Sunday, September 13, 2009

एका आईचं पुनरागमन

गेले सत्तावीस महिने ती आपली मुलगी आणि घर यात आनंदाने रमली. इतके दिवस तिने टेनिसचा एकही सामना पाहिला नाही. तिला जमलं नसतं असं नाही पण तिने पुर्णवेळ आपल्या बाळीलाच दिला. आणि आता ही पोस्ट लिहिण्याच्या काही क्षण आधी ती पहिली स्पर्धक आहे की जी वाइल्ड कार्डमधुन खेळुन यु. एस. ओपनच्या फ़ायनला नुसती पोहोचलीच नाही तर तिच्या विरोधातली तरुण तडफ़दार स्पर्धक कॅरोलाइन वोजनियाकी हिचा सरळ सेटमध्ये धुव्वा उडवून दिमाखात अमेरिकन ओपनचा चषक आपल्या हातात उंचावतेय. "किम क्लाईस्टर्स" २००९ ची अमेरिकन ओपनची विजेती. आजची रात्र तिच्यासाठी आणि तिच्यासारख्या पुनरागमन करणार्या सर्वच आया यांच्यासाठी खास...

तसं तिच्या कारकिर्दीतलं हे दुसरं मोठं पदक. पहिलं इथेच २००५ ला घेतलं होतं आणि योगायोगाने पुनरागमनातही तिने इथेच श्रीगणेशा केला. आणि १९८० नंतर टेनिसमधलं कुठलंही मोठं पदक मिळवणारी ही पहिली आई आहे. टेनिसच्या जगतात एका आईसाठी हे नक्कीच कठिण आहे कारण एका बाळाच्या जन्मानंतर पाठीची अवस्था आणि पोटाच्या स्नायुमध्ये आलेली शिथीलता याने टेनिसचा कणा म्हणजे सर्विस करताना its just not the same again. शिवाय या सत्तावीस महिन्यात सगळ्या नव्या दमाच्या तारकांशी सामना करायला तो स्टॅमिनाही हवा. तिला वाइल्ड कार्डजरी मिळालं असलं तरी तिचा ड्रॉ अतिशय कठिण होता आणि उपान्त्य फ़ेरीमध्ये तर विनस विल्यम्सबरोबर तिचा सामना होता. अंतिम फ़ेरीच्या या मॅचमध्ये सुरुवातीला कॅरोलिनाने किमची सर्विस ब्रेक करुन पुढचा रस्ता कठीण आहे याची जाणीव तिला करुन दिली होती. हा सेट जाणार असे कागदावर वाटत असतानाच या कणखर मातेनं ७-५ असा अक्षरश: खेचुन आणला आणि दुसर्या सेटमध्ये मात्र कॅरोलिनाला डोकं वर काढायला दिलं नाही. हा सेट तिने अगदी ६-३ असा अलगद खिशात घातला आणि मग मात्र तिला अश्रु आवरेनासे झाले.

तिची अठरा महिन्यांची छोटी मुलगी जेडसुद्धा मॅच पाहायला आली होती आणि तिच्या चषक घेतानाच्या मुलाखतीत त्याबद्द्ल विचारलं त्यावेळी इतर कुठल्याही पालकाप्रमाणे ती निरागसपणे म्हणाली की आज आम्ही आमच्या मुलीची दुपारची झोप थोडी उशीरा केली म्हणजे ती ही मॅच पाहायला जागी राहील. आणि उद्यापासून मला पुन्हा तिला रुटीन नीट करावं लागेल. तिला तिचं नेहमीचं आईपणाचं आयुष्य उद्यापासून पुन्हा हवय हेही तितकंच महत्वाचं नाही का?
टेनिसच्या इतिहासात मी पहिल्यांदाच चषक वितरण झाल्यानंतर एक संपुर्ण कुटुंब कोर्टवर पाहतेय. त्या छोट्या मुलीला आपल्या आईने काय मिळवलंय हे नक्कीच इतक्यात कळणार नाही पण ती चकाकणारी वस्तु काय आहे याची उत्कंठा नक्कीच आहे आणि त्या आईच्या डोळ्यात आपल्या लेकीची प्रतिक्रिया पाहण्याचा आनंद.
अशा अनेक छोट्या मोठ्या क्षेत्रात आपल्या जिद्दीवर आपलं घर सांभाळुन करिअर मध्ये पुनरागमन करणार्या अनेक मातांना हजारो सलाम....

14 comments:

 1. gr8, खरेच अशा अनेक मातांना सलाम. मॆचेस पाहिल्या फार आनंद वाटला.

