  ReplyDelete
 15. शरयु, ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.गोवा पोर्तुगीजामध्ये फ़ार पुर्वी गेले आहे पण मला त्यांचे पदार्थ विशेष आवडले नव्हते आणि ते थोडं महाग वाटलं होतं...अर्थात आता कदाचित परिस्थिती बदलली असेल..पुढच्या वेळी पुन्हा एकदा जायला पाहिजे...

  ReplyDelete
 16. माझा जोरदार निषेध..... हा हा. गोमांतक मध्ये गेलात म्हणून नाही पण मी हे सगळे मिस केले म्हणून. आणि सोलकढी मस्तच दिसतेय गं. रोहन, महेंद्र व तुझ्याकडून खूप ऐकून झाले होतेच आता थोडे फोटोही पाहिले.बाकी पोस्टमधून तुझी गोमांतकी-खास मत्स्यखुशी झलकतेयं.:D

  ReplyDelete
 17. श्रीताई, तू असतीस तर आम्ही तिथलं शाकाहारीपण चाखलं असतं....असो..निषेध तर निषेध पण खुशी दिसतेय नं...ते महत्त्वाचं...

  ReplyDelete
 18. Mi dileli comment disatch nahiye ithe....!!! :(

  ReplyDelete
 19. मैथिली, तुझी फ़क्त हीच कमेन्ट आली मला...आता परत प्रयत्न करुन बघ..ब्लॉगर गंडलं असेल कदाचित....

  ReplyDelete
 20. Mi mhanale hote ki, " ekte ekte gelat na...mala sangitale aste tumacha ha plann aahe tar mi friends na shendi laavun aale aste tumachya barobar... ;)Neways...dsnt matter a lot...Next time aapan sagale punha jaauyaat.....!!! :)

  ReplyDelete
 21. मैथिली, मला ही पोस्ट लिहिताना वाटलंच होतं की तू जर वाचलीस तर असंच काहीसं म्हणशील...पण बघ, आधी पळणारी तुच होती...मला तर वाटलं आम्हालाच शेंडी लावलीस तू...ही ही ही...पुढच्या वेळी भेटतानाच एखाद्या खादाडीप्रांतात भेटुया कसं???

  ReplyDelete
 22. आम्हा प्रजेला कळु न देता राजा अन प्रधानमंत्र्यांनी हे सर्व केल त्याबद्दल तिव्र निषेध...संप,आंदोलन..कोणी आहे का रे तिथे... :)

  ReplyDelete
 23. देवेंद्र, भूक लागली होती बघ...बाकी सगळ्यांकडे तर पाहुन वाटत होतं की ते वडे-कटलेटमध्येच गार झालेत....
  म्होरल्या वेळी आपण सगळी एखाद्या खाऊगल्लीतच भेटू...

  ReplyDelete
 24. नॉन व्हेज आलं की मी हिरमुसतो. कारण तुम्ही लोक असली वर्णनं करता, की माझ्यासारख्या पक्क्या शाकाहार्‍याला(अंड्यांचा सन्माननीय अपवाद वगळून) कसंसंच होतं.;)
  असो.

  ReplyDelete
 25. हा हा, अरे शाकाहारीपण आहे त्यांच्याकडे फ़क्त माझ्या ताटात नसल्याने त्याचं वर्णन नाही इतकंच...

  ReplyDelete
 26. सही...मस्त मजा केली की....मी मिस केल...असो पुढच्या वेळी आलात की जाउ या नक्की!!!

  ReplyDelete
 27. योगेश, तुझं नाव पुढच्या लिस्टमध्ये टाकलंय...जमव मात्र....:)

  ReplyDelete
 28. बरेच दिवस ब्लॉगवर येणे झाले नाही पण मला कुठे तरी माश्याचा खमंग वास येत होता. शेवटी शोधून (हुंगून) काढलेच. जबरा.

  ReplyDelete
 29. सिद्धार्थ, आता पावसाळ्यात माशाच्या वासावर (किंवा वासवाल्या सुक्या माशांवर) गुजराण करावी लागत असेल नं?? ही खादाडी आणि कंपनी दोन्ही जबराच माझ्यासाठी....

  ReplyDelete
 30. सिद्धार्थ, आता पावसाळ्यात माशाच्या वासावर (किंवा वासवाल्या सुक्या माशांवर) गुजराण करावी लागत असेल नं?? ही खादाडी आणि कंपनी दोन्ही जबराच माझ्यासाठी....

  ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.