Wednesday, August 19, 2009

फ़ुलोरा अ आ ई!

गेले काही दिवस हे पुस्तक हरवले होते अर्थात घरातल्या घरात; पण शोधायला मुहुर्त सापडत नव्हता. अखेर मागच्या पोस्टवर अश्विनीने तंबी दिल्यावर नेमकं सापडलं एकदाचं. आज सकाळच्या डाकेनं आलेल्या इ-पत्रात नेमकं बाळं आणि कुत्रा यातलं साम्य दाखवलं होतं आणि हे बडबडगीत आजचं वाचलं जाणं असा योगायोग आहे की म्हटलं लिहुचया आता ब्लॉगवर ही छोटी आठवण.

लहान मुलांना लिहावाचायला कधी शिकवतात (म्हणजे प्रत्यक्ष शाळेआधी) माहित नाही. पण इथल्या वाचनालयात मुलांना अंक ओळख चालु केली आहे. आता इथे आई आल्यानंतर तीसुद्धा घरी A - Z चे ब्लॉक्स कधीतरी वेळ काढायला म्हणून वाचुन घेते. बरोबरीने आताच अ आ ई पण सुरु करावी का??
राहिली गोष्ट पाळीव प्राण्यांची या अमेरिकन लोकांचं कुत्र्या-मांजरांचं प्रेम जरा जास्त आहेच ना! तशी ती लोकं अगदी सख्ख्या मुलासारखं त्यांच्याशी बोलताना, त्यांच्यावर ओरडताना मी खूपदा पाहिलंय. म्हणजे पुष्कळ्वेळा मी आरुषला घरात चल म्हणून ओरडायला आणि शेजारचा रायन त्याच्या रॉक्सीवर खेकसताना एकदमच दिसतो....पण मी म्हणणार नाही हं की मुलं म्हणजे जणू पाळीव प्राणी कधी कधी मोह होतोही विशेष करुन या वयात जेव्हा ती सारखं सारखं आपल्या पायाशी घुटमळत असतात आणि आपल्या बर्याच गोष्टी ऐकतात पण तरी त्यांना थेट पाळीव प्राणी ...ही...ही...ही.....
ती सकाळची मेल आणि कविता खाली दिली आहे.
Life really boils down to 2 questions....
1. Should I get a dog??

OR........
2. should I have children??


मोत्या शीक रे अ आ ई
सांगूं कितीतरी बाई ॥

दादा आई म्हणताती,
अ आ इ ई कठिण किती
तुजला कधी न येईल ती;
म्हणु दे कोणी काही
शीक रे अ आ ई.

यू यू ये ये जवळ कसा,
गुपचूप येथे बैस असा,
ऐक, ध्यान दे, शीक तसा;
धडा पहिला घेई
शीक रे अ आ ई.

म्हणता तुजला येत नसे,
शिकविन तुज येईल तसे,
अ आ इ ई भुंक कसे;
कां रे भुंकत नाहीं?
शीक रे अ आ ई.

3 comments:

  1. Kiti diwasani vachale g he badbadgit......aata pillana ghetech bagh shikavayala....baki te sakalachya dakeni aalele e-patra baki great....
    Tanvi

    ReplyDelete
  2. वा!!मस्त दंगा चाललाय.हे बडबडगीत माझा लेक मलाच ऐकवायचा.:D

    ReplyDelete
  3. धन्यवाद "भानस" आणि तन्वी. हे बरं आहे ना लेकच तुम्हाला ऐकवायचा ते.. आमच्याकडे आता आम्ही नवीन शब्दांची वाट पाहातोय. गाडी "दुदु" च्या पुढेच जात नाहीय्रे...आणि आता तर दुदु पण म्हणत नाही...:(

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.