  ReplyDelete
 2. धन्यवाद भाग्यश्री आपण आवर्जुन लिहिता त्यामुळे कुणीतरी वाचतय हे कळत आणि बर वाटतं.

  ReplyDelete
 3. अपर्णा, अग मालेगावहून एका वाचिकेने-आश्विनी वळे- तुझ्या पोस्टवर टिपणी टाकायचा प्रयत्न केला परंतु तिला टाकता आली नाही. मला तिचा मेल आला असून त्यात तिने तुला कळवायला सांगितले आहे.:)
  पाहा गं काय घोळ आहे ते.बोलूच.

  ReplyDelete
 4. धन्यवाद भाग्यश्री. खरं तर माझ्या कॉमेन्ट्सच्या सेटिंगमध्ये तसं काही नव्हतं पण आता मी थोडा बदल केला आहे. अश्विनीला तुम्ही जमलं तर सांगाल का? आणि काही काही वेळा ब्लॉगस्पॉट मध्ये पण काही बिघाड असला तर दोन-तीनदा टिचक्या माराव्या लागतात....

  ReplyDelete
 5. boss ag 3-4 vela comment takay cha try kela but no use aata chan comment sathi page open zale aage o/w tase hot navate ..........

  hi post khup ch mast zali aahe actully khup mothi comment hoti hya sathi pan aata visarle :)

  -ashwini

  ReplyDelete
 6. अगं काही वेळा आधी कॉमेन्टससाठी अडचण येई म्हणून भुंग्याने मला ही पद्धत सुचवली आहे. चालतेय असं वाटतयं....
  अगं अशी काय तू कॉमेन्ट विसरलीस?? मग एक काम कर त्याचा एक ब्लॉग बनव आणि आम्हाला लिंक दे.... कसं?? :)
  पुन्हा खास आवडल्याच कळवलयस त्याबद्द्ल आभार...

  ReplyDelete
 7. सुरेख, वैविध्यपुर्ण लिखाण आवडले.

  wish you the best.

  ReplyDelete
 8. आपण आवर्जुन लिहिलंत त्याबद्द्ल धन्यवाद मीरा...

  ReplyDelete
 9. Aparna,

  tuzee profile naahi ka bghta yet?

  wa mi hi match nahi bghu shklo :( pan tuzya likhaantun ti utsukta shamvun ghetlee :D

  ReplyDelete
 10. thanks Deepak. aare ti match pahane ani commentary was too good. Even my mom watched it with me who does not understand too much about tennis..

  ReplyDelete
 11. खरचं आई ही आईच असते, मग ती कुठल्या का देशाची असो.

  ReplyDelete
 12. एकदम बरोबर म्हटलंस सोनाली...

  ReplyDelete
 13. प्रिय अपर्णा
  तुझा "माझीया मना " ब्लोग खुपच प्रशंसनीय आणि उल्लेखनीय आहे …! माझी आणि तुझ्या ब्लोग ची भेट जरा उशीराच झाली आहे… ! तुझे ब्लोग वरील दोन चार लेख वाचुन झाले आहेत …. (संसाराच्या आणि नोकरीच्या कर्तव्यांतुन थोडेसे माझ्या बाबतीतील माझी कर्तव्याची जाणीव जागी आहे) त्याला स्मरून नेटब्लॉगिंग करते… ! आजच तुझा "एका आईच पुनरागमन " हा प्रासंगिक लेख वाचला … आणि डोळ्यात पाणी आले …….! विशेषता: तिच्या १८ महिन्याच्या मुली बद्दल तिला विचारल्यावर तिची निरागस प्रतिक्रिया वाचताना कुठल्याही आईचे मन हळवं झाल्याशिवाय राहणारच नाही …! आई ही आई असते मग ती जगातील कुठलही असो ….! खुप सुन्दर लेख …!

  पुढील आठवणीतील मोरपिसांना शुभेच्छा …

  ReplyDelete
  Replies
  1. समिधा, सगळ्यात प्रथम ब्लॉगवर स्वागत आणि आवर्जून लिहिल्याबद्दल मनापासून आभार.

   अगं असं अचानक कुणी माझं जुनं लेखन वाचून आवडल्याचं कळवलं की जसं वाटेल तसचं वाटतंय. :)

   आई ही आई असते हे अगदी अगदी खरं आहे आणि एक आई ते जाणू शकते हे ही तितकंच खरंय. तुला आणखी काही पोस्ट आवडल्या तर नक्की कळव. पुन्हा एकदा आभार.

   Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.